Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

५० वर्षापूर्वी सैनिकी आयुष्याची अविस्मरणीय सुरुवात केलेल्या जिगरबाजांंना सलामी देत एनडीएत आठवणींचा भरणार यादगार मेळावा

Date:

पुणे- नोव्हेंबर १९७१ मध्ये कमिशन मिळवलेले आय एम ए ( भारतीय रक्षा अकादमी) डेहराडून मधून कमिशन मिळवलेले ऑफिसर आणि त्यांच्या पत्नी तसेच हुतात्मा अधिकाऱ्यांच्या जिगरबाज महिला, जे ३९ व्या राष्ट्रीय सुरक्षा अकादमी मधून कॅडेट म्हणून उत्तीर्ण झाले असे सर्व १५- १६ डिसेंबरला राष्ट्रीय संरक्षण अकादमी मध्ये सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या पासिंग आऊट परेड साठी एकत्र जमणार आहेत, जे कोविडच्या कारणामुळे पुढे ढकलण्यात आले होते.

१२ डिसेंबर १९७० हा एक अविस्मरणीय खास दिवस राष्ट्रीय सुरक्षा अकादमीच्या कारकिर्दीत होऊन गेला, कारण त्या दिवशीच्या ३९ व्या कोर्समधून उत्तीर्ण झालेल्या परेडचे निरीक्षण हे जनरल (नंतर फिल्ड मार्शल) माणिकशा – चीफ ऑफ आर्मी स्टाफ, जे एक अतिशय प्रसिद्ध, नावाजलेले, लढाई मधून ताऊन सलाखून निघालेले, धोरणी आणि उत्तुंग व्यक्तिमत्व असलेले ऑफिसर यांनी केले.

जनरल एस एच एफ जे माणिकशा (एम सी) सेना प्रमुख मुख्य अतिथी ३९ एनडीए पासिंग आऊट परेड १२ डिसेंबर १९७०

त्यादिवशी परीक्षा परेडचे निरीक्षण अधिकारी आणि मुख्य अतिथींची निरभ्र निळ्या आकाशाखाली २४२ ( आर्मी १५५, नौदल ३७, आणि हवाई दल ५०) हे स्तब्ध उभे राहून त्यांची प्रतीक्षा करत होते. देखण्या संचलनानंतर, उमद्या व्यक्तिमत्त्वाच्या आणि कडक शरीर यष्टीच्या जनरल माणिकशा यांनी परेडला संबोधित केले. आयुष्यातील एक अविस्मरणीय अशा स्फुरण देणाऱ्या संबोधनातून त्यांनी सांगितले की ” युद्धामध्ये दुसरा क्रमांक नसतो, देशात हारणाऱ्याला स्थान नाही.” त्यावेळची पूर्व पाकिस्तानातील परिस्थिती आणि घटनाक्रमांचा विचार करता सेना प्रमुखांनी दिलेल्या या संदेशामुळे राष्ट्रीय सुरक्षा अकादमीतील विद्यार्थ्यां अधिकाऱ्यांपुढे येणाऱ्या युद्धप्रसंगी योग्य मानसिकता तयार करण्यासाठी फार उपयोग झाला.

पासिंग आउट परेड अनुषंगाने कॅडेट्स ना जनरल माणिकशासारख्या देशातील एक अतिउत्तम सैन्य योद्ध्या बरोबर चर्चेची दुर्मिळ संधी मिळाली. त्याचबरोबर त्यांच्या १९४० मधील ब्रह्मदेशातील सैनिकी कामगिरीचे अनुभव ऐकायची संधी मिळाली, ज्यावेळेस ते कॅप्टन म्हणून ४/१२ फ्रंटीयर फोर्स रेजिमेंट मध्ये कार्यरत होते आणि त्यांना त्यांच्या महत्त्वाच्या कामासाठी आणि दुर्दम्य पराक्रमासाठी मिलिटरी क्रॉस बहाल करण्यात आला होता.

सैन्यामध्ये दाखल होण्याचे भाग्य – अविस्मरणीय सुरुवात

युद्धामध्ये भाग घेण्याची पूर्वतयारी म्हणून धोरणी जनरल माणिकशा यांनी या तरुण सैनिकी अधिकाऱ्यांना (कॅडेट्स) भारतीय सुरक्षा अकादमी डेहराडून येथे १४ नोव्हेंबर १९७१ रोजी म्हणजे पाच आठवडे आधीच सैन्यात सामील करून घेतले. पासिंग आऊट परेड डिसेंबर १९७१ मध्ये झाली त्यामुळे या सर्व अधिकाऱ्यांना आपापल्या सैन्य तुकडी बरोबर मिसळून वेळ घालवण्याची संधी मिळाली. पूर्व पाकिस्तानातील लढाई ३ डिसेंबर १९७१ रोजी सुरू झाली त्यावेळेस फार मोठ्या संख्येने हे वीशीतील सैन्य अधिकारी या पूर्व पाकिस्तानातील युद्धामध्ये दाखल झाले. तेथील महत्त्वाच्या लढायांमध्ये अखाउरा-अशुगंज-ढाक्का तसेच बंदर-नारायणगंज ज्यामध्ये प्रसिद्ध हवाई ऑपरेशन आणि हवाई छत्रीतून उतरून ढाक्यावर मिळवलेला विजय सामील होते. देश, या सर्व तरुण जांबाज वीरांना त्यांच्या युद्धकौशल्य, वीरता आणि आत्मविश्वासपूर्वक कामगिरीसाठी नेहमीच लक्षात ठेवतो. कुठल्याही सैनिकाला प्रत्यक्ष लढाईमध्ये लढण्याचा मोका मिळणे याच्यापेक्षा त्याच्या सैनिकी आयुष्यामध्ये दुसरा भाग्याचा क्षण नसतो. ही आमची सैनिकी सुरुवात युद्धातील अविस्मरणीय सहभागातूनच झाले.

या तुकडीतील सर्व अधिकारी आपल्या प्रशिक्षणावेळेतील सहकारी एम पी एस चौधरी आणि आरएम नरेश यांची त्यांच्या सर्वोच्च बलिदानाबद्दल आठवण काढून आजही नतमस्तक आहे. त्यांनी लढाईमध्ये ब्रिगेडियर बलविंदर शेरगिल यांच्याबरोबर हातात्म्याच पत्करले नाही तर त्यांनी त्यांच्या दुर्दम्य शौर्य आणि लढाऊ वृत्तीने रणभूमीवर, राष्ट्रीय रायफलसाठी कश्मीर खोऱ्यामध्ये इसवी सन २००० मध्ये पाकिस्तानी अतिरेक्यांच्या टोळ्यांशी मुकाबला करताना आपल्या प्राणांची आहुती दिली.

देशासाठी प्राण अर्पण केलेल्या या शूरवीर योद्धांची आठवण म्हणून यावेळेस भेटणारे सर्व माजी सैनिकी अधिकारी त्यांच्या कुटुंबीय समावेत राष्ट्रीय सुरक्षा अकादमीतील प्रसिद्ध अशा हौतात्म्या पत्करलेल्या सैनिकांच्या स्मारकाला मानवंदना देतील. वैशिष्ट्य म्हणजे ह्या वेळेस या १८ शूरवीर हुतात्मा सैनिकी अधिकाऱ्यांच्या पत्न्या वेगवेगळ्या ठिकाणावरून या मेळाव्यासाठी खास हजर राहणार आहेत.

पाच दशकापूर्वी अकादमी मधून उत्तीर्ण झालेले हे सर्व अधिकारी सध्याचे राष्ट्रीय सुरक्षा अकादमी चे कमांडर अजय कोचर आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे त्यांनी दिलेले सहकार्य आणि उत्तम कार्यक्रमाचे नियोजन याबद्दल अभिनंदन करते.

अभिमान बाळगावा अशी कामगिरी

या सर्व माजी अधिकाऱ्यांना सैन्यात व सैन्य बाहेर अतिशय अभिमानास्पद कामगिरी करून दाखवण्याचे भाग्य लाभलेले आहे. काही आपल्या देशाचे हवाई दल प्रमुख तसेच उपप्रमुख, दोन सैन्यातील मोठे अधिकारी, तीन हवाई दलातील कमांडिंग ऑफिसर, सात लेफ्टनंट जनरल आणि अनेक मेजर जनरल आहेत. काही अधिकार्‍यांनी संयुक्त राष्ट्र महासंघाच्या शांती सैन्यामध्ये तसेच सैन्यातील सल्लागार मंडळात सहभाग घेतला आहे. तसेच एअर चीफ मार्शल एन ए के ब्राऊनी नॉर्वे येथील राजदूत म्हणून, लेफ्टनंट जनरल व्ही के अल्वालिया हे सैन्य दलातील विधिमंडळामध्ये कार्यरत होते. बऱ्याच अधिकाऱ्यांना अभिमानास्पद असे अतिउच्च किताब त्यांच्या सैन्यातील आणि सामाजिक तसेच पर्यावरण, शैक्षणिक, विधी तसेच धोरणात्मक कामासाठी गौरविण्यात आले आहेत. काहीजणांनी वरील विषयांवर पुस्तके पण लिहिली आहेत.या सर्व कार्यक्रमाचे नियोजन आणि प्रत्यक्ष सहभागासाठी सर्व समन्वय अधिकाऱ्याचे व खास करून पुण्यात स्थायिक असलेले लेफ्टनंट जनरल पी के रथ यांचे मनःपूर्वक आभार.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सज्ज आहे – प्रशांत जगताप

पुणे- होणार… होणार.. म्हणता म्हणता पुणे महानगरपालिकेची निवडणूक अखेर...

महायुतीतून पुण्या पिंपरीत अजितदादा कशासाठी बाहेर ? मविआला धोबीपछाड करण्यासाठी ?

पुणे- महापालिका निवडणुका जाहीर होताच आज पुण्यात मुख्यमंत्री देवेंद्र...

पुणे महापालिका निवडणुकीसाठी कॉंग्रेसच्या समन्वय समिती प्रमुखपदी रमेश बागवे

पुणे- येथील महानगरपालिका निवडणुकीसाठी समन्वय समिती गठीत...

इनव्हेलियर इंडिया व राष्ट्रवादी कामगार युनियनमध्ये वेतन करार

पुणे — रांजणगाव येथील इनव्हेलियर इंडिया प्रायव्हेट लिमिटेड आणि...