राहत फतेह अली खानच्या संगीत मैफलीच्या निमित्ताने 600 जणांना कंपनीतर्फे परदेशीवारी
पुणे : पीव्हीसी पाईप्स व फिटिंग्ज यांची देशातील आघाडीची कंपनी असलेल्या फिनोलेक्स इंडस्ट्रीज लि.ने दुबईमध्ये आपल्या प्रमुख वितरकांचा व सहकाऱ्यांचा मेळावा नुकताच आयोजित केला. दोन दिवसांच्या या मेळाव्यात कंपनीचे वितरक आपल्या कुटुंबियांसमवेत सहभागी झाले होते.
फिनोलेक्स कंपनीच्या सध्याच्या उत्पादनांची माहिती वितरकांना देणे आणि त्यांच्याबरोबरीचे दीर्घकालीन संबंधांचे नाते साजरे करणे हा या सहलीमागील कंपनीचा हेतू होता. या मेळाव्यात सर्वांनी आपापले विचार आणि व्यवसाय वाढीबद्दल कल्पना मांडल्या. फिनोलेक्स इंडस्ट्रीजचे कार्यकारी अध्यक्ष प्रकाश छाब्रिया आणि कंपनीचे वरिष्ठ अधिकारी यांच्याशी प्रत्यक्ष संवाद साधण्याची तसेच ग्राहकांचा व एकंदर बाजारपेठेचा प्रतिसाद नमूद करण्याची संधी या निमित्ताने सर्वांना मिळाली.
हा मेळावा केवळ औपचारीक व गंभीर राहू नये, यासाठी खास मनोरंजनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. दुबईतील पर्यटनाचा व येथील स्वादिष्ट पक्वान्नांचा आस्वाद घेण्याची संधी अनेकांना मिळाली. 19 नोव्हेंबर रोजी दुबईतील द ग्रॅंड हयात हॉटेलमध्ये झालेल्या जागतिक कीर्तीचे गायक उस्ताद राहत फतेह अली खान यांच्या मैफलीचा आनंद सर्वांना लुटता आला.
मेळाव्यात सर्व वितरकांना संबोधित करताना फिनोलेक्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष प्रकाश छाब्रिया म्हणाले, ‘’फिनोलेक्सच्या वाटचालीत आपल्यासोबत वाटचाल करणाऱ्या भागीदारांसोबत अशा रितीने वेळ घालवण्याचा व त्यांच्याशी सुसंवाद साधण्याचा हा अनुभव समाधानकारक आहे. या मेळाव्यात सहभागी झाल्याबद्दल आम्ही त्यांचे आभार मानतो आणि त्यांनाही या मेळाव्यात आनंदाचे क्षण घालवता आले, अशी आशा व्यक्त करतो. कंपनी नवनवीन क्षितिजे ओलांडण्याचा प्रयत्न करीत असताना या भागीदारांची साथ अशीच मिळत राहील, अशी अपेक्षा आहे.’’
‘फिनोलेक्स इडस्ट्रीज’विषयी ..
फिनोलेक्स इंडस्ट्रीज लि. ही पुण्यात मुख्यालय असलेली कंपनी पीव्हीसी पाईप्स व फिटींग्ज यांचे उत्पादन करते. कृषी व इतर क्षेत्रांत ही उत्पादने वापरली जातात. महाराष्ट्रात पुणे व रत्नागिरी येथे, तसेच गुजरातमध्ये मसार येथे कंपनीचे अत्याधुनिक व अद्ययावत कारखाने आहेत. रत्नागिरी येथे पीव्हीसी रेझिन बनविण्याची सुविधा ही यूएचडीई जीएमबीएच आणि होश टेक्नॉलॉजी या कंपन्यांच्या सहयोगाने उभी करण्यात आली आहे. तेथे पाईप बनविण्यासाठी आवश्यक असलेल्या रेझिनचे उत्पादन घेण्यात येते. यातून आम्ही उत्कृष्ट दर्जाचे साहित्य ग्राहकांना पुरवीत असल्याचे सिध्द होते. रत्नागिरीजवळ समुद्रात पीव्हीसी कॉम्प्लेक्स कंपनीने स्वतःची जेट्टी उभारली असून खासगी उद्योगाने अशी जेट्टी उभारण्याचा हा पहिलाच प्रयोग आहे. आयएसओ 9001-2008 हे प्रमाणपत्र मिळवणारी ही देशातील पहिलीच पीव्हीसी पाईप उत्पादक कंपनी आहे.
कंपनीचे सामर्थ्य हे तिच्या कुशल मनुष्यबळात सामावलेले आहे. कंपनीच्या कामकाजातील उत्कृष्टता आणि तिचे यश यांचे सर्व श्रेय कर्मचाऱ्यांना आम्ही देतो. आमचा कारभार हा देशव्यापी असून सर्वत्र वितरक व उप-वितरक यांची 18 हजार दुकाने अस्तित्वात आहेत. ग्राहकांना जोडून घेण्यामध्ये हे वितरक आमची मोलाची मदत करतात. दर्जा, विश्वास आणि अखंडता या आमच्या मूल्यांमुळे आमचे ग्राहकांशी व इतर सर्व सहयोगींशी जिव्हाळ्याचे संबंध निर्माण झाले आहेत.
विशिष्ट ध्येयाप्रती कामगिरी या तत्वामध्ये आमचा विश्वास आहे. त्यातूनच आम्ही समाजासाठी बांधिलकी मानून मुकूल माधव फाऊंडेशनच्या माध्यमातून काही विकासात्मक कामे करीत असतो. रत्नागिरी, पुणे व मसार य कारखान्यांच्या परिसरातील वंचित समाजासाठी काही सामाजिक व आर्थिक कामे आम्ही उभारली आहेत. मुले व महिला यांच्यासाठी शिक्षण, आरोग्य, समाजविकास, पर्यावरण व स्वयंविकास या क्षेत्रात ही आमची कामे चालतात.

