पुणे – माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात झपाट्याने होत असलेल्या क्रांतीमुळे विविध क्षेत्रात नवनवीन माहिती व बदलते तंत्रज्ञान व आवश्यक माहितीमुळे रोजगाराच्या संधी मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होत असल्याचे प्रतिपादन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील पीयूएमबीए विद्याशाखेचे माजी संचालक डॉ. शरद जोशी यांनी केले.
पुणे महानगरपालिकेच्या समाजविकास विभागाच्या वतीने हॅलो माय फ्रेंड उपक्रमा अंतर्गत घोले रस्त्यावरील पंडित जवाहरलाल नेहरु सांस्कृतिक भवन येथे मान्यवर तज्ञांचे महाविद्यालयीन विद्याथ्र्यांकरिता मार्गदर्शन व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.
याप्रसंगी मार्गदर्शन करताना डॉ. शरद जोशी यांनी ‘‘संगणक क्षेत्रातील संधी‘‘ या विषयावर मार्गदर्शन करताना सांगितले की माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील क्षेत्रे किती आहेत, नेमके काय शिकायचे, ई-कॉमर्स, स्वत:ची वेबसाईट तयार करणे, वेबसाईटद्वारे अनेक संधी प्राप्त होतात. तसेच यु-ट्युबद्वारे वैविध्य स्वरुपाची माहिती, ट्युटोरियल्स, डिजीटल मार्केटींग, गुगल तंत्रज्ञानाचे सहाय्य, सोशल मिडीया द्वारे संवाद कौशल्यांचे आदान प्रदान कमी वेळात प्रभावी व उपयुक्त होत असते. उद्योग व्यवसाय निवडताना कोणत्या बाबी महत्वाच्या आहेत त्यानुसार नियोजन करुन कष्ट करण्याची सातत्याने तयारी ठेवल्यास यश प्राप्त होत असल्याचे त्यांनी सांगितले.
मा. उपमहापौर आबा बागुल यांनी उद्घाटनपर भाषणात सांगितले की १८ ते २५ वयोगटातील तरुण तरुणींना वेळीच मार्गदर्शन व मदत करणे आवश्यक आहे. या कालावधीत शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक, कौटुंबिक अशा विविध स्तरावर मनामध्ये विचारांचा कोंडमारा होत असतो. या बाबींचा विचार करुन त्यांना मदत, सहकार्य करण्याच्या हेतूने ‘‘हॅलो माय फ्रेंडङ्कङ्क संकल्पना आकारास आली. यामध्ये १८००२३३६८५० या टोलफ्री क्रमांकावर संपर्क साधल्यास विविध क्षेत्रातील तज्ञ, मान्यवर, ब्रॅण्ड अॅम्बेसिडर, संबंधित क्षेत्रातील मान्यवर, नाट्य-चित्रपट क्षेत्रातील मान्यवर मार्गदर्शन करीत असल्याचे सांगितले. तसेच उपक्रमा अंतर्गत आयोजित केल्या जातात. याचा जास्तीत जास्त विद्याथ्र्यांनी लाभ घेतला पाहिजे असे सांगितले.
स्टडी सर्कलचे डॉ. आनंद पाटील यांनी ‘‘प्रशासकीय क्षेत्रातील करियर संधीङ्कङ्क या विषयावर मार्गदर्शन केले.
प्रशासकीय सेवा प्रवेश करणेकरिता करावयाची तयारी, विविध क्षेत्रे, मानसिकतेवर आधारित अथवा ज्या विषयाची आवड आहे त्या विषयाशी निगडीत असलेल्या क्षेत्रात करियर करण्याकरिता नेमके काय करावये, स्पर्धा परिक्षा, शारिरीक तंदुरुस्ती विषयक चाचण्या, मैदानी खेळ व त्यांचे महत्व, राज्य व राष्ट्रीय स्तरावरील लेखी व मौखिक परिक्षांचे स्वरुप याबाबत त्यांनी अनेक उदाहरणे देऊन अतिशय उपयुक्त मार्गदर्शन केले.
याप्रसंगी विविध महाविद्यालयांचे विद्यार्थी तसेच समुह संघटिका व नागरवस्ती विकास विभागातील अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक, सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रकल्प अधिकारी संजय रांजणे यांनी केले.