होंडाचा ठाणे महापालिका यांच्याशी सहयोग
- होंडाचे रस्ते सुरक्षा प्रशिक्षक सर्व वयोगटांतील व्यक्तींना मोफत शिक्षण देणार
- ठाण्यातील महिलांना केवळ 4 तासांमध्ये टू-व्हीलर चालवण्यासाठी सबल करण्यासाठी होंडाने दाखल केला “ड्रीम रायडिंग” उपक्रम
- होंडाने चिल्ड्रेन्स ट्रॅफिक पार्कसाठी दाखल केली रस्ते सुरक्षा हेल्पलाइन 7738-424-602
प्रमुख वैशिष्ट्ये:
होंडा मोफत प्रशिक्षण देऊन रस्ते सुरक्षेमध्ये योगदान देणार आहे Øबालकांसाठी: ‘सेफ्टी विथ फन’ शिकण्यासाठी सायकलिंग, मूलभूत उपक्रम व सीआरएफ 50 मोटरसायकलवर प्रत्यक्षातील अनुभव Øमहिलांसाठी: केवळ 4 तासांमध्ये स्वतंत्र टू-व्हीलर चालक बनण्याची संधी मिळेल Øनव्या चालकांसाठी: होंडाच्या रायडिंग सिम्युलेटर्समुळे गाडी चालवण्याच्या मूलभूत बाबी समजण्यासाठी व रस्त्यावरील 100 संभाव्य धोके जाणण्यासाठी मदत होईल Øअधिक माहितीसाठी 7738-424-602 येथे कॉल करा किंवा ड्रीम रायडिंगसाठी dreamriding@ctpthane.in येथे नोंदणी करा
|
ठाणे: रस्ते सुरक्षेबद्दल असलेली बांधिलकी आणखी बळकट करत, होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडिया प्रा. लि.ने (एचएमएसआय) ठाणे येथे, ठाणे महापालिकेच्या सहयोगाने व महाराष्ट्र पोलिसांच्या पाठिंब्याने 13व्या ट्रॅफिक-ट्रेनिंग पार्कचे आज उद्घाटन केले. हे पार्क पार्क व्ह्यू सोसायटीसमोर, कावेसर, घोडबंदर, ठाणे पश्चिम, महाराष्ट्र येथे आहे.
होंडाने ‘ड्रीम रायडिंग’ हा विशेष उपक्रमही सुरू केला आहे. आता, 18 वर्षांवरील कोणत्याही स्त्रीला स्वतंत्रपणे गाडी चालवण्याचे स्वप्न साकार करता येणार आहे. या विशेष उपक्रमांतर्गत, होंडाच्या महिला सेफ्टी इन्स्ट्रक्टरच्या विशेष गटातर्फे महिलांना केवळ 4 तासांमध्ये स्वतंत्रपणे गाडी चालवण्याचे प्रशिक्षण दिले जाईल. आता ठाण्यातील महिलांना dreamriding@ctpthane.in येथे मोफत नोंदणी करून किंवा 7738-424-602 या हेल्पलाइनवर कॉल करून, रायडर बनण्याचे स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी वाटचाल सुरू करता येईल.
चिल्ड्रेन्स ट्रॅफिक पार्कचे उद्घाटन कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे असलेले युवा सेनेचे (शिवसेनेचा विभाग) अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्या हस्ते, महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री व ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडिया प्रा. लि.चे सेल्स व मार्केटिंगचे वरिष्ठ उपाध्यक्ष यदविंदर सिंग गुलेरिया व अन्य सरकारी अधिकारी यांच्या उपस्थितीत झाले.
यानिमित्त बोलताना, होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडिया प्रा. लि.चे सेल्स व मार्केटिंगचे वरिष्ठ उपाध्यक्ष यदविंदर सिंग गुलेरिया म्हणाले, “होंडा सुरक्षेला सर्वाधिक प्राधान्य देते व या बांधिलकीमार्फत आम्ही अंदाजे 21 लाख भारतीयांना रस्ते सुरक्षेच्या महत्त्व, याचे धडे दिले आहेत. होंडा 2 व्हीलर्सला जिल्ह्यामध्ये सुरक्षेविषयी जागृती करण्याचा उपक्रम अधिक सक्षम करण्याची संधी दिल्याबद्दल आम्ही ठाणे महापालिका यांचे आभारी आहोत. हा उपक्रम प्रौढ व युवा पिढी या दोन्हींवर भर देणार आहे. बालकांना लहान वयामध्ये जागरुक केल्यास, त्यांना समाजातील सेफ्टी चॅम्प्स बनवणे शक्य होईल. भारतातील रस्ते अधिक सुरक्षित करण्यासाठी आम्ही टाकलेले हे आणखी एक पाऊल आहे.”
ठाण्यातील चिल्ड्रेन्स ट्रॅफिक पार्क येथील होंडा 2 व्हीलर्सच्या मुख्य उपक्रमांमध्ये समाविष्ट आहेत:
Ø 3 एकर क्षेत्रामध्ये विस्तारलेल्या चिल्ड्रेन्स ट्रॅफिक पार्कमध्ये होंडाने विशेष प्रकारे तयार केलेल्या व सुरक्षित वातावरणाद्वारे प्रत्यक्षातील रायडिंग स्थितीची प्रतिकृती साकारली आहे.
Ø येथे, होंडा महिला व बालके यासह सर्व वयोगटांमध्ये रस्ते सुरक्षाविषयक जागृती करणार आहे. त्यासाठी शास्त्रीय मोड्युलचा वापर केला जाणार असून त्यामध्ये प्रत्यक्षातील ज्ञान (गाडी चालवण्याचा अनुभव) व पुस्तकी ज्ञान (गाडी चालवण्याचे योग्य पोश्चर, वाहतुकीच्या खुणा व रस्ताविषयक नियम) या दोन्हींचा समावेश असेल.
Ø विशेषता महिलांसाठी ड्रीम रायडिंग उपक्रम होंडाने सुरू केला आहे. गाडी चालवताना अत्यंत आरामदायीपणा व आत्मविश्वास देत, होंडा सेफ्टी इन्स्ट्रक्टर (महिला व पुरुष) रायडरना गाडी चालवण्याचे अचूक तंत्र शिकवणार आहेत.
Ø मुलांसाठी कस्टमाइज्ड रोड सेफ्टी मोड्युल – शाळेतील मुलांमध्ये सुरक्षितपणे गाडी चालवण्याच्या सवयी रुजवण्यासाठी व त्यांना जागरुक करण्यासाठी, होंडाच्या रस्ते सुरक्षा मोड्युलमध्ये 5 ते 8 वर्षे वयोगटातील बालकांसाठी सापशिडीसारखे मूलभूत उपक्रम समाविष्ट आहेत. 9 ते 12 वर्षे वयोगटातील बालकांसाठी, होंडाने आयात केलेली सीआरएफ 50 मोटरसायकल समाविष्ट केली आहे. यामुळे या मुलांना प्रत्यक्षातील रायडिंगद्वारे सुरक्षितपणे गाडी चालवण्याची संकल्पना शिकता येईल. युवकांसाठी, सुरक्षितपणे गाडी चालवण्यासाठी थेअरी सेशन्सही घेतली जातात.
Ø होंडाच्या प्रोप्रायटरी रायडिंग ट्रेनर व स्मार्ट क्लासरूममुळे शिकण्याची प्रक्रिया आनंददायी होते – व्हर्च्युअल रायडिंग सिम्युलेटरमुळे 16 वर्षे वयावरील व्यक्तींना रस्त्यावर प्रत्यक्ष गाडी चालवण्यापूर्वी रस्त्यावरील 100 संभाव्य धोक्यांचा अनुभव घेता येणार आहे. नव्याने गाडी चालवण्यास शिकणाऱ्यांसाठी सर्वात मोठा फायदा म्हणजे, व्हर्च्युअल अनुभव घेतल्याने त्यांनावाहतुकीविषय धोक्यांचा अंदाज वर्तवला येईल व त्यानुसार प्रतिसाद देता येईल.
Ø 18 वर्षांपुढील वयाच्या व सध्या गाडी चालवणाऱ्या व्यक्तींसाठी जिमखाना व नॅरो प्लँक असून, त्याद्वारे रायडर धमाल पद्धतीने आपले कौशल्य तपासू शकतात.
Ø चिल्ड्रेन ट्रेनिंग पार्क या अतिरिक्त वैशिष्ट्यामध्ये ओपन एअर अम्फिथिएटर, ट्रॅफिक एज्युकेशन मिनिएचर्स, प्राथमिक बालकांसाठी तयार केलेले विशेष ट्रॅक, कौशल्य वाढवणारे प्रशिक्षण देण्यासाठी विशेष बिटुमन ट्रॅक व बालके/सहभागींसाठी खास कॅफेटिरिया यांचा समावेश आहे.
होंडाची रस्ते सुरक्षेविषयी बांधिलकी:
जबाबदार कॉर्पोरेट म्हणून निभावत असलेली भूमिका आणखी अधोरेखित करण्यासाठी, होंडा 2001 पासून रस्ते सुरक्षेला चालना देत आहे. आतापर्यंत होंडाने 21 लाखांहून अधिक भारतीयांना रस्ते सुरक्षेचे धडे दिले आहेत. या कारणासाठी होंडाने एकूण 13 ट्रॅफिक पार्क दत्तक घेतली आहेत – दिल्ली (2), जयपूर, चंडीगड, भुवनेश्वर, कटक, येवला (नाशिक), इंदूर, हैदराबाद, लुधियाना, कोईम्बतूर, कर्नल व नव्याने उद्घाटन करण्यात आलेले ठाणे.