‘सारेगमप’ च्या सांगीतिक पर्वातून अनेक कलाकार समोर आले. काही टिकले, काही मागे पडले. या टिकलेल्या आणि संगीताच्या क्षेत्रात मनापासून रमलेल्या कलाकारांतलं पुण्यातलं महत्त्वाचं नाव म्हणजे सावनी रवींद्र. संगीतकार यशवंत देव आणि रवी दाते यांच्याकडे गझलचं शिक्षण, पं. हृदयनाथ मंगेशकर यांच्यासह गायिका म्हणून ‘भावसरगम’मध्ये सादरीकरण आणि ‘सारेगमप’च्या अंतिम फेरीपर्यंत ती पोहोचली . गाण्यांच्या विविध कार्यक्रमांसह सध्या ती सिनेमांसाठी पार्श्वगायनही करते आहेच . पण विशेष म्हणजे सध्या तिची ओळख हि मराठी मालिकांमुळे जास्त होत आहे .
सर्वप्रथम तीच प्रसिद्धीच्या शिखरावर गेलेलं गाण म्हणजे ” होणार सून मी या घरची ” मधील श्री आणि जान्हवीच प्रेमगीत , ” नाही कळले कधी ” या गाण्याने तरुणाईला अगदी वेड लावलं होत , तेव्हा प्रत्येकाच्या मनामनामध्ये सावनी रवींद्र ने घर केल . त्यानंतरही अनेक सिनेमांमध्ये तिने पार्श्वगायन केल . पण मालिकांची साथ तिने कधी सोडली नाही आणि सध्या तर टीवी वर तिचीच ३ मराठी मालिकांची टाइटल गाणी एकत्र सुरु आहेत. आणि तिच्यासाठी हि नक्कीच अभिमानाची बात आहे . कलर्स मराठी वर “अस सासर सुरेख बाई ” आणि ” कमला ” आणि झी मराठी वरील ” पसंत आहे मुलगी ” हि गाणी सुद्धा लोकप्रिय होत आहेत . मराठी गाण्यांमध्ये सावनीचा हातखंडा आहेच पण आता ती तमिळ सिनेमाना सुद्धा पार्श्वगायन करू लागलीय , व तिची लोकप्रियता दक्षिण भारतात सुद्धा होऊ लागलीय हे विशेष . मालिका आणि सिनेमामधील गाणी मिळताना तिला लहानपणापासून केलेला रियाझ नक्कीच कामी येतो .
केवळ मालिका सिनेमा एवढ्यावरच न थांबता मुंबई , महाराष्ट्र त्याच प्रमाणे केनडा , दक्षिण आफ्रिका , इंग्लंड , अमेरिका , दुबई , मस्कत सिंगापूर अश्या अनेक देशात जाऊन तिने गाण्याच्या कार्यक्रमांचे दौरे केले आहेत . एवढाच नव्हे तर इंटरनेटच्या जमान्यात ” सावनी अनप्लग ” भाग एक आणि दोन अशी एकूण २० गाणी तिने तिच्या चाहत्यांसाठी तिच्या ” सावनी रवींद्र ” आणि “ओन्ली मराठी एंटरतेन्मेंत “युटुब च्यानल्वर ठेवली आहेत . तिच्या चाहत्यांनी सुद्धा या गाण्यांना सुद्धा भरघोस प्रतिसाद दिला आणि तिला यशाच्या शिखरावर चढवले . सावनी रवींद्र पहिली मराठी अनप्लग गायिका म्हणून ओळखली जाते .
सावनीने शालेय वयापासूनच संगीतकार यशवंत देव यांच्याकडे शिक्षण घेतलं . तेवढ्यासाठी ती मुंबईत राहिली. तिथं तिचं सुरांचं ज्ञान तर पक्कं झालंच; पण भावसंगीताकडे ओढा अधिक वळला. महाविद्यालयीन शिक्षण सुरू असतानाच मिलिंद ओक यांनी ‘ब्लॅक अँड व्हाइट’ या कार्यक्रमाविषयी विचारलं आणि तिथून स्वतःहून न ठरवताच एक सुंदर सांगीतिक प्रवास घडत गेला.
सावनीनं बीए संस्कृतनंतर, एमए मराठी केलं आणि आता भारती विद्यापीठातून ती एमए म्युझिकची पदवी विशेष नैपुण्यानं उत्तीर्ण झाली आहे. सातवी ते बारावीच्या दरम्यान तिनं यशवंत देव यांच्याकडे भावसंगीताचं शिक्षण घेतलं. शब्दोच्चार, गाण्यांतला भाव त्यांच्याकडून खूप चांगल्या पद्धतीनं शिकता आला. वर्षा भावे यांच्या गुणनिधी स्पर्धेनंतर थेट ‘सारेगमप’मध्येच सहभाग नोंदवला. त्यापूर्वी तिने गाण्याच्या स्पर्धेत म्हणून कधीच सहभाग नोंदवला नव्हता .
आई-वडिलांमुळे (डॉ. वंदना घांगुर्डे – डॉ. रवींद्र घांगुर्डे) घरातच शास्त्रीय आणि नाट्यसंगीताचं वातावरण होतंच. त्यांनी दिलेला पाठिंबाही महत्त्वाचा होता. विविध मान्यवर गुरूंकडून लाभलेल्या शिक्षणात मात्र तिचे गझल गुरू हे रवी दाते होते . . मूळचे स्वर पक्के असले, तरी सुगम संगीतात थेट स्वर लावावे लागतात. प्रयोग म्हणूनही थोडं थांबून चालत नाही. श्वासावर नियंत्रण कसं आणि कुठे असावं, तोंडासमोरून माइक कधी आणि किती बाजूला घ्यायचा, या सगळ्या गोष्टी विविध गुरूंच्या सहवासामुळेच तिला शिकता आले . पं. कुमार गंधर्व यांचे गुरूबंधू पंढरीनाथ कोल्हापुरे आणि वडील रवींद्र घांगुर्डे यांच्याकडे तिचं शास्त्रीय संगीताचं शिक्षण आजही सुरू आहे.
‘अजूनही’ हा तिचा सोलो मराठी गीतांचा अल्बम आणि ‘मेरे हिस्से का चाँद’मध्ये सावनीनं हिंदी-उर्दू गझल गायल्या . त्याच प्रमाणे . ‘गझल का सफर’, ‘ट्रेंडसेटर’ हे कार्यक्रम आणि ‘आशाएँ’ या अल्बमसह ती ‘अजब लग्नाची गजब गोष्ट’, ‘ती रात्र’, ‘अजिंठा’, ‘कुणी घर देता का घर’ केरी ऑन देशपांडे यांसारख्या सिनेमांसाठीही गायली आहे. आणि वन वे तिकीट , पिंडदान या सारखे मोठे सिनेमे प्रदर्शनासाठी तयार आहे
(Sharad Lonkar -9423508306/9890725049/email- sharadlonkarpune@gmail.com)