मोबिक्विक त्यांच्या युजरसाठी रु. 60,000 पर्यंतचे कागदरहित त्वरित कर्ज देऊ करते~
~मोबाईल वॉलेटमध्ये कर्जाची रक्कम वितरित करणारे पहिले वॉलेट~
~ग्राहकाच्या महत्त्वाकांक्षा आणि गरजा पूर्ण करण्यासाठी त्याची क्षमता बळकट करणासाठी तयार केलेले उत्पादन~
नवी दिल्ली, ऑक्टोबर 3, 2018: मोबिक्विक, भारतातील सर्वांत मोठ्या डिजिटल वित्तीय सेवा मंचने आज त्यांच्या ’बूस्ट’ या महत्त्वपूर्ण उत्पादनाच्या आरंभाची घोषणा केली आहे, जे मोबिक्विक युजरना त्वरित कर्ज मंजुरी आणि वितरण देऊ करते. हे अशा प्रकारचे पहिले क्रेडिट वितरण उत्पादन आहे, ज्यामध्ये रु. 60,000 पर्यंतची कर्जे ही मंजूर होतात तसेच फक्त 90 सेकंदांमध्ये वितरित केली जातात. मोबिक्विकने त्यांच्या युजरना ही सेवा पुरवण्यासाठी अनेक एनबीएफसीसोबत भागीदारी केली आहे. मोबिक्विक हे युजरच्या मोबाईल वॉलेटमध्ये कर्जाची रक्कम वितरित करणारे पहिले वॉलेट आहे.
’बूस्ट’ कागदरहित किंवा तारणरहित कर्जे देऊ करते. कर्ज मंजुरीचा निर्णय हा मोबिक्विकद्वारे विकसित केलेल्या, ’मोबिस्कोर’ नावाच्या नवीनतम जोखीम गुणांकन मॉडेलच्या आधारावर 30 सेकंदांच्या आत घेतला जाईल. संपूर्ण कर्ज प्रवासामध्ये कृत्रिम बुध्दीमत्ता आणि डाटा विश्लेषण क्षमतांमुळेच वास्तविक वेळ हमीदान शक्य आहे.
यूजर मोबिक्विक अॅपद्वारे रु. 5,000 ते रु. 60,000 पर्यंत या श्रेणीमधील कर्जांसाठी आवेदन करू शकतात. अॅपद्वारे कर्ज मिळवणार्या मोबिक्विक युजरकडे त्यांची कर्जाची रक्कम त्यांच्या बँक खात्यावर हस्तांतरित करण्याचा पर्याय उपलब्ध असेल. जमा झालेली रक्कम अॅप यूजर विविध कारणांसाठी वापरू शकतात, जसे त्वरित खरेदी, लग्न खर्च, प्रवास योजना, हॉटेल बुकिंग, वैद्यकीय आपत्काळ तसेच ऑफलाईन आणि ऑनलाईन व्यापारी देयक.
कर्जाच्या प्रक्रियेमध्ये 4 सोप्या पायऱ्यांचा समावेश होतो:
- मोबिक्विक अॅपवर बूस्ट निवडा
- त्वरित कर्जासाठी बूस्ट सक्रिय करा
- कर्जाची ऑफर पाहण्यासाठी पॅन आणि इतर केवायसी तपशील द्या
- कर्जाची ऑफर स्वीकारा आणि त्वरित वितरण मिळवा
घोषणेविषयी बोलताना, श्रीमती उपासना टाकु, सह संस्थापक आणि संचालक, मोबिक्विक म्हणाल्या की ” प्रत्येक भारतीयाला तो कुठे राहतो हे लक्षात न घेता सहज क्रेडिट मिळवून देणे हे आमचे ध्येय आहे. हे अशाप्रकारचे पहिले उत्पादन आहे, जे भारतात मिळत असलेल्या क्रेडिट पद्धतीमध्ये क्रांतिकारी बदल करत आहे. आमचे क्रांतिकारी उत्पादन भारतामध्ये कुठेही राहत असलेल्या भारतीयांना, मोबिक्विक अॅपद्वारे 90 सेकंदांच्या आत जेव्हा आवश्यकता असेल तेव्हा त्वरित कर्ज मिळवून देऊ शकते. या ऑफरची सुरुवात करताना सुरुवातीच्या महिन्यांमध्ये, आम्ही आधीच 100 हजार कर्ज प्रदात्यांची संख्या पार केली आहे. आम्ही ग्राहकांच्या वैविध्यपूर्ण क्रेडिट गरजा भागवण्यासाठी कर्ज पोर्टफोलिओमध्ये नवीन ग्राहकांची नोंदणी करत आहोत. देशामधील डिजिटल वित्तीय सेवा क्षेत्रामध्ये कर्ज देणे हे गेम चेंजर ठरेल आणि आम्हाला अग्रणी म्हणून स्थापित करेल याचा आम्हाला विश्वास आहे.
कर्जाची रक्कम ही 6 आणि 9 महिन्यांच्या सोप्या हप्त्यांमध्ये देय असेल. ते एकतर मोबिक्विक अॅपमधून पेबॅक करू शकतात किंवा त्यांच्या बॅंक खात्यामधून मासिक ईएमआयचे स्वयं-डेबिट करण्यास मोबिक्विकच्या भागीदाराला सक्षम करू शकतात. मोबिक्विक युजरना कर्जाचा लाभ मिळवण्यासाठी पॅन कार्ड आणि इतर केवायसी तपशीलासह त्यांचा केवायसी अद्ययावत करणे आवश्यक आहे.