पुणे-
आईसाहेब प्रतिष्ठान आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर बहुजन विकास संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने खास महिलांसाठी होम मिनिस्टर हा कार्यक्रम घेण्यात आला . या कार्यक्रमाचा बक्षीस वितरण सोहळा सहाय्यक पोलीस आयुक्त रवींद्र रसाळ यांच्याहस्ते पार पडला . यावेळी अध्यक्षस्थानी संगीता घुले , कार्यक्रमाचे आयोजक आईसाहेब प्रतिष्ठानचे संस्थापक लक्ष्मण भोसले , संजय टकले, मांजरीचे पोलीस पाटील शिवाजी घुले , जिल्हा परिषद सदस्य दिलीप घुले , शिवाजी खलसे , संदेश शिंदे , शिवराम कांबळे , खरात गुरुजी , पंचायत समिती सदस्य जितीन कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते . यावेळी गरजू होतकरू विद्यार्थ्यांना ११ सायकलींचे वाटप , शालेय गणवेश व साहित्य वाटप २० विधवा मातांना साडी चोळी , जेष्ठ नागरिकांना पोशाख , महिलांना भेट वस्तू वाटप करण्यात आले. यावेळी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना पुरस्कार देण्यात आले . यामध्ये पोलीस निरीक्षक मनिषा झेंडे यांना मांजरी भूषण पुरस्कार , कैलासराव सोनवणे याना भीमरत्न पुरस्कार , आयुब मोमीन यांना शिवरत्न पुरस्कार , डॉ. तानाजी हंबीर याना आदर्श डॉक्टर , अनंत टी. पाटील याना आदर्श शिक्षक पुरस्कार अजित वाडेकर याना उद्योगरत्न पुरस्कार , अजय चव्हाण याना क्रीडारत्न पुरस्कार आदींना पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले .
आईसाहेब प्रतिष्ठानचे पदाधिकारी बाळासाहेब भोसले , रोहिदास पवार , सुमित भोसले , बिपीन भोसले , गणेश गायकवाड , गौतम भोसले , निलेश कांबळे , अविनाश वाघमारे , अमित भोसले आदींनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले . यावेळी आईसाहेब प्रतिष्ठानच्या स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले . आईसाहेब प्रतिष्ठानचे संस्थापक लक्ष्मण भोसले यांच्या परिवाराच्यावतीने सामाजिक कार्यासाठी एक लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला .
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लक्ष्मण भोसले यांनी केले तर आभार आईसाहेब प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाळासाहेब भोसले यांनी मानले .

