मास्क के साथ साथ…(लेखिका-पूर्णिमा नार्वेकर)

Date:

समोर उभ्या असलेल्या मास्कधारी मुलीने मला स्माईल दिलं, तसं मी ही तिला स्माईल दिलं. नक्की कोण ही?? ते काही आठवत नव्हतं पण तिने ओळख दाखवली म्हणून मी ही दाखवली. ट्रेनमध्ये चढता क्षणी हा आलेला सुखद अनुभव. तशी बऱ्यापैकी गर्दी होती त्यामुळे ‘बसायला मिळेल का?’ हा विचारच मी सोडून दिला आणि मस्त डोअरजवळ उभी राहिले. अजून कोणी ओळखीचं दिसतंय का ते पाहू लागले. चटकन एक गोष्ट लक्षात आली की सगळ्या मास्कधारी आहेतच पण त्यातही व्हरायटी किती! कुणाचे अगदी साधे प्लेन मास्क, कुणाचे युझ अँड थ्रोचे मास्क तर कुणाचे ड्रेसला मॅचिंग मास्क. हे सगळं पाहून गम्मतच वाटली. आता अजून काही महिने मास्क घालायचे आहेत मग त्यात तोचतोचपणा कशाला??

गेल्या वर्षी मार्चमध्ये करोनामुळे लॉकडाऊन झाला आणि त्याबरोबर काही नियमही लागू झाले. सुरक्षित अंतर, सॅनिटाइझर आणि मास्क या गोष्टी अत्यावश्यक झाल्या. सुरुवातीला तर अगदी साधे मास्क, युझ अँड थ्रो मास्कच मिळत होते. मग N-95 मास्क हे जास्त सुरक्षित आहेत असं समजल्यावर त्यासाठी शोधाशोध सुरू झाली. सहजपणे हे मास्क उपलब्ध नव्हते. ऑनलाईन सुद्धा सर्च करून झाले. त्या मास्कना एवढं डिमांड होतं की ते बाजारातून जवळजवळ गायबच झाले किंवा महाग तरी झाले. काही दिवसांत जुने कपडे, रुमालापासून मास्क किंवा ओढणीही मास्क म्हणून कशी बांधायची याचे प्रात्यक्षिक व्हिडीओ सोशल मिडियावर येऊ लागले. बाहेर पडायचं तर कंपल्सरी मास्क , हे हळूहळू अंगवळणी पडू लागलं. आधी तर मास्क घातल्यामुळे अस्वस्थ वाटायचं, मग सवयीने ती भीती कमी होऊ लागली.

जून महिन्यापासून थोडं थोडं अनलॉक व्हायला लागलं आणि माणसं मास्क घालून बाहेर पडू लागले. दुकानं उघडली गेली, कार्यालये चालू झाली. लग्न आणि समारंभाला मर्यादित संख्येच्या अटीवर परवानगी मिळू लागली. तशात मास्कच्याही व्हरायटी बाजारात, ऑनलाइन दिसू लागल्या. मोठ्यांपासून अगदी लहानांपर्यंत सगळ्यांनाच मास्कची इतकी सवय झाली होती की मास्क लावला नाही तर कसंसच वाटू लागलं.

हळूहळू सगळं अनलॉक होऊ लागलं आणि भटकंती, सहलीचे वारे वाहू लागले. मग भेटीगाठीत, समारंभात मास्क काढला तरी चालेल, ‘चलता है’ अशी मानसिकता झाली. मास्क ची जागा आता नाकावरून, गळ्यावर, डोक्यावर तर कधी एकाच कानाला टांगून आणि त्याही पुढे जाऊन मग मास्क पर्स मध्ये किंवा खिशात विराजमान झाला. या थोड्याशा बेफिकीरीमुळे डिसेंबर-जानेवारीत जी रुग्णसंख्या कमी झाली होती तिचा आलेख पुन्हा वाढू लागला. करोना अजून गेलेला नाही, त्यामुळे सर्वतोपरीने सुरक्षिततेची काळजी घेणं महत्त्वाचं आहे. साधे, डिझायनर, मॅचिंग, युज अँड थ्रो कसेही मास्क असले तरी चालतील पण ते घालूनच बाहेर पडायला हवं. अजूनतरी काही दिवस…काही महिने काढायचे आहेत…मास्क के साथ साथ…

© पूर्णिमा नार्वेकर, दहिसर

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

नेपाळ दुर्घटनेतील महाराष्ट्राच्या पर्यटकांसाठी सरकार ‘अलर्ट’; केंद्राशी समन्वयातून बचावाची तयारी

फडणवीसांचा अडकलेल्या पर्यटकांशी व्हिडिओ कॉलवर संवाद; रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी...

नेपाळमध्ये महापूराचा कहर; ३५९ मृतदेह सापडले, २८८ भारतीयांसह १,५०० बेपत्ता

भोटेकोशी नदीत पुन्हा पुराचा धोका; २१ भारतीयांची सुटका, तिबेटमध्ये...

आकाशातही रक्षाबंधनाचा उत्सव; एअर इंडिया एक्सप्रेस प्रवाशांना देणार खास राखी

२७ आणि २८ ऑगस्टला प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी मर्यादित आवृत्तीतील...

पुण्यातील खड्डे म्हणजे भ्रष्टाचाराचे अड्डे — मुकुंद किर्दत

पावसाळा संपत आला तरी कामांना उशीर; १६ कोटींची कामे...