नवी दिल्ली– सॅसमंग इंडिया या स्मार्टफोन्सच्या भारतातील सर्वात मोठ्या आणि विश्वासार्ह ब्रँडने गॅलेक्सी जे ७ प्राइम २ लाँच केले असून त्यात डिझाइन आणि सुधारित कामगिरी यांचा मिलाफ साधण्यात आहे. भारतात विकला जाणारा प्रत्येक तिसरा फोन हा गॅलेक्सी जे असून तो देशातील सर्वात लोकप्रिय स्मार्टफोन मालिका बनला आहे.
गॅलेक्सी जे ७ प्राइम २ मध्ये ५.५ इंची पूर्णपणे एचडी लार्ज स्क्रीन आहे, ज्यामुळे पाहाण्याचा अनुभव उंचावतो, तर सुव्यवस्थित डिझाइनमुळे फोन पकडणे सोपे झाले आहे. या उपकरणाला पूर्णपणे मेटलची युनिबॉडी, २.५ डी ग्लास आणि पुढच्या बाजूस असलेल्या फिंगरप्रिंट स्कॅनरसह बसवण्यात आली आहे.
गॅलेक्सी जे ७ प्राइम २ चा कॅमेरा प्रत्येक क्षण फोटोत कैद करुम तो इतरांसोबत शेअर करण्याची आवड असलेल्या आजच्या तरुणाईला आकर्षक वाटेल असा आहे. गॅलेक्सी जे ७ प्राइम २
मध्ये १३ एमपीचा फ्रंट आणि रिअर कॅमेरा आहे. या दोन्ही कॅमेऱ्यांचे अर्पाचर एफ/१.९ असल्यामुळे जे७ प्राइम २ कमी प्रकाशात उत्तम फोटो घेणारा अशाप्रकारचा सर्वोत्तम फोन बनला आहे.
१.६ जीएचझेड एक्सनॉस ऑक्टो- कोअर प्रोसेसरची जोड लाभलेल्या गॅलेक्सी जे ७ प्राइम २ ला ३ जीबी रॅम आणि ३२ जीबीचे स्टोअरेज मिळाले आहे. मायक्रोएसडी कार्डामुळे मेमरी २५६ जीबीपर्यंत विस्तारता येऊ शकते.
गॅलेक्सी जे ७ प्राइम २ मध्ये सॅमसंगचे अत्याधुनिक मेक इन इंडिया इनोव्हेशन – सॅमसंग मॉल प्रीलोड करण्यात आले आहे. या क्रांतीकारी सुविधेमुळे युजर्सना केव्हाही खरेदी करता येते. सॅमसंग मॉलमुळे युजरला केव्हाही एखाद्या उत्पादनाचा फोटो काढून किंवा फोनच्या गॅलरीत असलेली एखादी इमेज वापरून तशाच प्रकारचे उत्पादन ऑनलाइन शोधता येते.
या फोनमध्ये सॅमसंग पे मिनीची सोयही करण्यात आली आहे, जी भारतीय मध्यमवर्गाच्या गरजा पुरवण्यासाठी खास तयार करण्यात आली आहे. सॅमसंग पे मिनी सरकारच्या युनिफाइड पेमेंट्स इंटरफेज (यूपीआय) तसेच ई- वॉलेटला सर्वसमावेशक व्यासपीठ पुरवते.
गॅलेक्सी जे ७ प्राइम २ ची किंमत १३,९९० रुपये आहे. हा स्मार्टफोन काळ्या आणि सोनेरी रंगात देशभरातील सॅमसंग इंडियाच्या सर्व रिटेल दालनांमध्ये उपलब्ध करण्यात आला आहे.