चित्रपट समीक्षण
चित्रपट -‘ मामाच्या गावाला जावू या ‘
प्रकार -फॅमिली थ्रील ड्रामा
दिग्दर्शक – समीर हेमंत जोशी
निर्माता -पंकज छल्लानी
दर्जा -तीन स्टार
कलाकार -अभिजित खांडकेकर , मृण्मयी देशपांडे , शुभंकर अत्रे साहिल मालगे,आर्या भरगुडे
–
कथा: खेड्यात राहणाऱ्या नंदन देवकर म्हणजे नंदू (अभिजित खांडकेकर ) याचे याच्या बहिणीवर निस्सीम प्रेम ; पण याच्या लहानपणीच त्याची बहिण आपल्या शहरातील प्रियकरासोबत पळून गेलेली . लहानपणातल्या या घटनेचा त्याच्यावर चांगलाच परिणाम झालेला असतो आणि काही वर्षानंतर त्याला शहरातून फोन येतात आणि त्याला जावेच लागते – तिथे भल्या मोठ्ठ्या बंगल्यात जातो तर त्याच्या बहिणीच्या आणि तिच्या पतीच्या प्रतिमेला पुष्पहार घातलेला त्याला दिसतो आपली बहिण मरण पावली याने आणखी त्यावर आघात होतो आणि तो तसाच पळत बाहेर येवून गावी निघतो, एस टी त बसल्या बसल्या बहिणी सोबतच्या बालपणातल्या आठवणीत हरवलेल्या नंदूची कटकट वाढते ती याच एस टी मध्ये बसलेल्या ३ मुलांशी वाद घालणाऱ्या कंडक्टर च्या वर्तनाने ; हा वाद पराकोटीला पोहोचतो आणि कंडक्टर या चौघांना हि वाटेत उतरवतो . तिथेच या एस टी बस मधून जाण्यासाठी मागून येथे धावत आलेल्या तेजू (मृण्मयी देशपांडे )या प्राथमिक शाळे तील बडबड्या शिक्षिकेशी त्यांची गाठ भेट होते हि तीनही मुले जी भावंडे असतात इरा (आर्या भरगुडे ), साहिल (शुभंकर अत्रे ) आणि कुणाल (साहिल मालगे )पण शहरी वातावरणात .इंग्रजी शिक्षणाने ‘फॉरवर्ड ‘ झालेली म्हणतात तशी असतात , जी मुंबईला गेलेली आपली आई परत का आली नाही म्हणून तिला शोधण्याच्या ‘ आपसात गुप्त ठेवलेल्या मोहिमेवर ‘निघालेली असतात आणि तेजू हि आपल्या प्रियकरासोबत पळून जावून लग्न करायच्या उद्देशाने आलेली असते . एकमेकांबद्दल नसलेल्या या पाच जणांचा जंगल प्रवास आनिओ स्वभाव प्रवास , कसे चकवे देत देत त्यांच्यात गोडवा निर्माण करतो याची हि कथा आहे . संपूर्ण जंगलातला रोमांचकारी आणि एकमेकातल्या स्वभावाच्या पैलू बद्दल उत्कंठा वाढविणारा हा प्रवास दोन रात्रीच दोन दिवसाचा असून तो मराठी रसिकांना नक्कीच आकर्षित करणारा ठरेल
समीक्षा – आज कालच्या शहरी आणि आधुनिक युगात हरवलेल्या मामाच्या गावी घेवून जाण्याच्या उद्देशाने हा चित्रपट आला असला तरी मामाचा गाव या चित्रपटात दिसलेला नाही मात्र मामा- भाच्याचे नाते- बहिण भावाच्या नात्याचा जिव्हाळा , आणि एकूणच जुन्या जमान्यातला पण मनोमनी अजूनही कुठे तरी कोपऱ्यात पडलेला हरवलेला जिव्हाळा जागृत करण्यात ,आणि विचार करायला लावण्यास हा चित्रपट यशस्वी ठरतो . कथा रहस्यमय करण्याचा प्रयत्न आणि त्यातून वाढणारी उत्कंठा हे भावणारे असले तरी त्यामुळे अधून मधून २/३ वेळा चित्रपट रटाळ आहे कि काय ? असे उगाचच वाटल्याशिवाय राहत नाही .तरीही तो रसिकांना कलावंतांच्या अभिनयाच्या ताकदीवर खिळवून ठेवतो हा चित्रपट केवळ अभिजित खांडकेकर आणि मृण्मयी देशपांडे आणि तिन्ही मुलांच्या अभिनयाच्या ताकदीवर च पूर्णतः अत्यंत चांगला असा झाला आहे आणि आजच्या जमान्यात मामाच्या गावाला जाण्याची वाट किती खडतर बनली आहे हे दाखवून देण्यातहि चित्रपट यशस्वी झाला आहे , अवधूत गुप्ते यांचे विशेष गीत चित्रपटाच्या शेवटी टाकून जणू काही मारूनच टाकले आहे असे म्हणण्यास वाव निश्चित आहे, ते सुरुवातीला असते तर जास्त मजेदार वाटले असते . जंगलात राहणाऱ्या ‘जना'(निनाद महाजनी )याच्या झोपड्यात लाईट नसल्याचा संवाद अगोदर येतो आणि नंतर एक बल्ब लावलेला दिसतो – जंगलातील केवळ एका घराला आलेली हि वीज , आणि सुरुवातीला पुण्याहून खेड्याकडे निघालेली एस टी , त्यातून मध्येच कंडक्टर ने वाटेत ३ मुले उतरवून देणे अशा काही बाबी खटकतात. पण आगळ्या वेगळ्या अशा धाटणीचा वाटावा असा हा चित्रपट उभा करण्यासाठी अभिजित खांडकेकर आणि अन्य सर्वच कलावंतांनी घेतलेली मेहनत पाहता रसिकांनी एकदा तरी या ‘ मामाच्या गावाला जावूनच यावे , मृण्मयी देशपांडे ने तर चक्क श्रीदेवीची आठवण येइल असा सुरेख अभिनय केला आहे .