Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

युद्धाचे प्रमाण कमी झाल्याने भारतीय लष्कराचं महत्त्व कमी होत चाललंय-संरक्षणमंत्री

Date:

जयपूर -‘लष्करी अधिकाऱ्यांच्या दोन पिढ्या कसलंही युद्ध न लढताच निवृत्त झाल्या, ‘गेल्या ४० वर्षांत युद्धाचे प्रमाण कमी झाल्याने भारतीय लष्कराचं महत्त्व कमी होत चाललंय,’ असं वक्तव्य संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी केलं आहे. मात्र, ‘मी युद्धाचा पुरस्कर्ता आहे असा अर्थ यातून काढू नका,’ असं आवाहनही त्यांनी केलं आहे.
‘सीमा सुरक्षेची आव्हानं व उपाय’ या विषयावर जयपूर येथे झालेल्या चर्चासत्रात ते बोलत होते. ‘सर्वत्र शांतता असल्यानं देशातील सामान्य नागरिकांच्या लेखी आता लष्करी जवानांना महत्त्व उरलेलं नाही. जवानांना लोकांचा आदर मिळेनासा झाला आहे. त्यांना अनंत अडचणींना सामोरं जावं लागत आहे. गेल्या ४०-५० वर्षांत  युद्धाचे प्रमाण कमी   होणं हेच याचं कारण असल्याचे पर्रीकर म्हणाले. ‘लष्करी अधिकाऱ्यांच्या दोन पिढ्या कसलंही युद्ध न लढताच निवृत्त झाल्या हे खरं आहे. पण, याचा अर्थ लोकांनी सैनिकांना आदर देऊ नये असं नाही. जो देश आपल्या लष्कराचं रक्षण करू शकत नाही, त्यांचं हित जपू शकत नाही, तो कधीच प्रगती करू शकत नाही, असं ते म्हणाले.
राज्य सरकारांचा दृष्टिकोनही सैनिकांच्या बाबतीत उदासीन आहे. सैनिकांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांबद्दल मी अनेक मुख्यमंत्र्यांना पत्रही लिहिली आहेत. अनेक मुख्यमंत्र्यांनी त्यावर कार्यवाही केली आहे. अनेक ठिकाणी सैनिकांना होणारा त्रास थांबला आहे,’ असंही पर्रीकर यांनी स्पष्ट केलं.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

दुप्पट मताधिक्याने पोटनिवडणुकांमधील विजय ही तर देशभरातील आप च्या पुनरागमनाची चाहूल

पुणे- दुप्पट मताधिक्याने पोटनिवडणुकांमधील विजय ही तर देशभरातील आप...

रसिकांची दाद कलाकारांना सुखावते : पं. सुहास व्यास

पंचामृत संगीत कला प्रतिष्ठानतर्फे ज्येष्ठ कलाकारांचा गौरव डॉ. श्याम गुंडावार,...

डॉ. दीपक हरके यांना अमेरिका, बोस्टन येथील ग्लोबल युनिव्हर्सिटीची ॲानररी डॅाक्टरेट

गोव्याचे माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्या हस्ते सन्मानित पिंपरी, पुणे...

पिपंरी चिंचवड शहराचे नाव “जिजाऊ नगर” करा – महेश बारणे

भक्ती शक्ती प्रतिष्ठानची मुख्यमंत्र्यांकडे मागणी पिंपरी पुणे (दि. १७ जून...