शरद पवार आणि सुशीलकुमार शिंदे ज्यामध्ये पाहुणे कलाकार म्हणून झळकले आहेत तो ‘सरपंच भगीरथ ‘ हा चित्रपट ४ मार्च पासून संपूर्ण महाराष्ट्रातील चित्रपटगृहांमध्ये दाखलहोतो आहे
आरक्षणाचा प्रश्न मोठ्या कल्पकतेने हाताळलेला’सरपंच भगीरथ’ हा चित्रपट सकारात्मक विचारांचा प्रसार करण्याचे काम करेल असा विश्वास या चित्रपटाचे निर्माते शिवकुमार लाड यांनी व्यक्त केला. ते म्हणाले की या चित्रपटात सरपंचाच्या माध्यमातून जातीच्या राजकारणाला उत्तर देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. हा चित्रपट ग्रामीण भागात आणि शहरी भागांतील रसिकांना नक्कीच आवडेल. ग्रामीण भागातील राजकारण आजही जाती-धर्मावरच आधारित आहे. ‘सरपंच भगीरथ’ हा चित्रपट समाजातील जातीभेदावर भाष्य करणारा असला तरी लोकांपर्यंत सामाजिक न्यायाची भूमिका नक्कीच पोहचवेल असेही पुढे ते म्हणाले.
‘सरपंच भगीरथ’ या चित्रपटची कथा आसाराम लोमटे यांची असून त्यावरविष्णू सूर्या वाघ यांनी पटकथा रचली आहे तर संवाद लेखन रामदासफुटाणे केले आहे. संगीतकार -शाहीर संभाजी भगत, यांच्या सोबत पार्श्वगायक- आनंद शिंदे यांनी केले आहे तर पार्श्वसंगीत राहुल रानडेयांनी दिले असून संकलन सर्वेश परब यांचे आहे. छायांकन चारुदत्त दुखंडे यांनी केले असून कलादिग्दर्शन मधुकर पाटील यांचे आहे. या चित्रपटात उपेंद्र लिमये, वीणा जामकर, डॉ. मोहन आगाशे, किशोर कदम, स्वरांगी मराठे, सविता मालपेकर, जयमाला इनामदार, विजय जोशी, वसंतअवसरीकर, उदय लागू, श्रीराम रानडे, मीरा उमप, आनंद पानसे, जयवंतवाडकर, प्रकाश धोत्रे, सुहासिनी देशपांडे,बालकलाकार श्रुती – तन्वीथोरात आदी कलाकार आहेत.
‘सरपंच भगीरथ’ या सिनेमाचं संगीत दिग्दर्शन हे माझ्यासाठी कलाटणीदेणारा क्षण म्हणता येईल असे उद्गार या चित्रपटाचे संगीतकार संभाजीभगत यांनी काढले ते पुढे म्हणाले, हा सिनेमा करण्यामागची माझी भूमिकाठाम होती. इथल्या जातीव्यवस्थेवर भाष्य करणारा सिनेमा आहे. आपल्याविचारांचा सिनेमा आहे. आपल्या विचारांचं काम करायला मिळण, याहूनदुसरी आनंदाची गोष्ट नसते. आणि तोच आनंद मला या सिनेमाचं संगीतकरताना मिळालाय. या सिनेमात एकूण तीन गाणी आहेत, त्यातले एक गाणंआनद शिंदे यांनी गायलंय तर दुसर चंदन कांबळे यांच्या आवाजात आहेआणि तिसर गाणं मी स्वतःच गायलंय. तसचं सिनेमातील गाणी मी आणिप्रकाश घोडकेंनी मिळून लिहिली आहेत.
१९ वर्षानंतर जाती व्यवस्थेवर आसूड ओढणाऱ्या ‘सरपंच भगीरथ’ चित्रपटाद्वारे दिग्दर्शक म्हणून रामदास फुटणे पुनरागमन करीत आहेत. या चित्रपटाबाबत फुटाणे म्हणाले, आसाराम लोमटे यांची कथा वाचली होती. त्यांची ती पहिलीच कथा असूनही त्यांनी जाती व्यवस्थेचे अचूक निरीक्षण त्यात नोंदवले आहे. ती कथा वाचली तेव्हाच मला त्यात चित्रपटाची बीजे असल्याचे जाणवले. एक दिवस उदयदादा लाड यांचे पुत्र शिवकुमार लाड माझ्याकडे आले आणि त्याने मला चित्रपट दिग्दर्शित करण्याबाबत विचारले. तेव्हा मी त्याला लोमटेंच्या या कथेबाबत सांगितले असता तो लगेच तयार झाला आणि आम्ही ‘सरपंच भगीरथ’ या चित्रपटाला सुरुवात केली. जाती व्यवस्था आज पुसली जात आहे असे म्हटले जाते, परंतु ती आजही असल्याचे ते म्हणाले.
राजकारणही जाती – धर्मावर
शाळेमध्येही प्रथम जात विचारली जाते आणि टीसीवरही जातीचा उल्लेखअसतोच. राजकारणही आज जाती – धर्माच्या आधारावरच केले जातेआणि मतेही याच मुद्द्यावर मागितली जातात. असे असताना जातीव्यवस्था नष्ट झाली असे आपण कसे म्हणू शकतो, या चित्रपटातून मी हाचविषय प्रेक्षकांपुढे आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. ग्रामीण भागातील कथाअसली तरी शहरी प्रेक्षकांनाही ती आवडेल अशा पद्धतीने आम्ही याचीमांडणी केली आहे. या चित्रपटाचे आणखी एक विशेष म्हणजे याचित्रपटाची पटकथा. आणि ती लिहिली आहे गोव्याचे आमदार लेखकविष्णू सूर्या वाघ यांनी. त्यांचाही हा पहिलाच प्रयत्न असून एक उत्तमलिखाण त्यांनी या निमित्ताने केले आहे.
धुरंधर नेते शरद पवार,सुशीलकुमार शिंदे सिनेमात!
ज्यांच्या राजकारणातल्या भूमिकेकडे देशाचे लक्ष असते, ते शरदचंद्र पवार व राजकीय पटलावर हसमुख ‘भूमिकां’मुळे नेहमी चर्चेत असणारे सुशीलकुमार शिंदे ही गुरु– शिष्याची जोडगोळी ‘सरपंच भगीरथ’ च्या निमित्ताने या मराठी चित्रपटात दिसणार आहेत. दिग्दर्शक रामदास फुटाणेयांनी ही किमया घडवून आणली. ‘सरपंच भगीरथ’ या चित्रपटात पवार-शिंदे ‘पाहुणे कलाकार’ म्हणून झळकले आहेत. विशेष म्हणजे, रंगीतपडद्यावर प्रथमच अवतरणाऱ्या या नेत्यांनी पडद्यावर नेत्याचीच भूमिकावठवली आहे. डॉ. श्रीराम लागू, निळू फुले यांना पडद्यावर आणि पडद्यामागेविजय तेंडूलकर – डॉ. जब्बार पटेल या चार श्रेष्ठांना ‘सामना’ चित्रपटाच्यामाध्यमातून एकत्र आणून सन १९७५ मध्ये फुटाणे यांनी इतिहास घडवलाहोता. राजकीय व्यवस्था आणि कृतीशून्य नैतिकतेवर प्रखर भाष्यकरणाऱ्या सामना नंतर आता ‘सरपंच भगीरथ’ मध्ये फुटाणे यांनी आरक्षणआणि जातीव्यवस्थेचा गंभीर विषय हाताळलेला आहे