मुद्रा कर्ज योजनेंअंतर्गत अडीच कोटी रुपये धनादेशाचे वाटप

Date:

index1
पुणे-भारतीय जनता पार्टी ओ बी सी आघाडी पुणे शहर आणि भारतीय जनता पार्टी  पुणे कॅन्टोन्मेन्ट विधानसभा मतदार संघाच्यावतीने  भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरु केलेल्या मुद्रा कर्ज योजनेंअंतर्गत अडीच कोटी रुपये धनादेशाचे वाटप नगरसेवक सुनील कांबळे व माजी नगरसेवक मनीष साळुंके यांच्याहस्ते करण्यात आले . सोमवार पेठमधील बँक ऑफ महाराष्ट्र सोमवार पेठ शाखेमध्ये झालेल्या या कार्यक्रमास  बँक ऑफ महाराष्ट्रचे पुणे जिल्हा व्यवस्थापक  सहाय्यक व्यवस्थापक अमर कुमार ,  पुणे विभाग उप व्यवस्थापक  निरंजन पुरोहित , सोमवार पेठ शाखा व्यवस्थापक प्रमोद कहाळकर , कार्यक्रमाचे सयोजंक सतीश गायकवाड , जयप्रकाश पुरोहित , राजाभाऊ पाटील , चरणजितसिंग सहानी , उद्धव मराठे , पोपट गायकवाड , स्वाती धनगर , शंतनू जावळे , नईम शेख , संजय ओझा आदी मान्यवर व पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते . 
 यावेळी  भारतीय जनता पार्टी ओ बी सी आघाडी पुणे शहर अध्यक्ष मनिष साळुंके  यांनी सांगितले कि , मुद्रा कर्ज योजनेअंतर्गत आज अडीच कोटी रुपयांचे धनादेशाचे वाटप करण्यात आले , यामध्ये छोट्या मोठ्या व्यावसायीकाना व  नागरीकाना  लाभ मिळावा . मंगळवार पेठ भागातील नागरिकांना धनादेश वाटण्यात आले . 
नगरसेवक सुनील कांबळे यांनी सांगितले कि . मुद्रा कर्ज योजनेअंतर्गत नागरिकांनी कर्जे घेऊन ती प्रामाणिकपणे फेडली पाहिजेत ,जेणेकरून त्यांना पुन्हा कर्जे बँकेनी दिली पाहिजेत . यावेळी लाभार्थीनी भारतीय जनता पार्टी ओ बी सी आघाडीचे आभार व्यक्त केले . 
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व स्वागत कार्यक्रमाचे सयोजंक  भारतीय जनता पार्टी ओ बी सी आघाडी पुणे शहर सरचिटणीस सतीश गायकवाड यांनी केले . 
 
SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे सार्वजनिक आरोग्य सेवांना मिळणार नवे बळ:मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

राज्य शासन व वाधवानी एआय यांच्यात सामंजस्य करार मुंबई, दि....

भारतात एका वर्षात 24 अब्जाधीश वाढले: लक्ष्मी मित्तल दररोज ₹274 कोटी कमावून देशातील चौथे सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले

नवी दिल्ली-फोर्ब्स वर्ल्ड्स बिलियनेअर्स 2026 च्या यादीनुसार, भारतात एका...

धर्मांतरविरोधी कायदा सर्वात वाईट:असदुद्दीन ओवेसी यांची टीका

मुंबई-महाराष्ट्रात प्रस्तावित असलेल्या धर्मस्वातंत्र्य विधेयक 2026 वरून राजकीय वातावरण...

ट्रम्प यांची रविवारी नाटो (NATO) देशांना धमकी

दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळील इंधन टॅंकवर हल्ला:अनेक उड्डाणे डायव्हर्ट, ट्रम्प...