….अन नाना भानगिरे मुख्यमंत्र्याच्या गाडीतून थेट रस्त्यावर उतरले

Date:

पुणे-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुण्यात आगमन झाले. त्‍यानंतर त्‍यांचा ताफा विमानतळावरून हडपसरकडे रवाना झाला. मात्र, वाहतुक कोंडीत सापडलेल्या रुग्णवाहिकेला वाट करून देण्यासाठी मुख्यमंत्र्याच्या गाडीतून माजी नगरसेवक नाना भानगिरे थेट रस्त्यावर उतरले आणि रुग्णवाहिकेला वाट करून देत त्यांनी माणुसकी जपली.मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर एकनाथ शिंदे हे पहिल्यांदाच पुण्यात आले होते. त्यामुळे पंढरपूरला जाताना ह़डपसर गाडीतळ येथे माजी नगरसेवक भानगिरे यांनी मुख्यमंत्र्याच्या स्वागताची जय्यत तयारीही केली होती. नियोजित वेळेनुसार रात्री साडेआठ वाजता मुख्यमंत्री पुणे विमानतळावर आले. भानगिरे यांनी त्यांचे विमानतळावर स्वागतही केले आणि मुख्यमंत्र्याच्या गाडीत बसूनच ते हडपसरच्या दिशेने रवाना झाले. मात्र, विमानतळ रस्त्यावर वाहनांची प्रचंड गर्दीत एक रुग्णवाहिका अडकली होती आणि तिला बाहेर काढण्यासाठी एक महिला प्रयत्न करत असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे मुख्यमंत्र्याचा ताफा थांबला. प्रसंगावधान ओळखुन भानगिरे मुख्यमंत्र्याच्या गाडीतून तात्काळ उतरले.

पुढे स्वागतासाठी कार्यकर्ते आणि कुंटुबीय असल्याचे मुख्यमंत्र्यांना सांगत रुग्णवाहिकेला कोंडीतून सोडविण्यासाठी ते मागेच थांबले. पाच-दहा मिनिटात कोंडी सुटली आणि रुग्णवाहिका रुग्णालयाकडे मार्गस्थ झाली. एकिकडे मुख्यमंत्री हडपसरमध्ये पोहचले. मात्र, भानगिरेच सत्काराच्या कार्यक्रमाला नसल्याने उपस्थित कार्यकर्त्यांमध्ये कुजबुज सुरू झाली. अखेर मुख्यमंत्र्यांनीच घडलेला प्रकार सांगितला आणि त्यांचे कौतुकही केले.

एवढचे नाही तर आपण पुन्हा जाहीर कार्यक्रमासाठी नक्की हडपसरमध्ये येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. भानगिरे यांनी थेट मुख्यमंत्र्याचा सत्कार सोडून रुग्णाला वाचविण्यास प्राधान्य दिल्याने उपस्थित नागरिकांमध्ये याचे कौतुक रंगले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

टीईटी पेपरफुटी प्रकरणी काँग्रेसचे सलग तिसऱ्या दिवशी आंदोलन.

शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या राजीनाम्यासाठी विधानसमोर युवक काँग्रेसचे आंदोलन. मुंबई,...

ट्रम्प म्हणाले- पेट्रोल कंपन्यांनी इंधन दर कमी करावेत:कच्चे तेल स्वस्त झाले, तरीही ग्राहकांकडून जास्त पैसे वसूल केले जात आहेत

वॉशिंग्टन डीसी-अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पेट्रोल कंपन्यांना इंधनाचे...

बंगालपासून काश्मीरपर्यंत 1500 किमी लांब मान्सून पट्टा तयार झाला-उत्तर भारतात 1 ते 4 जुलैपर्यंत मुसळधार पावसाची शक्यता

मुंबई- मान्सूनने मंगळवारी दुपारी जम्मू-काश्मीर, लडाख, हिमाचल, उत्तराखंड...