कुठ्ल्याही शहरी परिसराची जीवनरेखा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पायाभूत सुविधा या शहराच्या कामकाजाचा पाया असतात आणि त्या शहराच्या भविष्याला आकार देण्यात महत्वाची भूमिका निभावत असतात. वाहतूक, उर्जा, दळणवळण, वीज, पाणी, स्वच्छता व कचऱ्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट हे शहराच्या वाढीसाठी अतिशय महत्वाचे आहे.
सिंगापूर किंवा हॉंगकॉंग सारख्या उत्तम पायाभूत सुविधा असलेल्या देशात आर्थिक वाढीचा दर उच्च असल्याचे, रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध असल्याचे तसेच जीवनमान सुद्धा उत्तम असल्याचे अनेक अभ्यासांती दिसून आले आहे. पायाभूत सुविधा स्थावर मालमत्तेच्या विकासाला चालना देतात असे नाही तर स्थावर मालमत्तेच्या मूल्य व किमती सुद्धा थेट प्रभावित होत असते. वस्तुस्थिती अशी आहे की स्थावर मालमत्तेच्या अधिमुल्यनात पायाभूत सुविधा महत्वाची भूमिका निभावतात. सन २००७ मध्ये मंजुरी मिळालेल्या लंडन शहरातील रेल्वे स्थानकांच्या सभोवतालच्या १० मिनिटांच्या त्रिज्येच्याअंतरातील निवासी मिळकतीच्या मूल्यात सन २००८ ते २०१५ च्या दरम्यान ५७ % वृद्धी झाली असल्याचे नाईटफ्रँक ह्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्थावर मालमत्ता सल्लागारांच्या संशोधन अहवालात नमूद केले आहे तुलनेने मध्यवर्ती लंडन मधील मोक्याच्या ठिकाणांच्या स्थावर मालमत्तांच्या किमतीत अवघी ४० % वाढ झाल्याचे आढळले आहे. प्रकल्पाचा मध्यवर्ती भाग जेव्हा सन २०२२ मध्ये कार्यान्वित होईल, तेव्हा या
किमती वाढणे अपेक्षित आहे. हेच कल आपल्याला भारतातील शहरात सुद्धा पाहायला मिळतात . जे एल एल इंडिया यांनी केलेल्या अभ्यासानुसार गुरुग्राम येथील गुरुग्राम – मेहेरौली रस्त्यावरील काही प्रकल्पातील मिळकतीच्य किमति सन २००६ मध्ये ( दिल्ली मेट्रो प्रकल्पाची घोषणा झाली तेव्हा ) रु ५००० प्रती चौरस फुटावरून सन २०१० मध्ये (तो मेट्रो मार्ग कार्यान्वित झाल्यावर ) रु ९००० प्रती चौरस फुटापर्यंत म्हणजेच तब्बल ८० % ने वाढल्या. त्याच कालावधीत त्या परिसराच्य म्हणजे मेट्रो प्रभावित क्षेत्राच्या बाहेरील विभागात फक्त ४० – ५० % वाढ निदर्शनास आली.
पुणे महानगर क्षेत्रीय विकास प्राधिकरणाचा पायाभूत सुविन्धावर जोर स्थावर मालमत्तेच्या किमतींवर प्रभाव टाकण्याच्या व्यतिरिक्त सुधारित पायाभूत सुविधा परदेशी गुंतवणूकदारांनी गुंतवणूक करण्यासाठी सुद्धा अनुकूल वातावरण निर्मिती करतात व शाश्वत आर्थिक विकासाचे इंजिन म्हणून काम करतात. ह्या व अन्य दृष्टीकोनातूनच महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागाने दिनांक ३१ मार्च २०१५ रोजी पुणे महानगर क्षेत्रीय विकास प्राधिकरणाची स्थापना केली.
शाश्वत विकासाच्या सोबतच पुणे महानगर क्षेत्र हे गुंतवणूक आकर्षित करण्याच्या दृष्टीने महत्वाचे केंद्र म्हणून विकसित करण्याची जबाबदारी पुणे महानगर क्षेत्रीय विकास प्राधिकरणावर सोपविण्यात आली आहे. पुणे महानगर क्षेत्रामध्ये पुणे व पिंपरी चिंचवड या जुळ्या शहरांच्या सोबतच मावळ, मुळशी, हवेली, हे तालुके पूर्णपणे व भोर, दौंड , शिरूर, खेड , पुरंदर, व वेल्हे तालुक्याच्या काही भागांचा समावेश होतो एकूण सुमारे ७२५६.४६ वर्ग किलोमीटर क्षेत्रफळ व त्यातील सुमारे ७२.७६ लाख लोकसंख्या पुणे महानगर क्षेत्रीय विकास प्राधिकरणाच्या अखत्यारीत असून हे राज्यातील सर्वात मोठे शहरी एकक आहे.
मेट्रो रेल्वे पासून ते पुणे रिंग रोड ते नियोजनपूर्वक वसाहत योजना यासारख्या पुणे शहर व
सभोवतालच्या महत्वपूर्ण व कळीच्या विविध पायाभूत सुविधा प्रकल्पामध्ये (सुमारे सहा वर्षांच्या
कालावधीत ) पुणे महानगर क्षेत्रीय विकास प्राधिकरण हे एक सर्वात कार्यक्षम नियोजन प्राधिकरण
म्हणून पुढे आले आहे. पुणे महानगर क्षेत्रीय विकास प्राधिकरणाकडून विकसित केली जाणाऱ्या
शिवाजीनगर – हिंजवडी मेट्रो प्रकल्पामुळे माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील व्यावसायिकांना शहराच्या विविध भागातून माहिती तंत्रज्ञान पार्क असलेल्या हिंजवडीत जाणे अतिशय सोयीचे व सोपे होणार आहे. त्याच प्रमाणे १२८ किलोमीटर लांबीचा रिंग रोड प्रकल्प सुद्धा सगळी समीकरणे बदलणारा असून त्यामुळे सर्वदूर विविध जोडण्याना चालना मिळून पुणे व आजूबाजूच्या सगळ्या भागाचा लाभ होईल. त्याच प्रमाणे अहमदाबाद शहराच्या धर्तीवर रिंग रोडच्या दोन्ही बाजूला ४६ नगर वसाहती प्रकल्प उभारण्याचे नियोजन पुणे महानगर क्षेत्रीय विकास प्राधिकरणाने केले आहे. सदर दोन्ही प्रकल्प एकाचवेळेस राबविण्यात येणार आहेत . कोव्हीड १९ साथीमुळे म्हाळुंगे – माण येथील पहिली वाहिली नगर वसाहत योजना रेंगाळली असली तरीही जेव्हा ती पूर्णपणे तयार होतील तेव्हा त्या सगळ्या भागाचा कायापालट होऊन निवास व व्यवसायासाठी एक आधुनिक व अतिशय मागणी असलेला भाग असेल.
या सगळ्याच्या व्यतिरिक्त, अनेक शाश्वत व मजबूत पायभूत सुविधा उभारून पुणे महानगर क्षेत्र हे जागतिक दर्जाचे केंद्र बनविण्याचे पुणे महानगर क्षेत्रीय विकास प्राधिकरणाचे उद्दिष्ट असून त्यामुळे पुणे व सभोवतालच्या भागातील नागरिकांच्या जीवनमानाची गुणवत्ता सुद्धा उंचावणार आहे. अंतिमतः “पायाभूत सुविधा प्रथम “ हा दृष्टीकोनच शहराला सद्यस्थितीत कार्यरत ठेवेल व भविष्यासाठी तयार ठेवेल.
लेखक -श्री अनिल फरांदे हे पुण्याच्या पश्चिम भागातील नगर वसाहतीच्या क्षेत्रातील आघाडीची व आयएसओ ९००१- २००० प्रमाणित फरांदे स्पेसेस या मुख्य कंपनीच्या फरांदे प्रमोटर्स & बिल्डर्स कंपनीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक असून क्रेडाई ( पुणे मेट्रो ) चे उपाध्यक्ष व महारेराच्या समेट मंचाचे सभासद आहेत.