जीजेईपीसीतर्फे 36व्या इंडिया इंटरनॅशनल ज्वेलरी शोचे आयोजन

Date:

मुंबई: जेम अँड ज्वेलरी एक्स्पोर्ट प्रमोशन कौन्सिलने (जीजेईपीसी) इंडिया इंटरनॅशनल ज्वेलरी शो – आयआयजेएस प्रीमिअर 2019 या जगातील सर्वात आघाडीच्या व प्रतिष्ठित जेम अँड ज्वेलरी शोच्या 36व्या पर्वाचे आयोजन केले आहे. हा शो 9 ते 12 ऑगस्ट 2019 या कालावधीत मुंबईतील गोरेगाव येथील बॉम्बे एक्झिबिशन सेंटर येथे होणार आहे.

महाराष्ट्राचे शालेय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री आशीष शेलार यांच्या हस्ते आयआयजेएस प्रीमिअर2019 चे उद्घाटन करण्यात आले. या वेळी, जीजेईपीसीचे अध्यक्ष प्रमोद कुमार अग्रवाल, प्रमुख पाहुणे, पॉल रॉली, कार्यकारी उपाध्यक्ष, डायमंड ट्रेडिंग अँड डिस्ट्रिब्युशन, दे बीअर्स ग्रूप; आणि एव्हजेनी आगुरीव, संचालक, युनायटेड सेलिंग ऑगनायझेशन, अलरोसा; व कोलिन शाह (उपाध्यक्ष, जीजेईपीसी), मन्सुख कोठारी (समन्वयक,राष्ट्रीय प्रदर्शने, जीजेईपीसी), किरीट भन्साळी (सह-समन्वयक, राष्ट्रीय प्रदर्शने, जीजेईपीसी व प्रशासकीय समिती,जीजेईपीसी) व सव्यसाची रे (ईडी, जीजेईपीसी) उपस्थित होते. आयआयजेएस प्रीमिअर 2019ने  1,300+ प्रदर्शक, 2,500+ बूथ व 800+ भारतीय शहरांतील व 80 देशांतील 40,000 जागतिक ट्रेड व्हिजिटर अशा सहभागाच्या बाबतीत नवा बेंचमार्क निर्माण केला आहे.

जीजेईपीसीचे अध्यक्ष प्रमोद कुमार अग्रवाल म्हणाले, “भारतातील जेम व ज्वेलरी ट्रेडने बदलत्या जागतिक स्थितीनुसार बदल अंगिकारणे आवश्यक आहे. बदलत्या जागतिक स्थितीमध्ये भारताचे स्थान सक्षम आहे. अमेरिकेने जेम अँड ज्वेलरीच्या चीनच्या निर्यातीवर 10% शुल्क आकारले असल्याने भारताला 6 अब्ज डॉलरचा बाजारहिस्सा मिळवण्याची संधी निर्माण झाली आहे. एका बाजूला, भारत पूर्वेकडच्या देशांबरोबर व्यापाराच्या वाटाघाटी करत आहे आणि आम्ही 1/3 जागतिक व्यापाराचे नियंत्रण करणाऱ्या आणि चीन, भारत-जपान सीईपीए, भारत-कोरिया सीईपीए यांचा समावेश असणाऱ्या आरसीईपीबरोबर द्विराष्ट्रीय व बहुराष्ट्रीय व्यापार करार करण्याच्या दिशेने वाटचाल करत आहोत. जगभरात या क्षेत्रापुढे आव्हाने आहेत आणि उत्पादनासाठी मागणीमध्ये सातत्य ठेवणे अतिशय महत्त्वाचे आहे. आम्ही बैठका घेतल्यावर व प्रतिनिधीत्व केल्यावर, दे बीअर्स जगभर अंदाजे 175 दशलक्ष डॉलरची गुंतवणूक करत आहे आणि अलरोसाही हिरे उत्पादकांच्या संघटनेद्वारे व त्यांच्या वैयक्तिक कार्यालयांद्वारे निधी देत आहे.”

“2025 पर्यंत, जेम अँड ज्वेलरी निर्यातीमध्ये 75 अब्ज डॉलरपर्यंत वाढ करण्याचे व अतिरिक्त 2 दशलक्ष नोकऱ्या निर्माण करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. मंत्री पियूष गोएल आणि तकेंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्रालयातील त्यांची संपूर्ण टीम या उद्योगासाठी मोठा पाठिंबे देते. त्यांनी नुकत्याच जाहीर केलेल्या व्यापाराच्या दृष्टीने सोयीस्कर धोरणांसाठी त्यांचे आभार मानायला हवेत. सरकारने अलीकडेच लॅब-ग्रोन/सिंथेटिक डायमंडसाठी 8-आकडी एचएस कोड जाहीर केला आहे. यामुळे, रफ व पॉलिश्ड सिंथेटिक डायमंडसाठी विशिष्ट एचएस कोड लवकर अवलंबणाऱ्यांमध्ये भारताचाही समावेश झाला आहे. एचएस कोड हा ग्राहकोपयोगी व व्यापारासाठी उपयुक्त उपक्रम असून त्यामुळे व्यवसाय करणे अधिक अनुकूल ठरते. लहान ज्वेलरी निर्यातकांना उत्तेजन देण्यावर आणि निर्यातीद्वारे देशात मूल्य निर्माण करण्यावर कौन्सिल प्रामुख्याने भर देणार आहे. आम्ही स्वास्थ्य कोश फंडाद्वारे परिचय कार्डधारकांना मेडिक्लेम विमा योजना देणार आहोत. या प्रकल्पाला निधी पुरवण्यासाठी  आम्ही दे बीअर्स व अलरोसा यांच्याशी संपर्क केला आहे. आम्ही सरकारकडून 2.5 दशलक्ष परिचय कार्डे वितरित करण्याचे लक्ष्य ठेवले आहे.” जीजेईपीसीने जेम व ज्वेलरी क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या कामगारांसाठी परिचय कार्ड दाखल केले आहे.त्यांना बँकांकडून आर्थिक पाठिंबा मिळवून देणे आणि कस्टमाइज्ड आरोग्य विमा योजना याद्वारे चांगल्या आरोग्यसेवा देणे, हे यामागील उद्दिष्ट आहे,” असे अग्रवाल यांनी सांगितले.

अग्रवाल यांनी नमूद केले, “मुंबईतील सीप्झ, जयपूरमधील सितापुरा, दिल्लीतील नोएडा, गुजरातमधील सुरत ही अमेरिका व चीन यांना जेम व ज्वेलरी निर्यात करणारी मुख्य केंद्रे असल्याने कौन्सिलने एसईझेड धोरणाबाबत केलेल्या शिफारसींची जलद अंमलबजावणी करावी, अशी आमची सरकारला विनंती आहे. आम्ही या उद्योगाच्या पायाभूत सुविधा विकासावरही भर देत आहोत. गुजरातमध्ये कॉमन फॅसिलिटी सेंटर्स (सीएफसी) स्थापन केल्यानंतर, कोइम्बतूर, कोलकाता, हैदराबाद, राजकोट, दिल्ली, भावनगर, अहमदाबाद व सुरत अशा महत्त्वाच्या जेम व ज्वेलरी क्लस्टरमध्येही सीएफसी स्थापन करण्याचे आमचे नियोजन आहे. एनसीएईआरच्या सहयोगाने कौन्सिल भारतातील सर्व जेम अँड ज्वेलरी क्लस्टर्समध्ये मॅपिंग स्टडी आयोजित करत आहे. यामुळे कौन्सिलला सर्व क्लस्टरसाठी विकासाचे नियोजन करणे शक्य होणार आहे.”

महाराष्ट्राचे शालेय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री आशीष शेलार यांनी सांगितले, “ज्वेलर्स मौल्यवान स्टोनचा शोध घेतात, त्यातून हिरे घडवण्यासाठी त्यांना आकार व स्वरूप देतात. अशाच प्रकारे, आम्हीही देशाचे भविष्य घडवू शकतील, अशा गुणवान व्यक्ती हेरतो. महाराष्ट्राने उद्योगांना व उद्योजकतेला नेहमी पाठिंबा दिला आहे आणि आम्ही जेम अँड ज्वेलरी व्यवसायालाही पाठिंबा देऊ केला आहे. नवी मुंबई येथे देशातील पहिलेवहिले ज्वेलरी पार्क साकारण्यासाठी राज्याने जीजेईपीसीला संपूर्ण पाठिंबा आणि सहकार्य दिले आहे. माझ्या मते, ज्वेलरी पार्कमध्ये अंदाजे 14,000 कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाईल आणि त्यातून 1 लाख नोकऱ्या निर्माण होतील. आपल्या प्रकल्पामध्ये व कारखान्यामध्ये अधिक गुंतवणूक करण्याचा विचार करणाऱ्या एमएसएमई ज्वेलरी उत्पादकांना व निर्यातकांना आवश्यक असणाऱ्या पायाभूत सुविधा व फायदे देण्याच्या बाबतीत महाराष्ट्र आघाडीवर असेल. कौन्सिल जेम अँड ज्वेलरी क्षेत्राच्या कल्याण्याच्या दृष्टीने मेडिक्लेम व अनुदानीत आरोग्य विमा योजना या रूपामध्ये गुंतवणूक करत आहे, हे आनंदाची बाब आहे.” जीजेईपीसीने 2015 मध्ये सुरू केलेल्या स्वास्थ्य रत्नद्वारे अनुदानित आरोग्य विमा दिला जातो आणि मे 2019 पर्यंत 4.70 लाख जणांना विमाकवच देण्यात आले आहे व 100 कोटी रुपयांहून अधिक रकमेचे वितरण करण्यात आले आहे.

पॉल रॉली, कार्यकारी उपाध्यक्ष, डायमंड ट्रेडिंग अँड डिस्ट्रिब्युशन, दे बीअर्स ग्रूपयांनी सांगितले, “जागतिक जेम अँड ज्वेलरी उद्योगासमोर असलेल्या अंतर्गत व बाह्य आव्हानांच्या धर्तीवर, भारतीय जेम अँड ज्वेलरीनिर्यातकांचा उत्साह, व्यवसायकौशल्य व व्यवसायासाची प्रेरणा कौतुकास्पद आहे. भारत ही जागतिक जेम अँड ज्वेलरी व्यापाराची नस आहे. काही वर्षांमध्ये, जगातील दोन तृतियांश तरुण लोकसंख्या ही भारतात असेल.आयआयजेएस प्रीमिअर 2019 मुळे जागतिक जेम अँड ज्वेलरी व्यापाराला नवा आयाम मिळणार आहे. विविध संधींचा लाभ घेण्यासाठी व मागणीला चालना देण्यासाठी आम्ही एकत्रितपणे आणि कौन्सिलच्या सहयोगाने काम करणार आहोत.” एव्हजेनी आगुरीव, संचालक, युनायटेड सेलिंग ऑगनायझेशन, अलरोसा यांनीही जीजेईपीसीला पाठिंबा दर्शवला आहे.

जीजेईपीसीने जयपूरमधील ज्वेलर्स असोसिएशनच्या सहयोगाने जयपूर येथे जेम बोर्स सुरू करण्याचे नियोजन केले आहे. जेम बोर्समध्ये कलर्ड जेमस्टोन उत्पादकांची व व्यापाऱ्यांची 2000 हून अधिक कार्यालये असतील, तसेच बँका, कस्टम्स व अन्य सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध असतील. यामुळे आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय ग्राहकांना सर्व प्रकारचे जेमस्टोन एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहेत. जीजेईपीसीची मुंबई, दिल्ली, जयपूर, सूरत, वाराणसी व उडुपी येथे ज्वेलरी इन्स्टिट्यूट आहेत. त्यातील काही इन्स्टिट्यूट ग्रॅज्युएशन व पोस्ट-ग्रॅज्युएशन कोर्सही चालवतात.

आयआयजेएस प्रीमिअर 2019 मध्ये, बूथचे विभाजन विशिष्ट विभागांमध्ये करण्यात आले आहे: मास प्रोड्युस्ड, प्लेन गोल्ड, लूज स्टोन, इंटरनॅशनल पॅव्हेलिअन्स, सिंथेटिक्स व सिम्युलंट्स, लॅबोरेटरीज व शिक्षण, अलाइड, हॉल ऑफ इनोव्हेशन व स्पेशल क्लस्टर्स (एमएसएमई क्षेत्र).

आयआयजेएस प्रीमिअर 2019 च्या निमित्ताने जीजेईपीसीने ‘ज्वेलर्स फॉर होप’ या चॅरिटी डिनरचेही आयोजन केले आहे. या वर्षी, चॅरिटीतून मिळालेली रक्कम इंडियन आर्मी वेल्फेअर, ट्रायबल इंटिग्रेटेड डेव्हलपमेंट अँड एज्युकेशन ट्रस्ट (टीआयडीई) व श्रीमद रामचंद्र लव्ह अँड केअर (एसआरएलसी) यांना दिली जाणार आहे.

जीजेईपीसीने 9 ऑगस्ट 2019 रोजी निवडक आयआयजेएस व्हिजिटरसाठी विशेष नेटवर्किंग संध्येचे आयोजन केले आहे. आयआयजेएस सहभागींना व्यवसायाच्या संधी वाढवण्यासाठी नेटवर्किंग व्यासपीठ निर्माण करण्याच्या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

आयआयजेएस मशीनरी शो मुंबईतील हॉटेल ललित व हॉटेल लीला सहार विमानतळ येथे होत असून त्यामध्ये इटली, जर्मनी, तुर्कस्तान, अमेरिका व यूएई येथील 24 आंतरराष्ट्रीय प्रदर्शकांसह एकूण 155 प्रदर्शक सहभागी होणार आहेत. दर्शवली जाणारी उत्पादने आहेत: दागिने उत्पादक मशीन, हिरे उत्पादक मशीन, जेमस्टोन्स मशीनरी, कास्टिंग व इलेक्ट्रिक उपकरणे, प्रेशिअस अलॉय, रिफायनरी इंग्रेडिएंट्स, साधने व उपकरणे, बॉक्स व पॅकेजिंग, आयटी व सॉफ्टवेअर सोल्यूशन्स, अलॉय, इ.

स्पेक्ट्रम सेमिनार सीरिज पुढील संकल्पनेवर आधारित असेल – ‘ज्वेलरीसाठी वाढीचे धोरण – रिटेल वाढ, कौशल्यांमध्ये वाढ, शिक्षणाचा दर्जा उंचावणे व ज्ञानाची पातळी वाढवणे; करप्रणाली व जीएसटी यांच्याशी संबंधित समस्या; नैसर्गिकपणे खाणीतून काढलेले व प्रयोगशाळेत तयार केलेले हिरे.

जीजेईपीसीविषयी: जेम अँड ज्वेलरी एक्स्पोर्ट प्रमोशन कौन्सिलची (जीजेईपीसी) स्थापना केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्रालयाने सन 1966 मध्ये केली. स्वातंत्र्यानंतरच्या काळात भारताच्या अर्थव्यवस्थेने आंतरराष्ट्रीय बाजारांत प्रवेश करण्यास सुरुवात केल्यावर देशाच्या निर्यातीला चालना देण्यासाठी भारत सरकारने स्थापन केलेल्या अनेक एक्स्पोर्ट प्रमोशन कौन्सिल्समध्ये (ईपीसी) जीजेईपीसीचा समावेश होता. 1998 मध्येजीजेईपीसीला स्वायत्त दर्जा देण्यात आला. जीजेईपीसी ही जेम्स व ज्वेलरी उद्योगासाठी सर्वोच्च संघटना आहे आणि आज या क्षेत्रातील 6,000 हून अधिक निर्यातकांचे प्रतिनिधीत्व आहे. मुंबईमध्ये मुख्यालय असणाऱ्याजीजेईपीसीचे प्रादेशिक कार्यालय नवी दिल्ली, कोलकाता, चेन्नई, सूरत व जयपूर येथे आहेत. ही सर्व उद्योगाची प्रमुख केंद्रे आहेत. त्यामुळे संस्थाची व्याप्ती व्यापक आहे व सदस्यांना थेट व अधिक चांगली सेवा देण्यासाठी त्यांच्याशी संवाद साधला जातो. गेल्या दशकाहून अधिक काळात, जीजेईपीसीने सर्वात सक्रिय ईपीसी म्हणून नाव मिळवले आहे, तसेच आपल्या प्रमोशनल उपक्रमांची व्याप्ती वाढवण्यासाठी आणि सदस्यांसाठी सेवांमध्ये वाढ करण्यसाठी सातत्याने प्रयत्न केले आहेत.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पाश्चात्य संगीतापेक्षा शास्त्रीय संगीत आणि नृत्यातून वेगळा आनंद मिळतो

नामदार चंद्रकांतदादा पाटील यांची भावना पंडिता रोहिणी भाटे नृत्य महोत्सवाचे...

सोशल मीडियावर औरंगजेबाचं समर्थन: पुण्यात दोघांवर कारवाई

पुणे-राज्यभरात औरंगजेबच्या कबरवरुन राजकीय वाद सुरु असतानाच त्याचे गंभीर...