पुणे-
सहकारनगर परिसरातील स्वानंद आरोग्य कोठी व संभाजीनगर परिसरातील आरोग्यकोठी परिसरातील झाडांच्या फांद्या छाटण्यासाठी व गोळा झालेला पाला पाचोळा नेण्यासाठी नगरसेवक महेश वाबळे यांच्या प्रयत्नातून फांद्याछाटणी गाडी उपलब्ध करून देण्यात आली. या गाडीचे उदघाटन नुकतेच सावित्रीबाई फुले विद्यापीठ सिनेट सदस्य प्रसन्नजीत फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नितीन करंदीकर, सुहास भाडगावकर ,अजित अभ्यकर ,आरोग्य अधिकारी नरेंद्र भालेराव, दिनेश सोनवणे ,शांताराम सोनवणे व जाधव उपस्थित होते.
पुण्याच्या दक्षिण उपनगरातील सहकारनगर परिसरात झाडांची संख्या सर्वाधिक आहे. मोठ्या प्रमाणावरील झाडांच्या संख्येमुळे पावसाळ्यात फांद्या पडणे व अपघात होणे, पालापाचोळ्यामुळे दुर्गंधी पसरणे आग लागणे, डीपी जळणे असे प्रकार घडण्याची शक्यता असते. अशा दुर्दैवी घटना घडू नयेत म्हणून झाडांच्या फांद्या छाटणे, छाटलेल्या फांद्या आणि पालापाचोळा व ओला कचरा नेण्यासाठी गाड्यांची गरज लक्षात घेऊन नगरसेवक महेश वाबळे यांच्या विशेष प्रयत्नांतून गाडी उपलब्ध झाल्याने सहकारनगर परिसराची स्वच्छता व सुरक्षितता वाढण्यास मोठी मदत होणार असल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

