मुंबई – नरेंद्र मोदी यांच्या प्रत्येक मित्राकडे १० ते३० हजार करोड रुपयांचे काळे धन असून त्यावर कारवाई होत नाही , नोटबंदीचा निर्णय घेऊन मोदी सरकार सामान्य जनतेच्या खिशातील पैसा काढून घेत आहे. नरेंद्र मोदी हा पैसा उद्योगपतींच्या घशात घालणार आहेत, असा घणाघाती आरोप काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केला.
त्यांनी बुधवारी भिवंडी न्यायालयाकडून जामीन मिळाल्यानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी राहुल यांनी मोदी सरकारच्या पाचशे आणि हजार रूपयांच्या नोटा रद्द करण्याच्या निर्णयावर जोरदार हल्ला चढवला. मोदी सरकार हे केवळ काही १५ २० उद्योगपतींच्या हितासाठी काम करत आहे. गेल्या वर्षभरात सरकारने १५ उद्योगपतींची मिळून १ लाख १० हजार कोटींची कर्जे माफ केली आहेत. नोटबंदीच्या निर्णयामागे देशातील काळ्या पैशाला चाप लावण्याचे कारण सरकारकडून सांगितले जाते. मात्र, सध्या देशभरात बँकेसमोर लागणाऱ्या रांगेत श्रीमंत व्यक्ती दिसतात का, असा सवाल राहुल यांनी विचारला. मोदी यांच्या सोबत विमान परवासात काळे धनवाले काळे धनवाले त्यांचे मित्र असतात असा क्ल्यू देत राहुल यांनी त्यांच्याविरुद्ध कारवाई का होत नाही ?असा सवाल केला काँग्रेस या सगळ्याविरुद्ध लढा देत असून काही झाले तरी या लढाईतून आम्ही एक इंचही मागे हटणार नाही, असे राहुल यांनी सांगितले.
दोन विचारधारांची लढाई सध्या सुरु आहे , देशाला स्वातंत्र्य देणाऱ्या कॉंग्रेसच्या विचारधारेची लढली देशाला गुल्मी कडे नेणाऱ्याशी सुरु आहे. मला खात्री आहे विजय आमचाच होईल . असे ही राहुल गांधी यांनी सांगितले .