महिला सबलीकरणातून महिलांना रोजगार मिळवून देण्यासाठी हक्काचे विक्री केंद्र असलेल्या ‘स्माईल’(सावित्री मार्केटिंग इन्स्टिट्यूट फॉर लेडिज एम्पावरमेंट) या स्वयंसेवी संस्थेच्या वतीने संक्रांतीनिमित्त महिला बचत गट निर्मित वस्तूंच्या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.
स्माईल च्या संस्थापक खासदार अॅड. वंदना चव्हाण यांच्या संकल्पनेतून ‘संक्रांती निमित्त’ महिला बचत गटातील महिलांनी आणि मतिमंद मुलांनी तयार केलेल्या विविध प्रकारच्या वस्तूंचे हे प्रदर्शन विश्रामबागवाडा येथे सर्वांसाठी खुले आहे. उद्या रविवार हा या प्रदर्शनाचा शेवटचा दिवस आहे.
आत्तापर्यंत साधारपणे 900 हून अधिक रसिकांनी या प्रदर्शनास भेट दिली आहे, अशी माहिती प्रदर्शनाच्या संयोजिका प्रदीप्ता कुलकर्णी यांनी दिली.
प्रदर्शनामध्ये हॅण्डमेड पेपर, खण यापासून बनविलेल्या निरनिराळ्या वस्तू, पर्सेस, फाईल्स्, पिशव्या, वॉलेटस्, मोबाईल कव्हर, फोटोफ्रेम, पेनस्टँड, चिट बॉक्स, बांबू डायरी, उन्हाळी तसेच निरनिराळ्या प्रकारचे खाद्यपदार्थ, तीळ वडी, दागदागिने, स्टॉल आहेत.