पुणे :- दहावीच्या सीबीएसई बोर्डाचा निकाल आज जाहीर झाला. पिंपरीतील गोयल गंगा इंटरनैशनल स्कुलचा निकाल १०० टक्के लागला असून येथील विद्यार्थ्यांनी भरघोस यश संपादन केले असून अंजली नायर हिला सर्वाधिक ९८ % गुण मिळाले आहेत. शाळेची एकूण टक्केवारी ८० टक्के आहे. परीक्षेला बसलेल्या ११५ विद्यार्थ्यांपैकी ३२ विद्यार्थ्यांना ९० टक्क्यांहून अधिक तर ६३ विद्यार्थ्यांना ८० टक्क्यांहून अधिक गुण मिळाले आहेत.
पलक भंडारी हिला ९६ टक्के तर उत्कर्ष रस्तोगी ९५. ५ टक्के मिळाले आहेत.
डिस्लेक्सिया डिस्ग्रॅफिया असलेल्या अभिनव सरकार ने ८५ टक्के मिळवत शाळेचे नाव उंचावले आहे. याला बिझनेस स्टडीज या विषयात ९७ मार्क(without any internal marks) मिळाले आहेत.
हाडाचे शिक्षक फक्त परीक्षेपुरते शिकवत नाहीत, तर त्या विद्यार्थ्यांला भविष्यात ते काही काम करतील त्यात अधिकाधिक प्रगती नेहमी करत राहावी अशा दृष्टीने शिकवत असतात. समाजातील कर्तव्यनिष्ठ व्यक्तितीत परिवर्तित करण्याचे काम करत असतात आणि असाच प्रयत्न आम्ही नेहमी करत राहू असे मत मुख्याध्यपिका भारती भागवाणी यांनी व्यक्त केले.
आमच्या येथील प्रत्येक शिक्षक सकारात्मक विचारांतून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असतो . त्यामुळेच येथील विद्यार्थी शिक्षणाबरोबरच इतर अनेक कौशल्यांमध्ये पारंगत होत आहेत.म्हणूनच मी विद्यार्थ्यांबरोबरच शिक्षकांचेही अभिनंदन करू इच्छ्ते अशा भावना शाळेच्या संचालिका सोनू गुप्ता यांनी मांडल्या .

