“बालनाट्याच्या कक्षा रूंदावणारं मल्हार फिल्मस् ॲन्ड एंन्टरटेनमेंनटस् पुणे”
या वर्षी मल्हार फिल्मस् ॲन्ड एंन्टरटेनमेंनटस आणखीन दोन कलाकृती रसिकांसाठी घेऊन आले आहेत. त्या म्हणजे “भुतांच्या जंगलात छोटा भीम” आणि “निंजा हातोरीची कमाल बालचमुंची धम्माल!” तेही एक सामाजीक भान राखून ..
मे महीन्याच्या सुट्टीतील प्रयोगांमधील उत्पन्नापैकी काही रक्कम ममता फाऊंडेशन या संस्थेला ते मदत करणार आहेत,तसेच ममता फाऊंडेशन ची मुले देखील एक प्रयोग ऊपस्थित होती (२० मे बालगंधर्व) व नाटकांतील कलाकारांसोबत फोटो काढण्याचा मोह त्यांना आवरता आला नाहि.अनाथ एडस् ग्रस्त मुलांचा सांभाळ ममता फाऊंडेशन करते.
“भुतांच्या जंगलात छोटा भीम” आणि “निंजा हातोरीची कमाल बालचमुंची धम्माल!” या नाटकांनी अर्थातच दणक्यात सुरूवात केलेली असून यांच्या पहिल्या सात प्रयोगांना रसिकांनी उत्तम प्रतिसाद दिला आहे.
मल्हार फिल्मस् ॲन्ड एंन्टरटेनमेंनटस् बालनाट्य निर्मिती मधील एक आग्रगण्य नाव. गेली तीन वर्षे सलग बालरसिकांच्या मनावर तसेच पालकांवर ही आपल्या कलाकृतीने अधीराज्य गाजवत व रंगभूमीच्या कक्षा रूंदावत बालनाट्यामध्ये निरनिराळे प्रयोग करून मल्हार फिल्मस ने अनेक विक्रम स्थापन केले.
कार्टून्स ची बालरसिकांवर मोहीनी आहे. हे जाणून त्याच कार्टून्स कडून सामाजिक उपक्रमाबाबत संदेश तसेच लहान मुलांवर मराठमोळे संस्कार केले व बालचमुंनी तसेच पालकांनी सुद्दा ही नाटके अक्षरश: डोक्यावर उचलून धरली. “चिंटूच्या घरात छोटा भीम आणि डोरेमॉन” व “सफर निंजा हातोरीच्या जंगलाची” या नाटकांनी एकाच महीन्यात विक्रमी 20 प्रयोग केले. यांमध्ये पुन्हा पुन्हा पाहणारा प्रेक्षक वर्ग शेकडोंच्या संख्येने होता हे विशेष!
कार्टूनस् चे जग आणि वास्तवातील जग यांतील फरक सांगणारं नाटक म्हणजे “भुताच्या जंगलात छोटा भीम”
आणि
मुलांनी कम्प्युटर वर ,मोबाईल वर गेम खेळू नये, मैदानी खेळ खेळावेत,दूध प्यावे,व्यायाम करावा अशा आशयाचे व लोप पावत चाललेले आपले मराठमोळे खेळ रंगमंचावर आणलेले नाटक म्हणजे “निंज्या हातोरीची कमाल,बालचमुंची धम्माल”!
कलाकार-
बाल कलाकार-
लोभस पैठणकर,सुहानी कांबळे,आर्यन कदम,अनन्या जाधव,रूद्र सातव,चैतन्य रूद्रवार,
मोठे कलाकार-
शीतल करंजे,दिपक कुंभार,सोमनाथ जगताप
लेखक – आदित्य कानेगावकर व ,दिपक कुंभार
दिग्दर्शक- सोमनाथ जगताप आणि दिपक कुंभार
निर्माते- शैलेश जांगीड
सहनिर्माते -गिरीश गोडबोले
पूढे होणारे प्रयोग—
२५ मे दुपारी १ वाजता, भरत नाट्य मंदिर
२६ मे दुपारी १ वा. यशवंतराव चव्हाण नाट्य गृह,कोथरूड
२७ मे संध्या. ६ वा. भरत नाट्य मंदिर
आदित्य कानेगांवकर
मल्हार फिल्मस् अॅण्ड एन्टरटेन्मेंट
९७६४८३०४०