पुणे- भारतीय जनता पार्टी ओ बी सी आघाडीच्यावतीने बकाल वक्तव्य करणारे अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर वादग्रस्त वक्तव्य केल्याबद्दल नाना पेठमधील ए. डी. कॅम्प चौकात श्रीपाल सबनीस यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन भारतीय जनता पार्टी ओ बी सी आघाडीचे पुणे शहर अध्यक्ष मनीष साळुंके यांच्या नेतृत्वाखाली करून निषेध करण्यात आला .
भारतीय जनता पार्टी ओ बी सी आघाडीचे पुणे शहर अध्यक्ष मनीष साळुंके , अनुसूचित जमाती विभागाचे प्रदेश सरचिटणीस सुखदेव अडागळे , माजी नगरसेवक भारत निजामपूरकर ,दीपक शिंदे , नईम शेख , संदीप जांभळे , संजय व्हावळ , अजय पांदिवाले , माधव साळुंके , चेतन शर्मा , रोहन ढोले , पंत कुलकर्णी व मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते .
यावेळी भारतीय जनता पार्टी ओ बी सी आघाडीचे पुणे शहर अध्यक्ष मनीष साळुंके यांनी सांगितले कि , खऱ्या अर्थाने सहिष्णुता पाळण्याचे काम नरेंद्र मोदी करतात परंतु ,असहिष्णुता करण्याचे काम श्रीपाल सबनीस करीत आहे त्यांचा प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करून असहिष्णुतेचा नाश केला आहे . श्रीपाल सबनीस सहिष्णुता वाढविण्याचे काम करीत आहे .
दीपक शिंदे यांनी सांगितले कि , श्रीपाल सबनीस हे साहित्यिक नसून कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे दलाल आहेत .
सुखदेव अडागळे यांनी सांगितले कि , श्रीपाल सबनीस हे मनोरुग्ण आहेत नरेंद्र मोदी हे आंतरराष्ट्रीय पातळीवर चांगले काम करीत आहे हे काम कोणाला देखवत नाही .
नईम शेख यांनी सांगितले कि , श्रीपाल सबनीस यांनी बोलताना जपून शब्द वापरावे त्यांच्या सारख्या साहित्यकाने अरे तुरेची भाषा करू नये .