~निसर्गाच्या मुक्त उधळणीपासून प्रेरणा घेऊन सौंदर्यपूर्णतेने डिझाइन केलेले अलंकार~
तनिष्क या भारतातील सर्वाधिक पसंतीच्या अलंकार ब्रॅण्डने ‘गुलनाझ’ हे नवीन कलेक्शन लाँच केले आहे. गुलनाझ याचा अर्थ एक असे फूल, जे इतके मोहक आणि सुंदर असते की, ते संपूर्ण उद्यानाची शान होऊन जाते.निसर्गाच्या औदार्याचे सौंदर्यपूर्ण प्रतिनिधित्व करणारी डिझाइन्स हे तनिष्कच्या या नवीन कलेक्शनचे वैशिष्ट्य आहे. या कलेक्शनमधील प्रत्येक दागिना अत्यंत बारकाईने डिझाइन केलेला आणि मोहात पाडणारा आहे. स्त्रीच्या रूपाला पूर्णत्व देणारे हे दागिने आहेत. किंवा या आकर्षक अलंकारांपासून प्रेरणा घेऊन स्त्रिया स्वत:चे एक अनोखे रूप साकारू शकतात. ‘गुलनाझ’ कलेक्शनमध्ये लक्षवेधी हिऱ्याच्या दागिन्यांसोबतच ओपन पोल्कीमधील काही डिझाइन्सही आहेत.
हिरे श्रेणी
या कलेक्शनमधील जडवलेले (स्टडेड) अलंकार म्हणजे पिवळे, गुलबक्षी आणि पांढऱ्या सोन्याची संगती साधणारे फुलांचे आकार व नक्षीकामाची मैफल आहे. दूरवर जाणारी वाट, फुलपाखरे, राखलेली कुंपणे आणि फुलांचे मांडव यांपासून प्रेरणा घेत ही डिझाइन्स तयार करण्यात आली आहेत. या कलेक्शनमध्ये काढण्या-घालण्याजोगी पेंडंट्स असलेले नेकलेसेस; स्टड्स व लोंबते कानातले अशा दोन्ही स्वरूपात वापरता येतील असे जॅकेट इअररिंग्ज आणि पेंडंटसारखे वापरता येतील असे मांग टिके आहेत.
उत्तमरित्या पैलू पाडलेल्या हिऱ्यांसह १८ कॅरट सोन्यात घडवलेले नेकपीस तुमच्या प्रशंसेला नक्कीच पात्र ठरतील, ती त्याच्यावरील फुलपाखरू आणि मधमाशीच्या रोचक स्थानामुळे तसेच गुलाबी सफायरची छाया आणि पट्ट्यापट्ट्यांच्या एनॅमलिंगमुळे. एखाद्या शाही उद्यानातून मारलेल्या सुखद फेरफटक्याची आठवण हे उत्कृष्ट नेकलेस करून देते. हे नेकसेल एका सेटचा भाग आहे.
१८ कॅरटच्या गुलबक्षी आणि पांढऱ्या सोन्यात हाताने घडवलेले हे नेकलेस वसंत ऋतूतील वाऱ्याच्या झुळुकीसारख्या प्रणयासाठी चपखल बसणारे आहे. जपानमधील चेरी ब्लॉझमच्या अलौकिक सौंदर्यापासून प्रेरणा घेत साकुराच्या फुलांचा आणि कळ्यांचा एक नाजूक गुच्छ यात बसवण्यात आला आहे. अभिजात आणि उच्च अभिरूची असलेल्या स्त्रियांसाठीचा हा दागिना आहे. हे नेकलेसही सेटचा भाग आहे.हा नेकपीस आहे आपल्या अंतरीचा दिवा उजळण्यासाठी उत्सुक असलेल्यांसाठी. बागेतील एका लतावेलींची कमान असलेल्या वळणदार रस्त्यांपासून प्रेरणा घेऊन डिझाइन करण्यात आलेला हा दागिना एरवी अभिजात स्वरूपाचा असला तरी त्याला एक समकालीन स्पर्शही आहे. १८ कॅरट गुलबक्षी आणि पांढऱ्या सोन्यात हाताने घडवलेला हा दागिना घातला की कौतुकाची पावती नक्कीच मिळणार. हा नेकलेसही सेटचा भाग आहे.
हा उत्कृष्ट दागिना प्रतिनिधित्व करतो सदाहरित भारतीय उद्यानांचे. १८ कॅरट पिवळ्या सोन्यात घडवलेल्या या दागिन्यात फॅन्सी कट हिऱ्यांचा सुंदर पुंजका बसवलेला आहे. खाली लोंबणारे पेंडंट जीवनवृक्षापासून प्रेरणा घेऊन घडवण्यात आले आहे , विपुलता व अनंताचे प्रतीक म्हणून. या लवचिक नेकलेसमधील पेंडंट काढता-घालता येण्याजोगे (डिटॅचेबल) आहे. त्यामुळे हे नेकलेस सहजही वापरता येईल आणि एखाद्या खास प्रसंगी तयार होण्यासाठीही उपयोगी पडेल.
हे नेकलेस सेटचा भाग आहे.
ओपन पोलकी डिझाइन्स
तनिष्कच्या गुलनाझ कलेक्शनमधील ओपन पोलकी डिझाइन्सचे वैशिष्ट्य म्हणजे फुलांच्या वेली, उसळते कारंजे आणि राजेशाही मुघल बगिच्यांमधील रेशमी पैसले यांसारख्या वैविध्यपूर्ण घटकांचा समावेश.
२२ कॅरट पिवळे सोने आणि ओपन पोलकी यांच्यासह घडवलेला हा दिमाखदार मोराच्या डिझाइनचा सेट घातला की अनेकांच्या माना त्याकडे वळतील हे नक्की. या नेकलेसमधील नाण्यांचा समूह हा केवळ डिझाइनचा भाग नव्हे, तर ते अनेक संस्कृतींमध्ये समृद्धीचे प्रतीक आहे. वैविध्यपूर्ण आकार आणि स्वरूपांचा उत्तम संयोग साधला गेल्यामुळे हा दागिना सणवार आणि लग्नांसारख्या सर्व प्रकारच्या समारंभांसाठी शोभून दिसतो.
हा सोने आणि ओपन पोल्कीचा सेट उद्यानात दिसणारा पानांचा वर्षाव आणि वेलींपासून प्रेरणा घेऊन डिझाइन करण्यात आला आहे. २२ कॅरट पिवळ्या सोन्यात घडवलेला हा देखणा दागिना तुमचा ग्लॅमरचा स्तर नक्कीच वाढवतो.
अत्यंत बारकाईने डिझाइन करण्यात आलेला हा चोकर सेट अभिजातता आणि समकालीनता यांचा परिपूर्ण समतोल आहे. २२ कॅरट पिवळ्या सोन्यात ओपन पोलकीसह हाताने घडवलेल्या या डिझाइनमध्ये सात हिऱ्यांचा संच एकत्रितपणे बसवण्यात आला आहे. हे डिझाइन फुलाचा संपूर्ण बहर डोळ्यापुढे ठेवून करण्यात आले आहे.
सलीपासून प्रेरणा घेऊन तयार करण्यात आलेल्या या नेकलेसमध्ये एखाद्या उद्यानातील संपूर्ण सिम्फनीचा उत्सव साजरा करण्यात आला आहे. खालच्या बाजूला थेंबाच्या आकारातील रंगीत खडे आणि ओपन पोलकी कामामुळे या दागिन्याच्या सौंदर्याला उठाव आला आहे. हा देखणा अलंकार २२ कॅरट पिवळ्या सोन्यात घडवण्यात आला असून, याची उत्कृष्टता कालातीत आहे.
गुलनाझ कलेक्शनमधील दागिन्यांच्या किमतींची श्रेणी २ लाख रुपयांपासून सुरू होत असून तनिष्कच्या भारतभरातील सर्व १९९ स्टोअर्समध्ये हे कलेक्शन उपलब्ध आहे.