पुणे : ‘ए. के. एज्युकेशनल कन्सल्टंट्स’ची (एकेईसी) विद्यार्थ्यांची वर्ष २०१६ ची तुकडी वैद्यकीय शिक्षणासाठी नुकतीच रशियाला रवाना झाली. मुंबईतील छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन रवाना होण्यापूर्वी हे विद्यार्थी व त्यांच्या पालकांसाठी संस्थेतर्फे व्हीआयटीएस हॉटेलमध्ये प्रस्थानपूर्व स्वागत मेळाव्याचे आयोजन करण्यात आले.
विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देण्यासाठी ‘ए. के. एज्युकेशनल कन्सल्टंट्स’चे संचालक डॉ. अमित कामले या मेळाव्याला उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी प्रथम रुग्णसेवेची शपथ (हिप्पोक्रॅटिक ओथ) घेतली. डॉ. कामले यांनी प्रस्थानपूर्व खबरदारीचे कानमंत्र विद्यार्थ्यांना दिले. त्यामध्ये आगमन नियम, नोंदणी व स्थलांतरविषयक औपचारिकता, व्हिसाची मुदतवाढ, विद्यार्थ्यांसाठी विमा व सुरक्षा, वर्ग व व्याख्यानांतील अभ्यास गट, उपस्थितीचे महत्त्व, ‘मेडिकल कौन्सिल ऑफ इंडिया’समवेत पूर्ण करावयाच्या अर्हता प्रमाणपत्र औपचारिकता, बँक खाते उघडणे, शहराचा परिचय, शिक्षक व प्राध्यापकांसमवेतचे वर्तन आदी महत्त्वाच्या मुद्द्यांचा समावेश होता.
डॉ. कामले म्हणाले, की विद्यार्थ्यांनी दडपण न घेता आरामात जावे, यासाठी मी स्वतः त्यांच्यासोबत प्रवास करतो. कारण हे विद्यार्थी रशियात कुणालाही ओळखत नसतात, त्यामुळे त्यांना शहराचा परिचय होईपर्यंत मी तेथे त्यांच्या पालकाची भूमिका बजावतो. या तुकडीतील विद्यार्थ्यांनी ‘कझान स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटी’तील सहा वर्षे मुदतीच्या इंग्रजी माध्यमाच्या वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी नावनोंदणी केली आहे.
डॉ. कामले यांनी विद्यार्थ्यांच्या तुकडीला सोबत करण्याची कटिबद्धता पाळल्याबद्दल पालक समाधानी आणि उल्हसित झाले होते. नावनोंदणी प्रक्रियेदरम्यान ‘ए. के. एज्युकेशनल कन्सल्टंट्स’चे प्रामाणिक प्रयत्न व व्यावसायिकता यांची या पालकांनी प्रशंसा केली. रशियातील सर्वाधिक नामवंत व प्रमुख अशा वैद्यकीय विद्यापीठांमध्ये शिकण्याची संधी मिळाल्याने विद्यार्थीही भारुन गेले.
भारतीय विद्यार्थ्यांना रशियामध्ये दर्जेदार उच्च शिक्षण मिळवून देण्यासाठी ‘एकेईसी’ उत्तम मार्ग पुरवत आहे. अन्य अनेक युरोपीय देश व अमेरिकेच्या तुलनेत रशियातील उच्च शिक्षण किफायतशीर ठरते. रशियातील पदव्यांना जगभर मान्यता आहे. त्यामुळे रशियन सरकारी वैद्यकीय विद्यापीठातून ‘डॉक्टर ऑफ मेडिसीन’ ही पदवी घेतलेला विद्यार्थी भारतात ‘मेडिकल कौन्सिल ऑफ इंडिया, नवी दिल्ली’च्या वतीने ‘नॅशनल बोर्ड ऑफ एक्झॅम्स’ची निवड चाचणी उत्तीर्ण होऊन भारतात प्रॅक्टिस करु शकतो व उच्च पातळीवर कारकीर्द सुरु करु शकतो.
ठाण्यातील अनुजा निकम या विद्यार्थिनीची आई सौ. निकम म्हणाल्या, की ‘एकेईसी’च्या माध्यमातून आमच्या मुलीला परदेशात शिक्षणासाठी पाठवताना खूप अभिमान वाटत आहे. तिच्या सुरक्षिततेची आम्हाला काळजी वाटत नाही. मुंबईचे डॉ. स्वरजित भट्टी हेही या भावनेला अनुमोदन देताना म्हणाले, की माझ्या मुलाने जगभर अत्यंत प्रतिष्ठित संस्था म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘कझान स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटी’ची निवड केली आहे. याकामी डॉ. कामले यांनी केलेल्या अमूल्य मार्गदर्शनाबद्दल मी त्यांचा आभारी आहे.
पुण्याचे राजाराम पाटील म्हणाले, माझी मुलगी चैतन्या आणि मी रशियातील शिक्षणासाठी विद्यार्थ्यांची निवड करणाऱ्या भारतातील सर्व संस्थांचा शोध घेतला. यातील अनेक मध्यस्थ अत्यंत महाग शुल्क आकारतात. डॉ. कामले यांचे मार्गदर्शन आणि सल्ला यामुळे मात्र आम्ही १०० टक्के समाधानी आहोत. यंदाच्या तुकडीतील विद्यार्थी महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक, नागपूर, औरंगाबाद, सांगली, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, उस्मानाबाद, अकोला, सातारा या शहरांतून, तसेच देशातील दिल्ली, छत्तीसगड, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, राजस्थान, कोलकाता या भागांतून आले आहेत.

