दिल्लीत इस्रायली दूतावासाबाहेर स्फोट, दोन संशयित सीसीटीव्हीत कैद, शोध सुरू

Date:

नवी दिल्ली- चाणक्यपुरी परिसरात असलेल्या इस्रायली दूतावासाच्या मागे एका इमारतीतल्या रिकाम्या फ्लॅटमध्ये मंगळवारी (२६ डिसेंबर) रात्री मोठा स्फोट झाला. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलचं एक पथक या प्रकरणाचा तपास करत आहे. स्फोटानंतर स्पेशल सेलचं पथक आणि बॉम्बशोधक पथकाने दोन-तीन तास संपूर्ण परिसरात शोधमोहीम राबवली. परंतु, सफोटाशी संबंधित कोणतीही गोष्ट पोलिसांच्या हाती लागली नाही. केवळ स्फोट झालेल्या ठिकाणापासून काही अंतरावर एक पत्र सापडलं. या पत्रात इस्रायली दूतावासाच्या राजदूतांचा उल्लेख करण्यात आला आहे. तसेच या पत्रात एक झेंडादेखील गुंडाळण्यात आला होता. पोलीस या पत्राच्या अनुषंगानेदेखील तपास जारी आहे.दिल्ली पोलीस विभागातील वरिष्ठ सूत्रांनी सांगितलं की, दूतावासाजवळ सापडलेल्या पत्रात इस्रायलबद्दल आणि त्यांच्या राजदूतांबद्दल अपमानजनक भाषेत मजकूर लिहिला आहे. हे पत्र टाईप केलेलं आहे.

दरम्यान, पोलिसांनी या परिसरात असलेले सर्व सीसीटीव्ही कॅमेरे तपासले. यामध्ये पोलिसांना दोन संशयित व्यक्ती आढळल्या आहेत. एनएसजी आणि एनआयएची दोन पथकं तसेच दिल्ली पोलीस या दोन व्यक्तींचा शोध घेत आहेत.

एएनआय या वृत्तसंस्थेने दिल्लीतल्या स्फोटाच्या घटनेप्रकरणी सूत्रांच्या हवाल्याने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार दिल्ली पोलिसांनी दूतावासाजवळच्या सर्व सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचं फूटेज तपासलं. त्यामध्ये पोलिसांना दोन संशयित व्यक्ती आढळल्या आहेत. पोलीस अजूनही इतर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचं फूटेज तपासत आहेत. ते दोन संशयित कुठून आले आणि कुठे गेले याचा तपास करत आहेत.

मंगळवारी संध्याकाळी सहा वाजता एका अज्ञात व्यक्तीने दिल्ली अग्निशमन दलाला फोन करून कथित स्फोटाबाबत माहिती दिली. त्यानंतर अग्निशमन दल, दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलचं एक पथक आणि बॉम्बशोधक पथक घटनास्थळी दाखल झालं. इस्रायली दूतावासाच्या मागे असलेल्या एका रिकाम्या फ्लॅटमधून स्फोटाचा आवाज आला. आसपासच्या तीन-चार जणांनी हा आवाज ऐकला. हा स्फोट कसला होता याबाबत कुठल्याही प्रकारची माहिती अद्याप मिळाली नाही.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची लंडनमध्ये उच्चायुक्त विक्रम दोराईस्वामी यांच्याशी भेट

यूके अभ्यासदौऱ्यात महत्त्वपूर्ण चर्चा मुंबई, दि. १७ फेब्रुवारी २०२६ :...

कविता हाच माझा कर्मयोग : प्रभा सोनवणे

कै. तिलोत्तमा निफाडकर स्मृती कर्मयोगिनी पुरस्काराने प्रभा सोनवणे यांचा गौरव पुणे :...

चंद्रपूर शहरातील श्री विठ्ठल मंदिर देवस्थानास ‘ब’ वर्ग दर्जा प्रदान करण्यात यावा

आ सुधीर मुनगंटीवार यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी चंद्रपूर शहरातील श्री विठ्ठल...

टीओडी वीजमीटरमुळे पुणेकरांना मिळाली साडेआठ कोटींची सवलत

पुणे, दि. १७ फेब्रुवारी २०२६- टीओडी वीजमीटर बसविणाऱ्या वीज ग्राहकांना...