आता सगळेच जण डिजिटल पेमेंट्सचा वापर करत असून, भारत डिजिटल-फर्स्ट अर्थव्यवस्थेच्या दिशेने जात आहे. डिजिटल पेमेंट्समुळे सुरक्षा आणि सोईस्करपणा मिळतो. मात्र, डिजिटल पेमेंट्स सुरक्षितपणे वापरणे आणि ऑनलाइन स्कॅम्स टाळणे महत्त्वाचे आहे. संभाव्य स्कॅम्स आधीच ओळखण्याने तुम्हाला व प्रियजनांना मदत होऊ शकते. त्यातूनच प्रत्येकासाठी जास्त सुरक्षित, कॅशलेस अर्थव्यवस्था उभारणे शक्य होणार आहे.
डिजिटल अरेस्ट म्हणजे काय?
ऑनलाइन स्कॅम्स जास्त सफाईदार होत आहेत आणि डिजिटल अरेस्ट स्कॅम्स हे त्याचं प्रमुख उदाहरण म्हणता येईल. या प्रकारच्या स्कॅममध्ये फसविणारे आपण कायदे अधिकारी असल्याचे भासवून नागरिकांना पैसे पाठविण्यासाठी किंवा वैयक्तिक माहिती शेयर करण्यासाठी भाग पाडतात. त्यासाठी संबंधित व्यक्ती किंवा त्यांच्या कुटुंबातील सदस्याविरोधात कायदेशीर केस करण्याची धमकीही दिली जाते. ते फोनद्वारे संपर्क करतात आणि व्हॉट्सअॅप किंवा स्काइपद्वारे व्हिडीओ कॉल्स करतात. नागरिकांना तथाकथित आर्थिक गैरव्यवहार किंवा इतर कायदेशीर उल्लंघनासाठी डिजिटल अरेस्ट वॉरंटची भीती घालतात. भीतिपोटी कित्येक नागरिक बळी पडतात व त्यांचे आर्थिक नुकसान होते किंवा त्यांची ओळख चोरली (आयडेंटिटी थेफ्ट) जाते.
संभाव्य डिजिटल अरेस्ट स्कॅम कसे ओळखाल –
- ‘अधिकाऱ्यां’कडून अनपेक्षित संपर्क – पोलिस, सीबीआय, इन्कम टॅक्स अधिकारी किंवा कस्टम एजंट असल्याचा दावा करून कोणी तुम्हाला संपर्क केल्यास सावधान राहा. जर त्यांनी त्वरित कायदेशीर कार्यवाही करण्याची किंवा वॉरंट पाठविण्याचा दावा केला, तर सावध राहा. तुम्ही किंवा तुमच्या घरातील सदस्य पैशांची अफरातफर, कर बुडवेगिरी किंवा ड्रग ट्रॅफिकिंग अशा गंभीर गुन्ह्यांत सहभागी असल्याचा दावा केला जातो.
- घाबरविणारी भाषा आणि घाई – स्कॅमर्स व्हिडीओ कॉलची विनंती करून पोलिसाचा वेश परिधान करून, सरकारी लोगो वापरून किंवा अधिकृत वाटणारे आवाज पार्श्वभूमीवर वापरून घाबरविण्याचा प्रयत्न करतील. ते बऱ्याचदा कायदेशीर भाषा वापरून अटक करण्याची किंवा तत्काळ कायदेशीर कार्यवाही करण्याची धमकी देऊन जलद प्रतिसाद देण्याची मागणी करतात. काही वेळेस ते पोलिस स्टेशन किंवा सरकारी ऑफिसचा देखावा तयार करून सगळं अधिकृत असल्याचं भासवलं जातं.
- संवेदनशील माहिती किंवा पेमेंट पाठविण्याची विनंती – स्कॅमर्स वैयक्तिक माहिती किंवा मोठ्या रकमेची मागणी करण्याची दाट शक्यता असते. त्याच्या बदल्यात तथाकथित गुन्ह्यातून तुमचं नाव रद्द करण्याचं आश्वास दिले जाते. तपास पूर्ण होईपर्यंत ते तुम्हाला त्यांच्या खात्यात तातडीनं पैसे पाठविण्यासाठी सांगू शकतील. ‘नाव क्लीयर करणं’ किंवा ‘तपासासाठी सहकार्य करणं’ किंवा ‘रिफंडेबल सिक्युरिटी डिपॉझिट/एस्क्रो अकाउंट’ अशा शब्दांचा वापर करून ते तुम्हाला विशिष्ट बँक खातं किंवा यूपीआय आयडीवर पैसे पाठविण्यास सांगतील.
सुरक्षित राहाण्यासाठी व्यवहार्य टिप्स
- थांबा आणि पडताळणी करा – तुम्हाला कायदेशीर समस्येची भीती घालणारे अनपेक्षित कॉल्स किंवा मेसेजेस आले, तर एकक्षण थांबून पडताळणी करा. शांत राहा, कारण स्कॅमर्स भीती आणि गडबडीचा फायदा घेतात. खऱ्या सरकारी संघटना किंवा कायदे सुरक्षा संघटना कधीच पैसे मागणार नाहीत किंवा फोन अथवा व्हिडीओ कॉलद्वारे केसची तपासणी करणार नाहीत. कायम कॉलरची ओळख तपासा आणि कोणतीही कृती करण्याआधी विश्वासार्ह स्रोतांचा सल्ला घ्या.
- सपोर्ट चॅनेल्सचा वापर करा – संशयी नंबर्स १९३० वर डायल करून राष्ट्रीय सायबरक्राइम हेल्पलाइनला कळवा किंवा दूरसंचार खात्याला माहिती द्या. (https://sancharsaathi.gov.in/sfc/).
- रेकॉर्ड करा आणि तक्रार करा: मेसेजेस सेव करा, स्क्रीनशॉट घ्या आणि झालेलं संभाषण नोंदवा. यामुळे तुम्हाला केस दाखल करायची झाल्यास खऱ्या अधिकाऱ्यांना मदत होईल.
- For more information, visit: https://www.npci.org.in/