Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

दिवाळी पहाटेच्या मुहूर्तावर रंगणार “कट्यार काळजात घुसली” चा दिमाखदार प्रिमीयर

Date:

 

सूर निरागस हो चा स्वर्गीय सूर, घेई छंद मकरंदची अफलातून जुगलंबदी, तेजोनिधी लोह गोलच्या हरकती, दिल की तपीशमधून व्यक्त झालेली मनातील उद्विग्नता, मन मंदिरामधून दिसणारं गुरू शिष्याचं नातं अशा विविध भाव भावना गाण्यांमध्ये गुंफवून प्रेक्षकांसाठी दिवाळीची अनोखी भेट आणलीये कट्यार काळजात घुसली चित्रपटाने. भारतीय शास्त्रीय संगीताची भरजरी परंपरा जपणा-या आणि सुरांची विशेष मेजवानी असलेल्या या चित्रपटाची सुरूवातही एक खास परंपरा जपून होणार आहे ती म्हणजे दिवाळी पहाटद्वारे. अभ्यंग स्नान, सुगंधी उटण्याचा सुवास, झेंडूंच्या फुलांचे तोरण, घरभर पसरलेला आनंद दिवाळीच्या उत्सवात घराघरांत असलेलं हे वातावरण आणि अशाच वातावरणात रसिकांसाठी दरवर्षी साजरी होणारी दिवाळी पहाट. कधी सुरांच्या कधी तालवाद्यांच्या तर कधी कवितांच्या साथीने. याहीवर्षी ही दिवाळी पहाट रंगणार आहे पण एका विशेष कार्यक्रमाने. झी स्टुडिओजची निर्मिती असलेल्या कट्यार काळजात घुसली हा भरजरी चित्रपट दिवाळीत १२ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीस येतोय आणि त्याचा दिमाखदार प्रिमीयर रंगणार आहे दिवाळी पहाटेच्या मुहुर्तावर. मराठी चित्रपटसृष्टीत प्रथमच दिवाळीचा योग साधून असा भव्य दिव्य प्रिमीयर दिवाळी पहाटच्या मुहूर्तावर रंगतोय. येत्या १० नोव्हेंबरला मुंबईत सकाळी ९ वा. चित्रपटाच्या संपूर्ण कलाकार आणि तंत्रज्ञांसह मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील अनेक मान्यवर या खास प्रिमीयरला उपस्थित राहणार आहेत.

 

मराठी संगीत रंगभूमीवरील अजरामर अशी कलाकृती म्हणजे संगीत कट्यार काळजात घुसली. भारतीय संगीताची महती सांगणारी, अभिजात अशी कलाकृती चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. अनेक दिग्गज कलावंतांच्या अभिनयाची जुगलबंदी, भव्य दिव्य सेट्स, विलोभनीय छायाचित्रण आणि काळजाचा ठाव घेणारं संगीत ही या कट्यारची वैशिष्ट्यं. यावर्षी गोव्यात पार पडणा-या ४६ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठीही कट्यार..ची अधिकृत निवड झाली. प्रदर्शनापूर्वीच रसिकांच्या ओठी या चित्रपटाची अशा विविध कारणांनी चर्चा आहे. दिवाळीच्या मुहूर्तावर या दिमाखदार चित्रपटामधून सुरांची आतषबाजी रसिकांना अनुभवायला मिळणार आहेच पण त्यासोबतच दिवाळी पहाटेचा आनंदही वेगळ्या प्रकारे साजरा होणार आहे.

 

‘कट्यार काळजात घुसली’ चित्रपट अनेक मातब्बर कलाकारांच्या अभिनयाने सजला आहे. सचिन पिळगावकर, शंकर महादेवन यांच्यासह चित्रपटात सुबोध भावे, अमृता खानविलकर, मृण्मयी देशपांडे, पुष्कर श्रोत्री आणि साक्षी तन्वर यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. चित्रपटाची कथा पुरुषोत्तम दारव्हेकर यांची आहे तर हिंदीमधील अनेक गाजलेल्या चित्रपटांचे पटकथाकार प्रकाश कपाडिया यांनी या चित्रपटाची पटकथा आणि संवाद लिहिले आहेत. चित्रपटाची भव्यता आपल्या कॅमेरात टिपून तो नयनरम्य बनवलाय ज्येष्ठ छायालेखक सुधीर पलसाने यांनी तर कलादिग्दर्शनातून स्वातंत्र्यपूर्व कालखंड आणि राजे रजवाड्यांची भव्यता उभारण्याचं काम केलंय संतोष फुटाणे यांनी. रंगभूषेचे जादूगार विक्रम गायकवाड यांच्या कलेची जादू पुन्हा एकदा यातून बघायला मिळेल. जुन्या रचनांचा आत्मा न हरवता त्यांना नव्या रुपात सजवण्याचं आणि काही नवीन गाण्यांच्या माध्यमातून संगीताचा हा अनमोल नजराणा रसिकांना देण्याचं काम केलंय प्रख्यात संगीतकार शंकर-एहसान-लॉय यांनी.

झी स्टुडिओजची निर्मिती असलेला “कट्यार काळजात घुसली” हा भरजरी चित्रपट दिवाळीत १२ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीस येतोय.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

धनकवडीतील एकता सोसायटीला ८ कोटीची लाच मागणारा सहकार खात्याच्या विनोद देशमुख व भास्कर पोळला बेड्या

दोघे एसीबीच्या सापळ्यात; 30 लाखांचा हफ्ता घेताना रंगेहाथ पकडलंपुणे:...

पुणे कँटोन्मेंटमधील केंद्र शासनाच्या जागांवर जाहीर केलेल्या ‘वक्फ’ मालमत्तांची चौकशी करा

खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांनी संरक्षण मंत्री राजनाथ...

शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन

पुणे: राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व माजी...

घराण्यांचे वेगळेपण जाणून घेतल्यास भिंतींचा अडथळा जाणवत नाही : पंडित अरुण कशाळकर

पुणे : गायनाची ज्ञानगंगा घराण्यातूनच उगम पावते आणि तो...