वार्षिक आधारावर दुसर्या तिमाहीमधे 15 % सुधारणा होवून कार्यान्वयन नफा रु.794 कोटी.
पुणे–: बँक ऑफ महाराष्ट्रचे कार्यकारी संचालक श्री. ए. सी. राऊत आणि सरव्यवस्थापक आणि मुख्य वित्त अधिकारी श्री व्ही पी श्रीवास्तव यांनी आर्थिक वर्ष 2018-19 च्या दुसर्या तिमाही अखेरचे आर्थिक निकाल आज जाहीर केले.
यावेळी बोलताना श्री राऊत म्हणाले की, बँकेने आर्थिक वर्ष 2018-19 च्या दुसर्या तिमाहीमध्ये टर्न आराऊंड केला असून बँक आता नफा दर्शवत आहे. आपल्या भागधारकांना चांगला परतावा मिळण्यासाठी आणि सातत्यपूर्ण वृद्धीसाठी बँक निरंतर प्रयत्न करत आहे.
कार्यक्षमतेमध्ये सुधार, किरकोळ (रिटेल) कर्जामध्ये वृद्धी तसेच ग्राहक आणि भागधारकांच्या गुंतवणुकीचे मूल्य वाढण्यावर बँकेने आपले लक्ष केन्द्रित केले आहे.
कामगिरीची ठळक वैशिष्टे
- नफा
Ø बँकेने या आर्थिक वर्ष 2018-19 च्या दुसर्या तिमाहीमध्ये रुपये 27.00 कोटींचा निव्वळ नफा मिळवला आहे. मागील वर्षीच्या दुसर्या तिमाहीत बँकेला रु. 23.24 कोटीचा तोटा झाला होता. कर भरणा पश्चात गेल्या दहा तिमाहींपासून (मार्च 2016 पासून) होणार्या तोट्यावर वर्ष 2019 मधील दुसर्या तिमाहीमध्ये बँकेने टर्न आराऊंड करून निव्वळ नफा नोंदवला आहे.
Ø कार्यान्वयन नफ्यामधील वाढ 15% असून आर्थिक वर्ष 2018 मधील दुसर्या तिमाहीमध्ये हा नफा रु. 692 होता आणि आता या तिमाहीमध्ये तो रुपये 794 कोटी झालेला आहे. कार्यान्वयन नफ्यामधील वाढ ही मुख्यत: निव्वळ व्याजावरील उत्पन्नामध्ये वाढ, बुडीत कर्जामधील वसूली आणि कार्यान्वयीन खर्चांमध्ये केलेल्या कपातीमुळे झालेली आहे.
Ø आर्थिक वर्ष 2019 मधील दुसर्या तिमाहीमध्ये कार्यान्वयीन खर्चामध्ये 4% ने घट झाली आहे. गतवर्षीच्या दुसर्या तिमाहीमद्धे कार्यान्वयीन खर्च रु 640 कोटी होता तो या वर्षीच्या दुसर्या तिमाहीमध्ये रु. 613 कोटी झाला आहे.
Ø व्याजेतर उत्पन्नामध्ये 10% वाढ झालेली आहे. गतवर्षीच्या दुसर्या तिमाहीमद्धे व्याजेतर उत्पन्न 369 कोटी इतके होते तर या वर्षीच्या दुसर्या तिमाहीमध्ये ते रु. 405 कोटी झाले आहे.
Ø निव्वळ व्याज उत्पन्न या वर्षीच्या दुसर्या तिमाहीमध्ये रु 1003 कोटी झाले. गतवर्षी व्याजावरील निव्वळ उत्पन्न 963 कोटी होते. ही वाढ 4% आहे.
Ø आर्थिक वर्ष 2017-18 साठी 2.64% च्या तुलनेत निव्वळ व्याजामधील अंतर (नेट इंटरेस्ट मार्जिन) यामध्ये सुधारणा होवून ते आर्थिक वर्ष 2018-19 साठी 2.76% राहिले.
Ø आर्थिक वर्ष 2017-18 च्या दुसर्या तिमाहीच्या रु 1972 कोटींच्या व्याजावरील व्ययाच्या तुलनेत तुलनेत 9.46% ची मोठी सुधारणा होवून आर्थिक वर्ष 2018-19 साठी हा खर्च रुपये 1785 कोटी राहिला. कासा प्रकारामध्ये (बचत आणि चालू खाते मधील ठेवी) वाढ याबरोबरच अधिक मुल्याने आणलेल्या कर्जाची परतफेड (उदा. टायर 1 आणि टायर 2 बोण्ड्स) यामुळे व्याजावरील खर्च कमी झालेला आहे.
Ø मागील वर्षाच्या दुसर्या तिमाहीस ठेवींवरील मूल्यदर 5.44% च्या तुलनेत या आर्थिक वर्षीच्या दुसर्या तिमाहीस तो 5.03% होवून 0.41 ने कमी झाला आहे.
Ø मूल्य आणि उत्पन्न यांच्या गुणोत्तरमध्ये 450 बीपीएसने वृद्धी झाली. मागील वर्षाच्या दुसर्या तिमाहीस हे गुणोत्तर 48.06% होते त्याच्या तुलनेत या आर्थिक वर्षीच्या दुसर्या तिमाहीस गुणोत्तर 43.56% झाले.
Ø या वर्षीच्या दुसर्या तिमाहीस जुन्या बुडीत कर्ज खात्यामधील वसूली जोमदार होवून तिची वाढ 882% झाली. मागील वर्षीच्या दुसर्या तिमाहीस 13.47 कोटी रुपयांची वसूली या वर्षीच्या तिमाहीस 132.33 कोटी झालेली आहे.
- व्यवसाय
Ø बँकेचा एकूण व्यवसाय 30 सप्टेंबर 2017 मधील रुपये .2,28,062 कोटी वरून या वर्षीच्या दुसर्या तिमाहीमध्ये रु. 2,26,069 कोटी इतका झाला आहे.
Ø बँकेची एकूण कर्जे 30 सप्टेंबर 2018 रोजी रुपये 90,542 कोटी आहेत जी दिनांक 30.09.2017 रोजी रु. 92,965 कोटी इतकी होती.
Ø रिटेल कर्जे (किरकोळ कर्जे) या प्रभागामध्ये 15% वाढ झाली आहे. ही वाढ 30.09.2017 मधील रुपये 13,303 कोटींवरून 30.09.2018 रोजी 15,331 झाली आहेत.
Ø बँकेच्या एकूण ठेवी 30 सप्टेंबर 2017 रोजी रु 1,35,097 कोटी होत्या त्या आता दिनांक 30.09.2018 रोजी 1,35,527 कोटी झाल्या आहेत.
Ø कासा ठेवींचे प्रमाण वाढून दिनांक 30.09.2018 रोजी 46.25% झाले जे गतवर्षी दुसर्या तिमाहीस 44.26% इतके होते.
Ø एकूण ठेवींमधील किरकोळ ठेवीचे प्रमाण (कासा + किरकोळ मुदत ठेवी) यामध्ये 30.09.2017 रोजीच्या 95.91% तुलनेत 30.09.2018 रोजी 97.16% झाले आहे.
Ø एकूण गुंतवणुकीमध्ये 38% ने वाढ झाली आहे.30.09.2017 रोजी एकूण गुंतवणूक रुपये 37466 कोटी होती ती आता 30.09.2018 रोजी रु. 51662 कोटी इतकी झाली आहे.
- थकीत कर्जे व्यवस्थापन :
Ø मालमत्तेच्या गुणवत्तेमद्धे सुधारणा झालेली आहे. दिनांक 30.09.2017 रोजीची एकूण थकीत कर्जे रु. 17239 वरून दिनांक 30.09.2018 रोजी 16873 कोटी झालेली आहेत. सकल थकीत कर्जे आणि निव्वळ थकीत कर्जे यांचे प्रमाण जे दिनांक 30.09.2017 रोजी अनुक्रमे 18.54% आणि 12.68% होते ते दिनांक 30.09.2018 रोजी 18.64 % आणि 10.61% झाले.
Ø निव्वळ थकीत कर्जामध्ये दिनांक 30.09.2017 रोजीच्या 10,990 कोटी रुपयांवरून 20% ने घट होवून ही कर्जे दिनांक 30.09.2018 रोजी 8,743 कोटी रुपये झाली आहेत.
Ø थकीत कर्जामधील रोख वसूली वर्ष 2018-19 मधील अर्धवर्षात 52% ने वाढून रुपये 1,630 कोटी झाली. ही वसूली दिनांक 30.09.2017 रोजी 1,072 कोटी रुपये होती.
Ø संरक्षक तरतूद गुणोत्तरामध्ये दिनांक 30.09.2017 च्या 49.69% वरून 1468 बीपीएसने भरघोस वाढ होवून ती दिनांक 30.09.2018 रोजी 64.37% इतकी झाली आहे.
Ø अनर्जक गुंतवणुकीमध्ये घट झाली असून दिनांक 30.09.2017 रोजी अशा गुंतवणुकी रु. 687 कोटी रुपये होत्या. दिनांक 30.09.2018 त्या रु. 290 कोटी इतक्या राहिल्या आहेत.
- भांडवल पर्याप्तता :
Ø बँकेचे सीईटी-1 भांडवल (सीसीबी सह)7.81% राहिले आहेत. (टायर 1 भांडवल 7.85%) आणि एकूण सीआरएआर (CRAR) 9.87 इतका दर्शवीत आहे.
- भविष्यासाठीच्या योजना:
Ø कृषी कर्जे, किरकोळ कर्जे आणि लघु तसेच माध्यम उद्योगांच्या कर्जांवर अधिक लक्ष केंद्रीत करणे.
Ø वसुलीसाठी अथक प्रयत्न करणे आणि खासकरून बुडीत कर्जांच्या वसुलीवर लक्ष देणे आणि नवीन कर्जांच्या थकीत होण्यापासून बचाव करण्यासाठी संपूर्ण प्रयत्न करणे.
Ø गैर व्याजेतर उत्पन्नाच्या वृद्धीवर लक्ष केंद्रीत करणे आणि कार्यान्वयीन खर्चावर अंकुश ठेवणे.
Ø नफा वाढीसाठी सातत्याने प्रयत्न करणे आणि भागधारकांच्या मूल्यांच्या वृद्धीसाठी प्रयत्नशील रहाणे.