रविवारी महापालिकेत झाली कॉंग्रेसची गोपनीय बैठक : अरविंद शिंदे ,अजित दरेकर अनुपस्थित (व्हिडीओ )

Date:

आता मतभेद नाहीत,सर्वांना विश्वासात घेऊन काम करण्याचा निर्धार
:आबा बागुलांचा पुढाकार

पुणे – महापालिकेत  सत्ताधारी भाजपचा नाकर्तेपणा पुणेकरांपुढे मांडून त्याविरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा निर्णय पुणे महापालिका काँग्रेसच्या बैठकीत घेण्यात आला. या बैठकीच्या निमित्ताने शहर विकासासाठी काँग्रेस पक्षाची एकजूट दाखविण्यात आली.पुणे शहराचा विकास, प्रलंबित प्रकल्प आणि महापालिकेच्या कामकाजात भाजपला आलेले अपयश यावर बैठकीत चर्चा करण्यात आली. महापालिकेतील काँग्रेसचे गटनेते आबा बागुल यांनी ही  बैठक बोलावली होती. महापालिकेच्या सभेपुढील कार्यपत्रिकेवर चर्चा करण्याची परंपरा काँग्रेस पक्षात होती. ही खंडित झालेली परंपरा आबा बागुल पुन्हा यांनी सुरू केली आहे.

या बैठकीस कॉंग्रेसचे शहराध्यक्ष माजी मंत्री रमेश बागवे, पुणे शहर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस कमिटी, मोहन जोशी, ज्येष्ठ नेते उल्हास पवार , माजी आमदार, दिप्ती चवधरी, माजी स्थायी समिती अध्यक्ष श्रीकांत शिरोळे, ज्येष्ठ नगरसेवक व माजी उपमहापौर डॉ.सतीश देसाई, नीता रजपूत, शिवा मंत्री, विरेंद्र किराड, कमल व्यवहारे, रजनी त्रिभुवन खडकी कॅन्टोन्मेंटचे सभासद मनीष आनंद व गोपाळ तिवारी, विदयमान नगरसेवक अविनाश बागवे, रफिक शेख, सुजाता शेटटी, लता राजगुरू, रविंद्र धंगेकर,माजी नगरसेवक संजय बालगुडे, शिक्षण मंडळ माजी उपाध्यक्ष नरेंद्र व्यवहारे पीएमटीचे चेअरमन भीमराव पाटोळे काँग्रेस युवक अध्यक्ष विशाल मलके, महिला अध्यक्ष सोनाली मारणे, एनएसयुआय चे अध्यक्ष भूषण रानभरे, आदी .पदाधिकारी हे उपस्थित होते.
अविनाश बागवे यांनी आभार प्रदर्शन केले.

सर्वांना विश्वासात घेऊन काम करण्यासाठी खंडित परंपरा पुन्हा सुरु करण्याच्या निर्धाराबाबत आबा बागुलांचे नेत्यांकडून कौतुक

पुणे शहर  काँग्रेसचे अध्यक्ष रमेश बागवे यांनी शहरातील अनेक महत्वाचे प्रलंबित प्रश्न, विकासकामे व सत्ताधारी पक्षाकडून शहराकडे होणारे दुर्लक्ष याबाबत साधकबाधक चर्चा करून सन २०२२ मध्ये पुणे महापालिकेत काँग्रेस पक्षाची सत्ता आणून पुणेकरांना नियोजित विकास काँग्रेसच देऊ शकते यासाठी अशाच एकीने काँग्रेस काम करेल , या साठी गटनेते म्हणून आबा बागुल यांनी दरमहा कामकाजाच्या पद्धतीवर बैठक घेण्याची परंपरा पुन्हा सुरु केल्याबाबत त्यांनी त्यांचे स्वागत केले.
माजी आमदार उल्हासदादा पवार यांनी बैठकीचे कौतुक केले व काँग्रेस मध्ये कोणतेही मतभेद नाहीत यावरून सिद्ध होते.अश्या एकजुटीने शहरातील विकासाची कामे मार्गी लावा असेही ते म्हणाले. याबैठकीत पुण्याच्या वेगवेगळ्या विषयांवर चर्चा झाली.2022 ला येणारी निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाला अधीक जागा कश्या मिळतील यावर प्रत्येकाने आपले मत मांडले.त्यावर बोलताना पुण्यातील काही महत्वाचे निर्णयावर चर्चा झाली. त्यामध्ये कोरोना आता आटोक्यात असला तरी येणाऱ्या काळात मोठ्याप्रमाणात वाढण्याची शक्यता असताना काय केले पाहिजे, पुणे शहरातील वाहतुकीचे नियोजन करत असताना एचसीएमटीआर रखडलेला रस्ता लवकरात लवकर मार्गी लावणे,पावसाळ्यात वारंवार शहरात येणाऱ्या पुरावर सत्ताधारी भाजप गप्प का आहे. सीमाभिंत बांधण्यासाठी टेंडर काढले असून काम सुरू का होत नाही भाजपच्या अंतर्गत भांडणामुळे पुणेकरांना वेठीस का धरण्यात येत आहे.सीमाभिंत प्रश्न लवकर सुरू करण्यासाठी काँग्रेसने पुढाकार घ्यावा,शहराच्या प्रश्नावर काँग्रेस पक्ष आक्रमक भूमिका घेऊन पुणेकरांना न्याय दिल्याशिवाय राहणार नाही.असे अनेक मुद्यांवर खेळीमेळीच्या वातावरणात बैठक पार पडली.
काँग्रेस पक्षाचे गटनेते आबा बागुल म्हणाले की, शहरामध्ये आत्तापर्यंत दिसत असलेला विकास हा काँग्रेच्या कार्यकाळातच झाला आहे.त्याची घडी भाजपच्या नाकर्तेपणामुळे मोडली आहे.महापालिकेत काँग्रेस आल्यावरच पुणेकरांना अपेक्षित असलेला विकास पुन्हा दिसू लागेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.माजी आमदार व आजी माजी पदाधिकारी यांनी काँग्रेस पक्षाची पार्टी मिटिंग बोलाविण्याची अनेक वर्षांची खंडित झालेली परंपरा आबा बागूल यांनी चालू केली याबाबत आबा बागूलांचे मनपासून कौतुक केले व ही परंपरा अशीच चालू ठेवा, मतभेद नाहितच काँग्रेस वाढवा अशी सूचना केली. 

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

“एच.डी.मांजरेकर उत्कृष्ट एन.सी.सी कॅडेट ट्रॉफी” वितरण कार्यक्रम संपन्न

मेजर एच.डी. मांजरेकरउत्कृष्ट एन.सी.सी.कॅडेट ट्रॉफी वितरणरक्तदान शिबिराचे आयोजन६१ रक्तदात्यांनी...

देशभक्तीपूर्ण वातावरणात ६४ वा गोवा मुक्ती दिन साजरा; मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडून राष्ट्रध्वजारोहण

‘ऑपरेशन विजय’, पिंटो व कुंकळ्ळी उठावांचा मुख्यमंत्र्यांकडून उल्लेख; पोलीस,...

नगरपरिषद, नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीकरिता संपूर्ण यंत्रणा सज्ज- जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

मतदारांना मतदान करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन पुणे, दि. १९: राज्य निवडणूक...

पेशवे पार्कमधील कोट्यवधींच्या शिवसृष्टीची दुरावस्था:भाजप व प्रशासन जबाबदार- शिवसेनेची निदर्शने

पुणे—पेशवे पार्कमधील कोट्यवधींची शिवसृष्टी धुळखात पडून ठेवण्यात आली आणि...