पुणे : वेस्टसाइड या टाटा ग्रूपच्या भारतातील आघाडीच्या फॅशन रिटेलर्सने पुण्यामध्ये त्यांचे सातवे स्टोअर सुरू केले. हे स्टोअर जीके मॉल (तळमजला), नाशिक फाटा रोड, पिंपरी सौदागर येथे आहे. या स्टोअरमध्ये कपडे, फूटवेअर व अॅक्सेसरीज उपलब्ध आहेत.
वेस्टसाइड ही देशातील आघाडीची फॅशन रिटेलर आहे. ही कंपनी १२९ स्टोअर्ससोबतच नुकतेच पुण्यामध्ये नवीन सादर करण्यात आलेल्या स्टोअरचे कार्यसंचालन पाहते. या स्टोअरला शहरी व आकर्षक सजावटीचे रूप देण्यात आले आहे आणि विविध सुधारणांसह हे स्टोअर तयार करण्यात आले आहे. या स्टोअरमध्ये फॅशनेबल व ट्रेण्डी कलेक्शन्सचा समावेश असण्यासोबतच टाटा ग्रूपमधील सर्वोत्तम दर्जाच्या वस्तूंचा समावेश आहे. या स्टोअरमध्ये बॉम्बे पैसले, न्युऑन, वार्क, वार्डरोब, उत्सा असे लोकप्रिय वेस्टसाइड ब्रॅण्ड्स उपलब्ध असतील.
वेस्टसाइड विशेषत: आजच्या महिलांसाठी तयार करण्यात आलेल्या समकालीन व आकर्षक कपड्यांची व्यापक रेंज देते. वॉर्डरोबचे ९ टू ९ कलेक्शन असो, कॅज्युअल आणि कॉन्फिडंट एलओव्ही, यंग, एजी व आकर्षक न्यूऑन, सुंदर व कमनीय स्त्रियांसाठीचा सॅसी सोडा अॅण्ड जिआ, तुमची वैयक्तिक फॅशन आणखी सुंदर करण्यासाठी वंडरलव्ह असो, वार्कचे फेस्टिव्ह व आकर्षक कलेक्शन, तरुणांसाठीच्या एथनिक वेअरमध्ये अनेक पर्याय देणारे बॉम्बे पैसले, रेशमी कपड्यांसाठी प्रसिद्ध झुबा असो की कायम लोकप्रिय राहिलेले उत्सा असो… वेस्टसाइडमध्ये प्रत्येकासाठी काही ना काही आहेच.
फॅशनमधील आधुनिक ट्रेण्ड्स कायम राखत वेस्टसाइड पुरुषांसाठी कपड्यांची व्यापक व वैविध्यपूर्ण रेंज देते. पुरुषांसाठी इथे न्युऑन, वेस्टस्पोर्ट, अॅस्कॉट, ईटीए आणि वेस्टस्ट्रीट असे ब्रॅण्ड्स आहेत. वेस्टसाइडच्या कलेक्शनमधील पुरुषांसाठीच्या प्रासंगिक तरीही स्टायलिश अशा कपड्यांमध्ये कम्फर्टेबल लिनन आणि कॉटन शर्ट्स, कॅज्युअल व आकर्षक क्रू नेक टीज, कार्गो पँट्स, क्राँट्रा फॉर्मल क्लोदिंग आणि अशा अनेक पर्यायांचा समावेश आहे.
लहान मुलांना आकर्षक ड्रेसेस घेण्याची इच्छा असलेले पालक वेस्टसाइडमधील बेबी हॉप, हॉप आणि वाय अॅण्ड एफ सारख्या ब्रँड्ससह त्यांच्या लहान मुलांना स्टाइलिश बनवू शकतात. या ब्रॅण्ड्सच्या डेनिम्स व पोलो टीजपासून क्युट दिसणारे पफ स्लीव्ह्ज टीशर्ट्स आणि बरेच काही इथे आहे.
या स्टोअर्समध्ये स्टुडिओ वेस्टही असणार आहे. हा ब्रॅण्ड समकालीन भारतीय स्त्रीला देतो कॉस्मेटिक्स, अप्रतिम फ्रेगनेन्स आणि एक्झॉटिक बाथ अॅण्ड बॉडी प्रोडक्ट्सची व्यापक रेंज.
ट्रेण्टविषयी :
१९९८ मध्ये सुरू झालेला ट्रेण्ट हा टाटा ग्रूपचा भाग आहे. त्यांचे मुख्यालय मुंबईत असले तरी त्यांची कार्यव्याप्ती भारतभर आहे. ट्रेण्टतर्फे भारतातील सर्वात मोठी आणि सर्वाधिक वेगाने वाढणारी वेस्टसाइड ही रीटेल चेन चालवली जाते.
या कंपनीने आजवर ६३ शहरांमध्ये ८००० ते ३४००० चौ.फूट अशा जागेत १२९ वेस्टसाइड स्टोअर्स सुरू केली आहेत. वेस्टसाइडमध्ये त्यांच्या स्वत:च्या ब्रँडेड फॅशनेबल कपड्यांची व्यापक श्रेणी उपलब्ध आहे आणि कंपनीच्या रीटेल व्यवसायातील हा सातत्याने एक मुख्य भाग राहिला आहे. यात महिला, पुरुष आणि लहान मुलांसाठीचे कपडे, फूटवेअर, कॉस्मेटिक्स, परफ्युम्स आणि हँडबॅग्स, घरगुती फर्निचर अॅक्सेसरी, लाँजरी आणि भेटवस्तू असे विविध विभाग आहेत.