उद्घाटन सोहळ्यात मराठी बिग बॉस फेम कलाकारांसह अभिनेत्रींचा कलाविष्कार
विनासायास वेट लॉस आणि मधुमेह मुक्त विश्व यावर डॉ. जगन्नाथ दीक्षित यांची विशेष मुलाखत
पुणे –कला, संस्कृती, गायन, वादन, नृत्य यांचा मनोहारी मिलाफ असणारा पुणे नवरात्रौ महोत्सव यंदा दिमाखदार 24वे वर्ष साजरे करीत आहे. यंदाचा उद्घाटन सोहळा बुधवार दि.१० ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५.०० वाजता पुण्यात श्रीगणेश कला क्रीडा रंगमंच येथे खासदार रजनी पाटील यांच्या हस्ते संपन्न होत आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे उद्घाटन सोहळ्याचे अध्यक्षस्थान भूषविणार आहेत, अशी माहिती पुणे नवरात्रौ महोत्सवाचे आयोजक-अध्यक्ष, माजी उपमहापौर आबा बागुल यांनी आज दिली.
याप्रसंगी पुणे नवरात्रौ महोत्सवाचे सचिव घनःश्याम सावंत, नंदकुमार कोंढाळकर , कोषाध्यक्ष नंदकुमार बानगुडे , सदस्य रमेश भंडारी, अमित बागुल आणि पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी मा. उपमहापौर आबा बागुल म्हणाले की, उद्घाटन सोहळ्यास माजी संसदीय कामकाज मंत्री हर्षवर्धन पाटील, पालकमंत्री गिरीश बापट, माजी रेल्वेमंत्री सुरेश कलमाडी, , महापौर मुक्ता टिळक, माजी आमदार उल्हास पवार, समाजकल्याण राज्यमंत्री दिलीप कांबळे,अप्पर पोलिस आयुक्त [ क्राईम ] प्रदीप देशपांडे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसेच खासदार वंदना चव्हाण, आमदार विश्वजीत कदम,पुणे शहर जिल्हा काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे,आमदार शरद रणपिसे, आमदार व काँग्रसचे प्रवक्ते अनंतराव गाडगीळ, माजी आमदार मोहन जोशी, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अंकुश काकडे,खासदार संजय काकडे, खासदार अनिल शिरोळे, आमदार माधुरी मिसाळ, हे सन्माननीय निमंत्रित म्हणून उपस्थित राहणार आहेत.
बाबूजी, ग. दि. मा, पु. ल. यांना यंदाचा महोत्सव समर्पित
यंदाचा पुणे नवरात्रौ महोत्सव ज्येष्ठ संगीतकार सुधीर फडके, ज्येष्ठ गीतकार ग. दि. माडगुळकर आणि महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व पु. ल. देशपांडे यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्ताने समर्पित करण्यात आला आहे. त्यानिमित्त गदिमा ,पु. लं. देशपांडे व बाबूजी यांच्यावर आधारित स्वरनंदा प्रस्तुत दैवी त्रिरत्ने हा विशेष कार्यक्रम , महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व पु. ल. देशपांडे यांनी गौरविलेले अंबरी निर्मित वेधवंती प्रकाशित लाईफ पार्टनर्स या महिलाप्रिय कॉमेडी नाटकाची मेजवानी प्रेक्षकांना मिळणार आहे.
मराठी बिग बॉस स्पर्धकांसह अभिनेत्रींचा नृत्याविष्कार
पुणे नवरात्रौ महोत्सवात यंदा उद्घाटन सोहळ्यात मराठी बिग बॉस फेम अभिनेता पुष्कर जोग , सई लोकूर , शर्मिष्ठा राऊत तसेच अभिनेत्री हेमांगी कवी, सुवर्णा काळे , तन्वी माने यांचा फ्युजन कलरफुल हा कलाविष्कार हे यंदाचे आकर्षण आहे.
सलग ९ दिवस हिंदी- मराठी चित्रपट गीतांच्या मैफिली,मराठी नाटकांची मेजवानी, संगीतकार सुधीर फडके व गीतकार ग.दि. माडगूळकर आणि पु. ल. देशपांडे यांच्यावर विशेष कार्यक्रम, मॅजिकल आर. डी हा अनोखा कार्यक्रम, मराठी झिंगाट गाण्यांचा सदाबहार कार्यक्रम,लावणी महोत्सव अशा सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी ही यंदाची आकर्षणे असणार आहेत.
दरवर्षीप्रमाणे यंदाही विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणार्या नामवंतांना ‘श्री लक्ष्मीमाता कला संस्कृती जीवनगौरव पुरस्कार’ देऊन गौरविले जाणार आहे. हे पुरस्कार उद्घाटन सोहळ्यात प्रदान करण्यात येणार आहेत. डॉ. जगन्नाथ दीक्षित (सामाजिक ), कैलास काटकर (तंत्रज्ञान ), प्रदीप लोखंडे (शिक्षण तज्ज्ञ ), प्रशांत इंगवले (लेखक – संगीत ), वैशाली जाधव (कलाविष्कार) यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
पुण्यातील जागृत देवस्थान असलेल्या शिवदर्शन येथील श्री लक्ष्मी माता मंदिर येथे घटस्थापनेच्या दिवशी बुधवार दि. १० ऑक्टोबर रोजी सकाळी 7.३० या शुभमुहूर्तावर सौ. व श्री आबा बागुल यांच्या हस्ते घटस्थापना होणार आहे.
भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांच्या आशीर्वादाने आणि अभंगाने पुणे नवरात्रौ महोत्सवाची सुरूवात झाली. भारतरत्न श्रीमती लता मंगेशकर यांनी पसायदान गाऊन या पुणे नवरात्रौ महोत्सवास शुभाशीर्वाद दिले. या 2३ वर्षात राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय किर्तीच्या अनेक कलावंतांनी या मंचावर आपली कला सादर केली आहे. नवरात्राच्या कालावधीत सलग दहा दिवस चालणारा आणि गेली 2३ वर्ष सुरू असणारा हा सांस्कृतिक महोत्सव सर्वांसाठी विनामूल्य असतो. असेही आबा बागुल यांनी यावेळी स्पष्ट केलेे.
यंदाचा उद्घाटन सोहळाही शानदार होणार असून दीपप्रज्वलनाने आणि देवीच्या आरतीने या 2४व्या पुणे नवरात्रौ महोत्सवाचे उद्घाटन केले जाईल. यानंतर केतकी शहा , लिना केतकर यांचा शक्ती हा कार्यक्रम होणार आहे. तर विनोद धोकटे व ग्रुप कडक लक्ष्मी सादर करणार आहेत. स्वाती धोकटे व सहकाऱ्यांचा जोगवा आणि विनोद धोकटे व सहकारी गोंधळ सादर करणार आहेत. तर सँडी आणि सहकाऱ्यांचा ओल्ड इज गोल्ड हा बहारदार कार्यक्रम होणार आहे. त्यानंतर सिनेअभिनेत्री वैशाली जाधव यांची दिलखेचक लावणी तर सिनेअभिनेता व मराठी बिग बॉस उपविजेता पुष्कर जोग , मराठी बिग बॉस फेम सई लोकूर , शर्मिष्ठा राऊत, अभिनेत्री हेमांगी कवी, सुवर्णा काळे, तन्वी माने यांचा कलरफुल फ्युजन हा विशेष कार्यक्रम प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणार आहे. या नेत्रदीपक उद्घाटन सोहळ्याचे सूत्रसंचालन ज्येष्ठ निवेदक सुधीर गाडगीळ करणार आहेत.
या उद्घाटन सोहळ्यानंतर सायंकाळी 7 वाजता श्री गणेश कला क्रीडा रंगमंच येथे विनासायास वेट लॉस आणि मधुमेह मुक्त विश्व यावर डॉ. जगन्नाथ दीक्षित यांचे व्याख्यान आणि विशेष मुलाखत होणार आहे.
पुणे नवरात्रौ महोत्सवात उद्घाटन सोहळ्यानंतर बहारदार कार्यक्रमांची मालिकाच श्री गणेश कला क्रीडा रंगमंच येथे सलग नऊ दिवस सादर होणार असून हे सर्व कार्यक्रम दसर्यापर्यंत रोज सायंकाळी सात वाजता सादर होतील.
गुरुवार दि. ११ ऑक्टोबर रोजी गदिमा, पु. लं व बाबूजी यांच्यावर आधारित स्वरनंदा प्रस्तुत दैवी त्रिरत्ने हा विशेष कार्यक्रम होणार असून संजय गंभीर व सहकलाकार हे सादरकर्ते असणार आहेत.
शुक्रवार दि.१२ ऑक्टोबर रोजी सुर-पालवी प्रस्तुत किंगमेकर्स हा हिंदी ऑर्केस्ट्रा पल्लवी आणि संजय सादर करणार आहेत.
शनिवार दि. १३ ऑक्टोबर रोजी महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व पु. लं. देशपांडे यांनी गौरविलेले अंबरी निर्मित वेधवंती प्रकाशित लाईफ पार्टनर्स या महिलाप्रिय कॉमेडी नाटकाची मेजवानी प्रेक्षकांना मिळणार आहे.
पुणे नवरात्रौ महोत्सवात दरवर्षी सादर होणारा सलग दहा तासांचा लावणी महोत्सव हे सार्या महाराष्ट्राचे आकर्षण बनले आहे. यंदा रविवार दि.१४ ऑक्टोबर रोजी दुपारी 12 वाजता होणार्या लावणी महोत्सवात स्वाती दसवडकर ,सुवर्णा कोल्हापूरकर यांचा लावणी महासंग्राम, सीमा पोटे, भाग्यश्री बारामतीकर यांचा पाहुण फक्त तुमच्यासाठी , वर्षा संगमनेरकर , मृणाल पुणेकर यांचा लावणी धमाका तर पूनम कुडाळकर , तेजस्विनी तांबेकर यांचा तुमच्यासाठी कायपण ,मिताली ठाणेकर, पंतजली पाटील यांचा छत्तीस नखरेवाली आणि ख़ुशी शिंदे , आरती शिंदे यांचा ढोलकीच्या तालावर या दिलखेचक, बहारदार लावण्यांची मेजवानी हे यंदाचे खास आकर्षण आहे.
सोमवार दि.१५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी 7 वाजता हिंदी -मराठी गाण्यांचा सुरेल नजराणा असलेला गीतो भरी शाम हा स्नेहगीत प्रस्तुत कार्यक्रम नेहा चिपळूणकर आणि सहकारी सादर करणार आहेत.
मंगळवार दि १६ ऑक्टोबर रोजी त्रिविदा प्रस्तुत मॅजिकल आर. डी. हा कार्यक्रम सौरभ दफ्तरदार , दीपिका जोग -दातार सादर करणार आहेत.
बुधवार दि. १७ऑक्टोबर रोजी साईराज प्रॉडक्शन निर्मित मामला चोरीचा हे कॉमेडी नाटक सादर होणार आहे.
गुरुवार दि. १८ ऑक्टोबर रोजी महाराष्ट्राचा बुलंद आवाज हा मराठी झिंगाट गाण्यांचा सदाबहार विशेष कार्यक्रम सादर होणार आहे. त्यात सुया घे पोत घे फेम प्रदीप कांबळे, आला बाबुराव फेम रोमिओ कांबळे, आमदार झाल्यासारखं फेम संकल्प गोळे, सचिन अवघडे, मागं लागतील सतरा जणी फेम राखी चौरे, संजय लोंढे, सोनू तुझा माझ्यावर फेम अजय क्षीरसागर , भाग्यश्री क्षीरसागर , बर्थडे हाय आपल्या भावाचा फेम शेखर गायकवाड , हलगी शालू फेम विशाल हे आपली गाजलेली मराठी झिंगाट गाणी सादर करणार आहेत.
शिवदर्शन येथील प्रसिद्ध श्री लक्ष्मीमाता मंदिर येथे पुणे नवरात्रौ महिला महोत्सवाचेही आयोजन करण्यात येते. घटस्थापनेनंतर सकाळी ६ ते ९ कुंकुम अभिषेक , महाप्रसाद , भजन – कीर्तन ,होम -हवन, महिलांसाठी सांस्कृतिक कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात येते. पुणे नवरात्रौ महिला महोत्सवाच्या अध्यक्षा सौ. जयश्री बागुल या सर्व नियोजन पाहतात.
पुणे नवरात्रौ महोत्सवाचे आयोजक, अध्यक्ष माजी उपमहापौर आबा बागुल असून गेली 2३ वर्षे आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरलेल्या आणि भव्यता यामुळे संपूर्ण नावारूपास आलेला पुणे नवरात्रौ महोत्सव यशस्वी करण्यासाठी घनश्याम सावंत (सचिव), नंदकुमार बानगुडे (कोषाध्यक्ष), नंदकुमार कोंढाळकर (सचिव), रमेश भंडारी (सदस्य), अमित बागुल (सदस्य-समन्वयक) हे विशेष प्रयत्नशील असून या महोत्सवास द्वारकापीठाचे महाराष्ट्राचे प्रतिनिधी श्री शंकरदत्त ज. महाशब्दे यांचे आशीर्वाद लाभले आहेत. या महोत्सवाच्या कार्यकारिणी समितीमध्ये राजेंद्र बागुल, जयवंत जगताप,कपिल बागुल , हेमंत बागुल, राजेंद्र बडगे, टी.एस. पवार, सागर बागुल , सागर आरोळे , महेश ढवळे हे काम पाहत आहेत.
पुणे नवरात्रौ महोत्सवाचे प्रमुख कार्यकर्ते अभिषेक बागुल,राहुल बागुल, संतोष पवार, धनंजय कांबळे, राजाभाऊ पोळ, भरत तेलंग, इम्तियाज तांबोळी, समीर शिंदे, बाबालाल पोळके हे आहेत.
हे सर्व कार्यक्रम रसिक पुणेकरांसाठी विनामूल्य असून नागरिकांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन या महोत्सवाचे आयोजक अध्यक्ष माजी उपमहापौर आबा बागुल यांनी केले आहे.

