मुंबई-महिला दिनाचं औचित्य साधून मैत्री चॅरिटेबल ट्रस्टच्या संचालिका, सौ. संगीता सचिन अहिर यांनी
महिला कामगारांना, आजच्या दिवशीही सुट्टी नसल्यामुळे त्यांचा हा दिवस खास करण्यासाठी त्यांच्या
कार्यस्थळी त्यांना भेट देऊन हा महिला दिन साजरा केला. यावेळी बोलत असताना आपल्या
स्वप्नांसाठी लढत एकमेकांच्या साथीनं पुढे जाण्याचं आवाहन त्यांनी या महिलांना केलं. तर “संसाराचा
गाडा हाकताना स्वत:कडे दुर्लक्ष न करता आपल्या तब्येतीची काळजी घेणं ही तितकंच गरजेच
असल्याची जाणीवही” संगीता अहिर यांनी महिला मिलवर्कर्सना करून दिली. यावेळी पुढे बोलताना,
“स्त्रीच्या कर्तृत्त्वाला सलाम करण्यासाठी केवळ एक दिवस पुरेसा नसून 365 दिवस राबणाऱ्या ‘तिचा’
आदर नेहमीच आपल्या मनात असणं गरजेचं आहे, असं त्या म्हणाल्या.
200 महिला मिलवर्कर्स यावेळी दादरच्या टाटा मिल्समध्ये उपस्थित होत्या. त्यांच्या कामाची
पोचपावती म्हणून संगीता अहिर यांनी आपल्या प्रोत्साहनपर भाषणानंतर प्रेमाची भेटवस्तू देऊन या
सगळ्यांचा सत्कार केला.
मैत्री चॅरिटेबल ट्रस्टच्या संचालिकेबरोबरच मंगलमूर्ती फिल्म्सची घोडदौड पाहणाऱ्या संगीता अहिर
यांनी वाह! लाईफ हो तो ऐसी, गुड्डू रंगीला, सिंह साहब द ग्रेट, गली गली चोर है या सिनेमांची निर्मितीकेली तर चित्रपट वितरण क्षेत्रातही त्यांनी आपलं एक वेगळं अस्तित्त्व निर्माण केलं आहे. नुकत्याच
प्रदर्शित झालेल्या गोलमाल अगेन या सिनेमाची सहनिर्मितीही त्यांनी केली होती.
संगीता अहिर यांची महिला टाटा मिलवर्कर्सना भेट
Date:


