Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

सुपरचॅम्प पी. व्ही. सिंधूने सादर केली ‘व्होडाफोन सखी’

Date:

व्होडाफोन सखी

इमर्जन्सी अलर्टस  आपत्कालीन प्रसंगांमध्ये महिलेच्या लोकेशनविषयीचे अलर्ट तिने नोंदवलेल्या 10 मोबाईलधारकांना पाठवण्यात येतील

इमर्जन्सी बॅलन्स  आपत्कालीन प्रसंगी मोबाईलमध्ये शून्य टॉकटाईम असेल, तरी महिलेला 10 मिनिटे बोलता येईल, इतका टॉकटाईम उपलब्ध करून देण्यात येईल.

प्रायव्हेट नंबर रिचार्ज : रिटेल दुकानांमध्ये मोबाईल रिचार्ज करताना खरा क्रमांक द्यावा लागू नये म्हणून एक 10 आकडी डमी क्रमांक पुरविण्यात येईल.

 ‘व्होडाफोन सखीकशी बनता येईल..

डायल करा 1800123100 (टोल फ्री) आणि सेवेची मोफत नोंदणी करा.

आपत्कालीन प्रसंगी संपर्क साधता येतील, असे दहा जणांचे मोबाईल क्रमांक नोंदवा.

मुंबई, 10 ऑक्टोबर 2018 ः व्होडाफोन आयडिया लि. या देशातील आघाडीच्या दूरसंचार क्षेत्रातील कंपनीने व्होडाफोन सखी ही महिलांसाठीची मोबाईलवर आधारीत सुरक्षा सेवा आज सादर केली. इमर्जन्सी अलर्ट’, ‘इमर्जन्सी बॅलन्स आणि प्रायव्हेट नंबर रिचार्ज ही वैशिष्ट्ये या सेवेत समाविष्ट आहेत. व्होडाफोन आयडियाचे प्रीपेड कनेक्शन वापरणाऱ्या देशभरातील महिला ग्राहकांना या सेवेचा उपयोग होईल. ही सेवा स्मार्टफोन अथवा फीचर फोनवर वापरता येईल, तसेच मोबाईलमध्ये टॉकटाईम अथवा इंटरनेट बॅलन्स नसेल, तरीही तिचा लाभ लाखो महिलांना घेता येणार आहे.

 प्रख्यात बॅडमिंटनपटू, ऑलिंपिक पदकविजेती, पद्मश्री व अर्जून पारितोषिकांनी सन्मानित पी. व्ही. सिंधू हिच्या हस्ते व्होडाफोन सखी सेवेचे उद्घाटन करण्यात आले. ती या प्रसंगी म्हणाली, ‘’मोबाईलमुळे आज लोकांच्या जीवनात अामुलाग्र बदल घडवून आणले आहेत. अधिकाधिक महिलांना मोबाईल सेवा प्रदान करण्याने त्यांना बाहेरच्या जगात सुरक्षितपणे वावरणे सहजशक्य होते.’’ सिंधूच्या हस्ते यावेळी #AbRukeinKyun या चळवळीचा झेंडा उभारण्यात आला. महिलांना त्यांची स्वप्ने साकार करण्यासाठी अनोळखी जगात वावरताना सुरक्षितपणाची जाणीव करून देण्यासाठी ही चळवळ सुरू करण्यात आली आहे.

 ‘’सर्व महिलांनी धीट, धाडसी व चाणाक्ष बनावे, त्यांनी त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात काम करावे, भिती न बाळगता सगळीकडे प्रवास करावा, सामाजिक व कौटुंबिक दबावांना बळी पडू नये आणि कोणतेही प्रतिबंध न पाळता जगावे. #AbRukeinKyun असा दृष्टीकोन बाळगावा’’, असे आवाहन सिंधू हिने यावेळी केले.

 या प्रसंगी बोलताना व्होडाफोन आयडिया कंपनीचे कन्झ्युमर बिझनेस विभागाचे असोसिएट डायरेक्टर अवनीश खोसला म्हणाले, ‘’भारतात एक अब्जाहून अधिकजणांकडे मोबाईल कनेक्शन्स आहेत आणि आपली निम्मी लोकसंख्या महिलांची आहे. तरीही एकूण मोबाईलधारकांमध्ये महिलांचे प्रमाण केवळ 18 टक्केच आहे. तसेच यातील बहुसंख्य महिलांकडे फीचर फोन व बेसिक फोनच आहेत. ही मोठी तफावत लक्षात घेता, महिलांना अधिकाधिक प्रमाणात मोबाईल कनेक्शन व संधी देऊन त्यांना सक्षम बनविणे हे मोठे आव्हानात्मक आहे. व्होडाफोन सखीच्या माध्यमातून आम्ही सर्वसमावेशक धोरण आखून खऱे सामाजिक प्रश्न हाताळण्याचे प्रयत्न करीत आहोत. ही एकमेवाद्वितीय व मोफत सेवा महिलांना धाडसाने पावले टाकण्यास व स्वप्नपूर्ती करण्यास उद्युक्त करणार आहे.’’

 या प्रसंगी सेफसिटीच्या संचालिका व सीओओ, तसेच रेड डॉट फाऊंडेशन ग्रूपच्या संचालिका सुप्रीत के. सिंग यांचा सत्कार करण्यात आला. त्यांनी अतिशय खडतर परिस्थितीत ग्रामीण भागातील महिलांच्या सक्षमीकरणाचे कार्य केले आहे व #AbRukeinKyun या चळवळीला प्रेरणा दिली आहे.

 महिलांच्या या सक्षमीकरणाच्या मोहिमेचा प्रचार व प्रसार देशभरात करण्यात येणार आहे. #AbRukeinKyun असे विचारत सर्व समाजापुढे प्रश्न उभे करणाऱ्या एका मुलीच्या धाडसी कार्यावर आधारीत एका व्हिडीओच्या माध्यमातून ही संकल्पना सादर करण्यात येत आहे. हा व्हिडीओ महिलांनीच बनविलेला आहे. प्रख्यात गायिका नेहा कक्कर हिच्या आवाजातील एक प्रेरणादायी गाणे #AbRukeinKyun या मोहिमेच्या प्रचारामध्ये सादर करण्यात येत आहे. 

 मोहिमेबद्दल अधिक माहिती देताना व्होडाफोन आयडिया कंपनीचे मार्केटिंग विभागाचे कार्यकारी उपाध्यक्ष सिध्दार्थ बॅनर्जी म्हणाले, ‘’आपल्या देशात महिलांची सुरक्षितता हा एक ज्वलंत प्रश्न आहे. सुरक्षिततेच्या कारणास्तव आपल्या महत्वाकांक्षा मागे ठेवणाऱ्या महिलांची असंख्य उदाहरणे आपण पाहात असतो. या प्रश्नाला सामोरे जाण्याकरीता आम्ही व्होडाफोन सखी हे लहान पाऊल पुढे टाकले आहे. यातून महिलांना समाजात वावरताना आत्मविश्वास वाटेल. तसेच त्यांना स्वप्नपूर्ती करण्याची संधी मिळवताना भिती वाटणार नाही. अब रुकेक्यू या आमच्या मार्केटिंग मोहिमेतून आम्ही आमच्या महिला ग्राहकांशी जोडले जाणार आहोत. या सुधारणावादी मोहिमेत सहभागी होण्याची विनंती आम्ही त्यांना करीत आहोत.’’

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

तुकडेबंदी कायदा रद्द अधिसूचना जारी … बावनकुळे

मुंबई- सरकारने याच अधिवेशनात केलेल्या घोषणेप्रमाणे तुक्देबंदी कायदा रद्द...

मीरा-भाईंदर शहरातील मुख्य रस्ता सिमेंट काँक्रीटचा करा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. १६ : मेट्रो लाईन समवेत असणारे काशिगाव मेट्रो...

आम आदमी पार्टी जिल्ह्यात सर्व स्थानिक निवडणुका लढवणार

पुणे-राज्यातील जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी गण,...