पुणे-गेली सुमारे ३०-४० वर्षांहून अधिक काळ पुणे शहरातील रेल्वे लाईन्स नजीक राहणाऱ्याना कायमस्वरूपी घर उपलब्ध करून देणेबाबत रेल्वे मंत्री पियुष गोयल ह्यांच्या समवेत येत्या महिन्याभरात सर्व संबंधित संस्था आणि अधिकाऱ्यांबरोबर बैठक घेणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ह्यांनी निश्चित केल्याची माहिती खासदार अनिल शिरोळे ह्यांनी दिली आहे. काल (दि १२ एप्रिल) मुख्यमंत्र्यांशी अनिल शिरोळे यांची चर्चा झाली. त्यानुसार ही बैठक होणार असून “Housing for all” ह्या योजने अंतर्गत ह्या सर्वांना घरे उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे शिरो ळेयांनी सांगितले.
रेल्वे लाईन्स नजीक राहणाऱ्याना कायमस्वरूपी घर; रेल्वे मंत्र्यांसमवेत लवकरच बैठक-खा. अनिल शिरोळे
Date: