पुणे- पहाटे पावणेचार वाजता लकडी पूल येथे अखिल मंडई मंडळाच्या शारदा गजाननाचे विसर्जन झाले .महापौर मुक्ता टिळक आणि सभागृहनेते श्रीनाथ भिमाले यांनी श्रीमंतांची आरती करून त्यांच्या नयनरम्य मनोहारी रथाचे सारथ्य केले ..
नगरसेवक गोपाल चिंतल ,उमेश गायकवाड ,सुशील मेंगडे आदी यावेळी उपस्थित होते .दगडूशेठ आणि मंडई हे दोन गणपती पहायला असंख्य नागरिक दरवर्षी गर्दी करतात . नागरिकांचा,भाविकांचा ,कार्यकर्त्यांचा यावेळी उत्स्फुर्तपणे जल्लोषात होणारा बाप्पांंच्या जयजयकाराचा जयघोष हा मिरवणुकीचा मानबिंदू असतो .
अपडेट्स-
-मानाचा पहिला कसबा गणपतीचं दुपारी 4.05 वाजता विसर्जन
– मानाचा दुसरा तांबडी जोगेश्वरी गणपतीचं संध्याकाळी 4.55 वाजता विसर्जन
– मानाचा तिसरा गुरुजी तालीम गणपतीचं संध्याकाळी 5.30 वाजता विसर्जन
– मानाचा चौथा तुळशीबाग गणपतीचं संध्याकाळी 6.45 वाजता विसर्जन
– मानाचा पाचवा केसरी वाडा गणपतीचं संध्याकाळी 7.10 वाजता विसर्जन
– सर्वप्रथम मानाचा पहिला कसबा गणपतीच्या आरतीने विसर्जनाच्या मिरणुकीला सुरुवात झाली.
– कसबा गणपती पाठोपाठ मानाचा दुसरा गणपती तांबडी जोगेश्वरी आणि मानाचा तिसरा गणपती गुरुजी तालीम यांच्याही विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली.
– मिरणुकीत हजारो भाविकांनी दर्शनासाठी केली गर्दी
– पुण्यात मानाचे पाचही गणपती विसर्जनासाठी रवाना
– मानाचे 4 गणपती महात्मा फुले मंडईत दाखल
– डीजे, डॉल्बींना बंदी असल्याने पारंपारिक ढोल-ताशांसह निघाल्या मिरणुका
– शहरातील मानाचा पहिला कसबा गणपतीचे विसर्जन करण्यात आले आहे.
पहा हा व्हिडीओ

