शहर काँग्रेस व अमित बागुल मित्र परिवारातर्फे ८१ गुरुजनांचा सन्मान
पुणे- ”युवा पिढीचा संपूर्ण व्यक्तिमत्व विकास होण्याच्या दृष्टीने गुरु – शिष्याचे नाते हे सदैव महत्वपूर्ण आहे”,असे प्रतिपादन माजी उपमहापौर व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रतिनिधी आबा बागुल यांनी येथे केले.
पुणे शहर जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस अमित बागुल आणि मित्रपरिवारातर्फे गुरुपौर्णिमेनिनिमित्त विविध शाळा ,महाविद्यालयांमधील ८१ शिक्षकांचा ,गुरुजनांचा विशेष सन्मान माजी उपमहापौर आबा बागुल व पुणे नवरात्रौ महिला महोत्सवाच्या अध्यक्षा जयश्री बागुल यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी द. स. पोळेकर, नंदकुमार बानगुडे ,अरुण कामठे ,सतीश पवार ,संतोष गिळे, प्रकाश आरणे, संयोजक अमित बागुल ,विश्वास दिघे, सतीश कांबळे ,हर्षदा बागुल, दीपा बागुल,आदींसह मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी माजी उपमहापौर आबा बागुल म्हणाले कि,”केवळ विद्या देऊन गुरुचे कार्य संपत नाही तर आपल्या जीवनविषयक अनुभवातून आलेले शहाणपण शिष्यापर्यंत पोहचविण्याचे कार्य गुरु करीत असतो.एकप्रकारे गुरु हा दिशादर्शक आहे. शिक्षण हे परिवर्तनाचे माध्यम आहे आणि विकासाचा खरा मंत्र आहे आणि त्यात शिक्षकांची भूमिका ही मोलाची आहे. ज्ञान, व्यवहार , विवेक, आत्मविश्वास हे आई -वडील आणि गुरूंशिवाय मिळत नाही”,असेही आबा बागुल यांनी स्पष्ट केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी धनंजय कांबळे, सागर आरोळे, इम्तियाज तांबोळी,योगेश निकाळजे, संतोष पवार,भरत तेलंग,महेश ढवळे,गणेश गायकवाड,प्रज्ञावंत जाधव, सुयोग पाटोळे,सुयोग धाडवे,बाबालाल पोळके,समीर शिंदे,अमर ससाणे.
… गुरु
आज ज्यांच्या अथक परिश्रमाने तळागाळातील विद्यार्थ्यांसाठी दर्जेदार शिक्षणाची व्यवस्था झाली आणि देशात आदर्शवत ठरलेल्या राजीव गांधी ई -लर्निंग शाळेची ज्यांनी उभारणी केली त्या माजी उपमहापौर आबा बागुल, जयश्री बागुल यांचा विशेष सत्कार राजीव गांधी ई- लर्निंग शाळेतील व्यवस्थापक ,प्राचार्य आणि शिक्षक वर्गांनी यावेळी केला आणि कल्पकता, दूरदृष्टी आणि प्रत्येकाबद्दल सदैव आत्मीयता असणारे आबा बागुल हे समाजासाठी गुरूच आहेत, अशा शब्दात गौरव केला.

