पुणे:- कोंढवा खुर्द येथील पार्क सर्वे नंबर ४३,साईबाबा नगर येथे उद्यानाचे काम गेली तीन ते चार वर्षापासून अपूर्ण अवस्थेत आहेत व मुख्य प्रवेशद्वार बंद असून त्याच्या समोर कचऱ्याचे ढीग साचलेले दिसून येतात तेथील झाडांची व उद्यानाची देखभाल होत नसल्याने दुरवस्था झाली आहे. राडारोडा,तुटलेले गेट व कोणीही तेथे प्रवेश करतात. पथदिव्यासाठी खड्डे खोदलेले आहेत.जेष्ठ नागरिक,महिला लहान मुले यांना त्रास सहन करावा लागत आहे असे बाळासाहेब म्हस्के यांनी आंदोलनात सांगितले.
पुढे ते म्हणाले कि, उद्यानात वेळी आधार असल्याने मद्यपी येथे मोठ्या प्रमाणात मद्य पिण्यासाठी बसतात या मुळे रस्त्याच्या जाणाऱ्या महिला तसेच वयोरुद्ध नागरिक यांना फ्हार त्रास सहन करावा लागतो. वेळोवेळी उद्यान अधीक्षक,आयुक्त मनपा यांना निवेदन दिले परंतु निष्पन्न झाले नाही.ऐन दिवाळीत मुलांना सुट्ट्या लागणार असून त्यांना त्यांच्या हक्काचे उद्यान खेळण्यास नाही हे अत्यंत दृर्दैवाची बाब आहे.तसेच प्रशासनाचे याची घेऊन नागरिकांसाठी उद्यान खुले करून द्यावेत.
अन्यथा आंदोलन तीव्र करू असा इशारा म्हस्के यांनी दिला प्रमुख मागण्या १)उद्यानाचे नामकरण करावे व उद्यानास डॉ ए.पी. ज़े. कलाम द्यावे. २) उद्यानाचे रखडलेले काम त्वरित पूर्ण करून उद्यान खुले करावे.
या वेळी स्थानिक नागरिक महिला मुलांसह अनेक नागरिक ह्या आंदोलनास उपस्थित होते.

