अॅटलास कॉप्को या शाश्वत उत्पादकता सोल्यूशन्स पुरवणाऱ्या आघाडीच्या कंपनीने भारतातील चाकण येथील आपल्या कारखान्याला सोलार पॅनलद्वारे वीजपुरवठा करण्यास सुरुवात केली आहे. या निर्णयामुळे, व्यवसायामुळे होणारा पर्यावरणीय परिणाम सातत्याने कमी करण्याचे अॅटलास कॉप्कोचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी मदत होणार आहे.
या अद्ययावत प्रकल्पाचे उद्घाटन 2013 मध्ये करण्यात आले. त्यामध्ये भारतीय व जागतिक बाजारासाठी औद्योगिक व पोर्टेबल कॉम्प्रेसर्सची निर्मिती केली जाते. एअर कंडिशनिंगची गरज भासू नये म्हणून रुफ इन्सुलेशनसह, सुरुवातीपासूनच या प्रकल्पात ऊर्जाक्षमतेवर भर देण्यात आला आहे. पावसाचे पाणी साठवण्यासाठी केलेल्या पर्यावरणपूरक डिझाइनमुळे वर्षातून 8 महिने पाण्याची उपलब्धता होते. कारखान्याची ही ग्रीन इमारत लीडच्या (लीडरशिप इन एन्व्हॉयर्नमेंटल एनर्जी अँड डिझाइन) सर्वोत्तम पद्धतींना अनुसरून आयजीबीसी (इंडियन ग्रीन बिल्डिंग काउन्सिल) गोल्ड प्रमाणित आहे. तसेच, कारखान्याला आयएसओ 14001, ओएचएसएएस 18001, आयएसओ 9001 य तिहेरी प्रमाणपत्राबरोबरच, ऊर्जा व्यवस्थापनासाठी 2016 मध्ये आयएसए 50001 प्रमाणपत्र मिळाले आहे.
अॅटलास कॉप्कोने ऊर्जाक्षमतेला सर्वोच्च प्राधान्य दिले आहे आणि हा आधुनिक कारखाना उत्पादन प्रकल्पाबाबत भारतात नवे मापदंड निर्माण करत असल्याचा आम्हाला अभिमान वाटतो,” असे अॅटलास कॉप्कोच्या कॉम्प्रेसर टेक्निक बिझनेसचे अध्यक्ष व्हॅग्नर रेगो यांनी सांगितले. “यामुळे पर्यावरण व आमचे अर्थकारण या दोन्हीना फायदा मिळणार आहे.”
अॅटलास कॉप्को प्रॉडक्ट कंपनी, चाकण, ही लीन उत्पादनातील आघाडीची कंपनी असून ती सातत्याने सुधारणा करत असते, जसे, छतावर सोलार सेल्स बसवणे. हा प्रकल्प आता विजेच्या बाबतीत स्वायत्त झाला असून त्यास 80% अपारंपरिक ऊर्जा पुरवली जाते. हा कारखाना आता दरवर्षी 600 टन कार्बन डायऑक्साइडचे उत्सर्जन रोखणार आहे.