मुंबई -आजवर ४५ वर्षे अनेक भारतीय भाषांमधील 1500 हून अधिक गाणी गाऊन अनुराधाजींनी भारतीय संगीतसृष्टीला समृद्ध केलेले आहे. मदर तेरेसा पुरस्कार, राष्ट्रीय पुरस्कार, चार वेळस फिल्मफेअर पुरस्कार आणि नुकतंच ब्रिटनच्या संसद सभागृहातदेखील त्यांना आपल्या सुरमधूर स्वरांनी श्रोत्यांची मनं जिंकल्याबद्दल इंडो ब्रिटिश ऑल पार्टी पार्लिमेंटच्या वतीने पुरस्कृत करण्यात आले होते. आणि आता महाराष्ट्र गौरव महाराष्ट्राची शान, पुरस्काराने पुरस्काराने पद्मश्री डॉ. अनुराधा पौडवाल यांना भारताचे रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते दिनांक २८ जुलै २०१८ रोजी महाराष्ट्र गौरव महाराष्ट्राची शान पुरस्काराने पुरस्काराने बीकेसी, मुंबई येथे पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
डॉ. अनुराधा पौडवाल ह्यांच्या सारख्या नम्र गायिकेसाठी महाराष्ट्र गौरव महाराष्ट्राची शान पुरस्कार हा एक अतिशय अविस्मरणीय पुरस्कार आहे. “काळ्या मातीत मातीत…”, “राजा ललकारी…”, “बंदीनी…”, “शंभू शंकरा…” अशा अनेक सदाबहार गाण्यांसाठी जगविख्यात असणाऱ्या पौडवाल म्हणतात की, “आपल्या कर्मभूमीमध्ये आपल्या कार्याचे कौतुक होणे ही माझ्यासाठी फार अभिमानाची बाब आहे. हा पुरस्कार वैयक्तिकरित्या मला भरपूर काही देऊन जातो. आणि त्यासाठी मी सर्वांचीच खूप ऋणी आहे. श्रोत्यांचं हे असचं सतत वर्षांव होत राहणारं प्रेम मला माझ्या प्रत्येक कार्यासाठी स्फूर्ती देतं.”
भक्ती संग्रह आणि संगीतासाठीच्या परदेश फेऱ्या यातून वेळ मिळाला की, डॉ. अनुराधा पौडवाल ह्यांना शहीदांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत मिळवून देणे, गरीबांसाठी शस्त्रक्रिया, ग्रामीण भारतातील मुलभूत समस्या व कुपोषणाच्या मदतीसाठी हातभार लावून या सामाजिक कार्याद्वारे आपण समाजाचे काही देणे लागतो ही जाणीव जपण्यास आवडते.


