पुणे: मार्स, इनकॉर्पोरेटड आणि टाटा ट्रस्टस् ने आज, सर्व समाजगटातील जनतेच्या पोषणविषयक दरी सांधण्यास सहाय्य करत भारताचे लक्ष्य गाठण्यासाठीच्या आपल्या धोरणात्मक भागीदारीचा पुढचा टप्पा साजरा केला. अधिक चांगले पोषण देऊ करण्यासाठी ते विविध मार्गांचा अवलंब करणार आहेत. यात स्थानिक पातळीवर तयार करण्यात आलेला प्रथिनयुक्त, पोषक आहार पुरवण्याचा एक मार्ग असणार आहे. सहकार्यातून उभ्या राहिलेल्या या नव्या उपक्रमाचे उद्घाटन मार्स, इनकॉर्पोरेटेडचे अध्यक्ष श्री. स्टीफन बॅजर आणि टाटा ट्रस्टस् चे व्यवस्थापकीय विश्वस्त श्री. आर. वेंकटरमणन् यांच्या हस्ते झाले. यावेळी दोन्ही संस्थांमधील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
या भागीदारीमुळे या दोन्ही संस्थांना, समाजाला भेडसावणाऱ्या विविध आव्हानांचा सामना करण्यासाठी आपले अधिक सहकार्य देणे शक्य होणार आहे. जसे कि, या उपक्रमात परवडणाऱ्या दरात पोषण उपलब्ध करून दिले जाणार आहे.
मानवी आरोग्य आणि वेलनेसवर लक्ष केंद्रीत करणारा आपला विभाग मार्स एज या लक्ष्यित पोषणाच्या माध्यमातून मार्स हा उपक्रम पार पाडणार आहे. लक्षणीय आणि दृश्य परिणाम देऊ शकतील आणि दैनंदिन जीवनात सहज सामावून जातील असे सोपे, मजेदार व सुयोग्य पोषण पर्याय निर्माण करण्यासाठी आधुनिक विज्ञान, माहिती आणि तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी मार्स एजची स्थापना करण्यात आली आहे.
कुपोषणासंदर्भात टाटा ट्रस्टस् तर्फे त्रीस्तरीय दृष्टिकोन ठेवण्यात आला आहे. इंटिग्रेटेड चाइल्ड डेव्हलपमेंट सर्विसेस (आयसीडीएस) सारख्या सध्याच्या प्रणालींना सक्षम करण्यासाठी सरकारला साह्य करणे, अन्नातील पोषणद्रव्ये सुधारण्यासंदर्भातील योजना आणि त्याचा प्रसार यासाठी सरकारसोबत काम करणे आणि मार्ससोबत सध्या जी भागीदारी आहे त्यापद्धतीने परवडणाऱ्या पोषक उत्पादनांची निर्मिती आणि वितरण यात थेट साह्य करणे अशाप्रकारे ही जबाबदारी पार पाडली जाणार आहे. पोषणासंदर्भातील प्रकल्पांच्या बाबतीत या ट्रस्टस् चा विश्वास आहे की, पोषणाचे लक्ष्यित परिणाम गाठण्यासाठी गरिबी दूर करणे, आरोग्य, शिक्षण आणि स्वच्छता यांसारख्या मुद्दयांमध्ये विविध क्षेत्रांचा सहभाग असायला हवा. या सर्व प्रश्नांमध्ये ट्रस्टस् तर्फे मोठ्या प्रमाणावर उपक्रम राबवले जातात आणि त्यांना साह्य केले जाते.
मार्स, इनकॉर्पोरेटेडच्या संचालक मंडळाचे अध्यक्ष श्री. स्टीफन बॅजर म्हणाले, “संपूर्ण जग मोठ्या प्रमाणावर सामाजिक, पर्यावरणीय आणि आरोग्य क्षेत्रातील आव्हानांचा सामना करत आहे. यासाठी दूरगामी दृष्टिकोन असणाऱ्या भागीदारी आणि सहकार्यांची आवश्यकता आहे. एक जागतिक व्यवसाय म्हणून आमचा विश्वास आहे की, परिणाम घडवून आणणाऱ्या आणि व्यवहार्य उत्पादनांची निर्मिती करून समाजाला भेडसावणाऱ्या काही समस्यांचा सामना करणे ही आमची जबाबदारी आहे आणि आमच्यामध्ये ती क्षमता आहे. भारतातील पोषण आणि जीवनमानाचा दर्जा सुधारण्याप्रति असलेल्या
टाटा ट्रस्टस् च्या घनिष्ठ बांधिलकीमुळे ते आमचे भागीदार असणे हे साहजिकच ठरते, यामुळे आम्ही रोमांचित झालो आहोत.”
टाटा ट्रस्टस् चे अध्यक्ष श्री. रतन एन. टाटा म्हणाले, “एक राष्ट्र म्हणून संपूर्ण राष्ट्राला उपयुक्त ठरतील असे महत्त्वाचे मुद्दे हाती घेणे यावर टाटा ट्रस्टस् चा विश्वास आहे. पोषण हा असाच एक मुद्दा आहे कारण त्यामुळेच माणसांच्या आयुष्याचा आणि त्यांच्या यशाचा दर्जा सुधारतो. या बहुउद्देशीय कार्यक्रमासाठीच्या संयुक्त उपक्रमात मार्स आमच्यासोबत आहेत, याचा मला आनंद आहे.”
दृष्टिकोन आणि उद्दिष्ट यांच्यातील साम्यात या भागीदारीची मुळे रोवली गेली आहेत. या सहकार्यातून दोन्ही संस्थांची वैशिष्ट्ये एकत्र होणार आहेत. मार्स एजतर्फे नाविन्यता आणि निर्मिती विकास क्षमता, विक्री आणि विपणन कौशल्य यांची भर घातली जाईल तर टाटा ट्रस्टस् चे भारतातील पोषणासंदर्भातील ज्ञान, स्थानिक समाज आणि त्यांच्या गरजांबद्दलची समज आणि वितरण जाळे या कामी वापरले जाईल.
इतर अनेक उद्दिष्टांसोबतच भारतातील पोषणाच्या समस्येवर काम करण्यासाठी मार्स आणि टाटा ट्रस्टस् ने २०१६ साली सामंजस्य करारावर सह्या केल्या. या भागीदारीतून शाळेत जाणा-या मुलांसाठी पहिले नाविन्यपूर्ण उत्पादन येणार आहे गोमो™ दाल क्रंचीज्. शालेय वयोगटासाठीचा हा पदार्थ प्रथिने आणि मायक्रोन्युट्रियंट्सयुक्त असणार आहे. गोमो™ दाल क्रंचीज् मार्सच्या पुण्यातील कारखान्यात तयार करण्यात येतील आणि निवडक भागीदार संस्थांच्या माध्यमातून उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रात वितरित करण्यात येतील.
समारोप करताना स्टीफन बॅजर म्हणाले, “उद्दिष्टांवर चालणारी कंपनी म्हणून ग्राहकाला योग्य मोल देणारी आणि सामाजिक गरजांवर लक्ष केंद्रीत करणारी नाविन्यपूर्ण उत्पादने देण्याच्या संधींमुळे आम्ही उत्साहित झालो आहोत. या एका प्रयत्नातून आम्ही जागतिक स्तरावरील आरोग्याचा प्रश्न सोडवू शकणार नाही. मात्र, हे त्या दिशेने टाकलेले एक पाऊल आहे. भारतात आम्ही जे बदल घडवू शकू त्याबद्दल आम्ही उत्साहित आहोत आणि आमच्या प्रयत्नांतून शिकण्यास उत्सुक आहोत.”
मार्स एज बद्दल
मार्स एज हा मार्स इनकॉर्पोरेटडचा, लक्ष्यित पोषणातून मानवी आरोग्य आणि वेलनेसवर लक्ष केंद्रीत करणारा नवा व्यावसायिक विभाग आहे. लोकांना अधिक चांगले आयुष्य जगता यावे असे पोषणावर भर देणारे जग निर्माण करण्यासाठी मार्स एजतर्फे इतरांसोबत भागीदारी केली जाते. लक्षणीय आणि दृश्य परिणाम देऊ शकतील आणि दैनंदिन जीवनात सहज सामावून जातील असे सोपे, मजेदार व सुयोग्य पोषण पर्याय निर्माण करण्यासाठी आधुनिक विज्ञान, माहिती आणि तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी मार्स एजची स्थापना करण्यात आली आहे.
मार्स, इनकॉर्पोरेटेड बद्दल
मार्स ही कंपनी म्हणजे एका कुटुंबाचा एक शतकाची परंपरा असलेला व वैविध्यपूर्ण उत्पादनांचा इतिहास असलेला व्यवसाय असून ग्राहकांना व त्यांच्या पाळीव प्राण्यांनाही दर्जेदार उत्पादने व सेवा पुरवण्यात या कंपनीचा हातखंडा आहे. ३५ बिलियन डॉलर्सचा वार्षिक खप असलेल्या या कंपनीचा जागतिक बाजारपेठेत एम. अॅण्ड एम.स्®, स्निकर्स®, ट्विक्स®, मिल्की वे®, डोव्ह®, पेडीग्री®, रॉयल कॅनीन®, व्हिक्साज®, एक्स्ट्रा®, ऑर्बिट®, ५™, स्किटल्स®, अंकल
बेन’स्®, मार्स ड्रिंक्स®, आणि कोकोव्हिया® या उत्पादनांचा समावेश आहे. मार्स ही कंपनी पाळीव प्राण्यांच्या आरोग्यासेवाही पुरवत असून त्यात बॅनफिल्ड पेट हॉस्पिटल, ब्ल्यू पर्ल®, व्हीसीए® आणि पेट पार्टनर्स™ चा समावेश आहे. व्हीए येथील मॅक्लिन येथे मुख्य कार्यालय असलेली मार्स ही कंपनी ८० हून अधिक देशांमध्ये कार्यरत आहे.
दर्जा, जबाबदारी, परस्पर सामंजस्य, क्षमता आणि स्वातंत्र्य ही मार्स या कंपनीची पाच मूलभूत तत्वे असून जगभरातील भागीदारांना व ग्राहकांना दर्जेदार सेवा आणि उत्पादने पुरवण्यासाठी ही पाच तत्वे १००,००० अधिक सहकार्यांना प्रेरणा देतात.
टाटा ट्रस्ट्स विषयी :
१८९२ साली स्थापन झाल्यापासून टाटा ट्रस्ट्स या भारतातील सर्वात जुन्या धर्मादाय संस्थेने तिच्यावर अवलंबून असलेल्या समाजाच्या उन्नतीसाठी एका जबाबदार प्रणेत्याची भूमिका बजावली आहे. संस्थेचे मूळ संस्थापक श्री. जमशेटजी टाटा यांच्या आदर्शांवर आणि दानशूरतेवर आधारलेल्या तत्वांवर आधारित असलेल्या या संस्थेचे ध्येय म्हणजे आरोग्य, संतुलित आहार, पाणी आणि स्वच्छता, शिक्षण, ऊर्जा, ग्रामसुधार, शहरातील गरीबीचे निर्मुलन, कला, कौशल्य आणि संस्कृती या क्षेत्रात अविरतपणे सकारात्मक कार्य. टाटा ट्रस्ट्स चे उपक्रम जलद कार्यवाही, सहकारतत्व व निधीउभारणी या तत्वांवर चालतात आणि त्यांना नवनिर्मिती व देशाभिमुखतेची जोड असते.