पुणे : इन्फोसिस पुणे डेव्हलपमेंट सेंटर (डीसी) इको क्लबतर्फे प्रदूषणविरोधातील यात्रेचे, 20 डिसेंबर 2017 रोजी शहरातील फेज 2 कॅम्पस ते फेज 1 कॅम्पस पर्यंत आयोजन करण्यात आले आहे. रस्त्यावरील वाहनांमुळे हिंजवडी परिसरातील वाढत्या प्रदूषणाच्या विळख्याबाबत लोकांमध्ये जागृती करण्यासाठी या यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.
अलिकडच्या काही वर्षांत, रस्त्यांवरील वाहनांची संख्या आणि भारताच्या प्रमुख शहरांतील पायाभूत विकासकामांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढली आहे, यामुळे प्रदूषणाची पातळीसुद्धा वाढली आहे. खास करून, थंडीच्या दिवसांमध्ये हा प्रश्न डोकं वर काढतो, धूर आणि धुकं यांचं मिश्रण तयार होऊन, श्वास घेणंही अवघड होतं. त्या तुलनेत पुण्याची परिस्थिती बरी असली, तरी जेथे विकासकामे होत आहेत किंवा वाहनांची संख्या जास्त आहे अशा भागामध्ये धूरक्याचं प्रमाण वाढतं आहे, आणि शहरभर ते पसरायला वेळ लागणार नाही.
या यात्रेमुळे मोठ्या प्रमाणावर जागरुकतेचा प्रसार केला जाणार आहे, हिंजवडीमधील प्रदूषणामुळे निर्माण होणाऱ्या आरोग्याच्या समस्यांबाबत प्रवाशांना जाणीव करून दिली जाणार आहे. 100-200 इन्फोसिसचे कर्मचारी प्रदूषणविरोधातील आणि प्रो पब्लिक-ट्रान्सपोर्टेशन बॅनर्स/प्सेलकार्ड हातात धरून, मास्क घालून फेज 2 ते फेज 1 पर्यंत ही यात्रा करतील. याशिवाय सार्वजनिक बस वाहतूक आणि कारपूल व्हेंडर्स यांचेही प्रतिनधी या यात्रेत सहभागी होतील, यात मेट्रोझिप, क्विकराइड आणि ग्रिटिंग सोल्यूशन्स आणि ग्रीनपीस आणि एसपीटीएमसारख्या एनजीओंचा समावेश आहे. इन्फोसिस पुणे इको क्लब या उपक्रमाद्वारे शहरातील नागरिकांमध्ये जागरुकता पसरवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करणार आहेत.