जुन्नर- (संजोक काळदंते)
अपघात प्रसंगी वाहनांचे नंबर स्पष्ट दिसणे गरजेचे असते मात्र काही फॅन्सी नंबर लावण्याची सध्या फशन झाली आहे यामुळे अपघात अथवा गुन्हा घडल्यावर तपास करणे पोलिसांना कठीण जात असल्याने ओतूर आणि परिसरात फॅन्सी नंबरप्लेट लावणाऱ्या वाहनावर ओतुरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रविंद्र थोरात कडक कारवाई करणार असून अशा नंबर प्लेट लावणाऱ्यांना पोलिसांतर्फे आता चांगलीच चपराक बसणार आहे.
सध्या ‘दादा’,’नाना’,’बाबा’,’भाऊ’,’साई’,’पवार’,अशा अनेक प्रकारच्या नावांची नंबर प्लेट तयार करून वाहतूक शाखेने दिलेल्या नंबरची पुरती वाट लावून काही जन वाहतुकीचे नियमांचे उल्लंघन करीत आहेत अशांना ओतूर पोलिसांतर्फे चपराक देवून कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागणार असल्याचे ओतूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रविंद्र थोरात यांनी सांगितले.वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवणाऱ्या फॅन्सी नंबर लावणाऱ्या वाहन चालक मालक यांच्यावर आता कारवाई होणार असल्याने लवकरच त्यांनी आपल्या वाहनांच्या नंबर प्लेट्स नियमात बनवून घ्याव्यात तसेच प्रसंगी असे नंबर बनवून देणाऱ्या रेडियम प्लेट्स बनवनाऱ्या कलाकारांवर देखील पोलिसांकडून कारवाई होवू शकते असे थोरात यांनी बोलताना सांगितले.