मुंबई- महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची शुक्रवारी शपथ घेण्यासाठी सज्ज झालेले देवेंद्र फडणवीस हे आपल्या आगामी मंत्रिमंडळातील नावे अंतिम करण्यासाठी व त्यावर शेवटचा हात फिरविण्यासाठी दिल्लीत दाखल झाले आहेत. फडणवीस यांनी अमित शहा यांच्याशी विस्तृत चर्चा केली.फडणवीस यांनी प्राथमिक म्हणून पहिल्या टप्प्यात 25 नावे निश्चित केली आहेत.
पश्चिम महाराष्ट्रातून गिरीश बापट, बाळा भेगडे, राम शिंदे, सुभाष देशमुख, दिलीप कांबळे यांची नावे मंत्रिपदासाठी आघाडीवर आहेत. मुंबई, कोकण, ठाणे पट्ट्यातून विनोद तावडे, प्रकाश मेहता, आशिष शेलार, विष्णू सावरा व राज पुरोहित यांची नावे आघाडीवर आहेत. गिरीश बापट, खडसे, हरिभाऊ बागडे व हरिभाऊ जावळे यांची नावे विधानसभा अध्यक्षपदासाठी घेतली जात आहेत. खडसेंनी मात्र यास नकार दिला आहे. विदर्भातील भाऊसाहेब फुंडकर यांच्याकडे विधान परिषदेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी दिली जाऊ शकते. विदर्भातून फडणवीस यांच्यासह सुधीर मुनगंटीवार, चंद्रशेखर बावनकुळे, चैनसुख संचेती, गोवर्धन शर्मा यांची नावे आघाडीवर आहेत. तर, मराठवाड्यातून पंकजा मुंडेंसह हरिभाऊ बागडे, सुधाकर भालेराव, संभाजी निलंगेकर यांच्या नावाची चर्चा आहे. उत्तर महाराष्ट्रातून एकनाथ खडसे, गिरीश महाजन, जयकुमार रावल तर
फडणवीस स्वत:कडे अर्थ खात्यासह गृह खाते ठेवण्याची शक्यता आहे. खडसे यांच्याकडे महसूल, तावडेंकडे शिक्षण (एकत्रित सर्व विभाग), मुनगंटीवार यांना कोणते खाते द्यावे याबाबत चर्चा सुरु आहे. त्यांनाही वजनदार खाते दिले जाऊ शकते. शेलार यांच्याकडे नगरविकास, पंकजा मुंडेंकडे ग्रामीण विकास खात्यासह महिला व बाल कल्याण विभाग सोपवला जाऊ शकतो. शिवसेना सत्तेत सहभागी झाली तर त्यांना दोन महत्त्वाची खाती देण्याबाबत चर्चा सुरु आहे.
याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट उद्याचे सोहळ्याचे औपचारिक निमंत्रण दिले. याचबरोबर फडणवीस यांनी गडकरींशी मंत्रिमंडळ विस्ताराबाबत सविस्तर चर्चा केली. यात फडणवीस यांच्या शपथविधी वेळी फक्त भाजपच्याच मंत्र्यांना शपथ देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे समजते आहे. याचबरोबर फडणवीस यांनी दिल्लीतील भाजपच्या सर्व प्रमुख नेत्यांना भेटून शपथविधीसाठी निमंत्रण दिले.
\देवेंद्र फडणवीस उद्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेत आहेत. यासाठी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर जोरदार तयारी सुरु आहे. शपथविधी सोहळा काही तासांवर आला असताना उद्याच्या सोहळ्यात कोणा-कोणाला शपथ द्यायची व त्यांच्याकडे संभाव्य कोणती द्यावीत यावर फडणवीस पक्षाध्यक्ष शहा यांच्याशी चर्चा करत आहेत. महाराष्ट्राचे भाजपचे नेते नितीन गडकरी व पक्षाध्यक्ष शहा हे आज मुंबईत येणार होते. मात्र, फडणवीस यांनी शहा यांना मुंबईत येण्यापासून थांबवले व मीच दिल्लीला येत असल्याचे सांगत आज दुपारी दिल्लीकडे रवाना झाले. यामागे पक्षातंर्गत राजकारण असल्याची माहिती मिळत आहे.गडकरींचा हस्तक्षेप टाळण्यासाठी फडणवीस-शहांनी ही खेळी केल्याचे समजते आहे. गडकरी हे आपल्या काही समर्थकांना मंत्रिमंडळात स्थान देण्याबरोबरच वजनदार खात्यावर वर्णी लावावी यासाठी प्रयत्नशील आहेत. मात्र, शहा यांनी फडणवीस यांना फ्री-हॅड दिल्याचे कळते.