दिव्यांग व्यक्तींसाठी तंत्रज्ञान आधारित सहाय्यक साधनांचा वितरणाचा कार्यक्रम संपन्न

Date:

पुणे:
पुणे महानगरपालिका समाज विकास विभाग व युनायटेड वे बेंगलुरू यांच्या संयुक्त विद्यमानाने स्टेट ट्रीट यांच्या कॉर्पोरेट सोशल रिस्पोन्सिबिलिटी (CSR) अंतर्गत पुणे महानगरपालिका हदीतील दिव्यांग व्यक्तींसाठी तंत्रज्ञान आधारित सहाय्यक साधनांचा वितरणाचा कार्यक्रम दि.२५/०३/२०२६ रोजी पुणे महानगरपालिका नवीन इमारत, तळ मजला, शिवाजीनगर या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता
युनायटेड वे बेंगलुरू व पुणे महानगरपालिकेच्या समन्वयाने पूणे महानगरपालिका हद्दीतील पात्र दिव्यांग व्यक्तींना निओ मोशन-इलेक्ट्रिक व्हीलचेअर- ७ नग. वाडिया महाविद्यालयातील अंध विद्यार्थ्यांसाठी SHG स्मार्ट चष्मे-१३ नग. वाडिया महाविद्यालय आणि स्वाभिमान स्पेशल एज्युकेशनल स्कुल खडकी यांच्यासाठी प्रत्येकी १ किबो डिव्हाइस (Al वा चन सहाय्यक) या आधूनिक उपकरणांचे वाटप करणेत करण्यात आले सदर कार्यक्रमासाठी मा. मंजुषा नागपुरे महापौर पूणे, मा. नवल किशोर राम, महापालिका
आयुक्त,
अतिरिक्त आयुक्त पवनी त कौर तसेच आशा राऊत, , रामदास चव्हाण, .प्रवीण येडूलकर, राज्य अध्यक्ष प्रहार संघटनाधर्मेंद्र सातव, दिव्यांग नागरिक व विद्यार्थी उपस्थित होते
सदर कार्यक्रमा मध्ये महापालिका आयुक्त नवल किशोर राम, ,यांनी दिव्यांगांमध्ये कोणतीहरी कमतरता नसते तर व्यवस्थेमध्ये कमतरता असतात, असे मत व्यक्त केले. त्यामळे दिव्यांगाना दैनंदिन जीवन सुखकर होण्यासाठी त्यांना आवश्यक असलेल्या भौतिक सुविधा निर्माण करून देण्याची बाब लक्षात आणून दिली. पुणे महानगरपालिका दिव्यांगांसाठी विविध योजना राबबित असल्याचे तसेच पुणे महानगरपालिकेने शासनाच्या इतर विभागाच्या सहकार्याने दिव्यांगाना विविध कृत्रिम अवयव मोजमाप वाटप कार्यक्रम घेतल्याची माहिती दिली.
महापौर मंजुषा नागपुरे, पुणे यांनी सर्व मान्यवरांचे स्वागत करून युनायटेड वे बंगलुरू, trestle labs आणि इतर संस्थां्े दिव्यांगांसाठी केलेल्या कार्याबदल कौतुक केले. त्यांनी सांगितले की दिव्यांग व्यक्ती हा समाजाचा अविभाज्य भाग आहे आणि त्यांना वेगळे न पाहता त्यांच्या विशेष गरजांसाठी स्वतंत्र व्यवस्था आवश्यक आहे यासाठी पुणे महानगरपालिकेत “दिव्यांग भवन” उभारण्याचा प्रस्ताव त्यांनी मांडला. Neo Motion इलेक्ट्रिक व्हीलचेअर, स्मार्ट चष्मे आणि Al आधारित वाचन उपकरण यांसारख्या तंत्रज्ञानामुळे दिव्यांग व्यक्तींचे स्वावलंबन आणि रोजगाराच्या संधी वाढतील, असे त्यांनी नमूद केले. तसेच CSR उपक्रमांद्वारे योग्य लाभार्थ्यापर्यत मदत पोहोचत असल्याचेही त्यांनी कौतुक केले. शेवटी, अधिक संस्था CSR माध्यमातून पुढ येऊन समाजोपयोगी उपक्रम राबबाबेत, तसेच दिव्यांगांसाठी समावेशक आणि सुलभ व्यवस्था निर्माण करण्यासाठी सहकार्य करावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली
कार्यक्रमा नंतर दिव्यांगाना वाटप करण्यात आलेल्या साहित्या विषयी संस्थेमार्फत आवश्यक ते प्रशिक्षण देण्यात आले
सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक उप आयुक्त, आशा राऊत यांनी केले. तर आभार प्रदर्शन श पाटील, उप समाज विकास अधिकारी यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती अलका जोशी यांनी केले

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

अंधश्रद्धेला सोडा,विज्ञानाची धरा कास

महात्मा फुले वाडा समता भूमी येथून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी...

सुधारित ‘उडान’ या प्रादेशिक संपर्क योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता,एकूण 28,840 कोटी रूपयांचा निधी मंजूर

नवी दिल्‍ली, 25 मार्च 2026 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली...

आईच्या मायेची तुलना जगात कशाशीही होऊ शकत नाही

मराठी विश्वकोश मंडळाचे माजी अध्यक्ष राजा दीक्षित यांचे मत मातृगौरव...

” झिरो पेंडेंसी “च्या नावाखाली अयोग्य कारभार ?

अवघ्या सात तासात 95 विषय मंजूर... विक्रमी कारभार पुणे- काल...