पुणे-महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई ट्रस्ट गणपती मंदिर येथे मागील बाजूस पादत्राणे ठेवण्याच्या जागेजवळ पुणे महानगर पालिकेचे पुरुषांसाठीचे स्वच्छता गृह आहे येथे कायम अस्वच्छता दुर्गंधी असते त्या मुळे भाविकांना त्रास सहन करावा लागतो .स्वच्छता गृहाची हि जागा अत्यंत अयोग्य आहे . स्वच्छता गृहासाठी जवळपास योग्य जागा पाहून तिथे कायम कामगार ठेऊन स्वच्छता राखली जाईल दुर्गंधी येणार नाही याची दक्षता घेणे गरजेचे आहे याबाबत श्रीमंत दगडूशेठ हलवाई ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे व महेश सूर्यवंशी यांना मंडळाच्या महिला कार्यकर्त्यांनी निवेदन दिले हिंद तरुण मंडळाच्या वतीने विनंतीचे पत्र देण्यात आल आहे .यावेळी मंडळाच्या महिला कार्यकर्त्या सौ अंजनी मोटाडू, अर्चना भोज, आशा गिरमकर, प्रिया भंडार, अर्चना दंडे, माधवी मेटेलू, संध्या संगनवार, जयश्री बानिया तसेच मंडळाचे पंचवार्षिक अध्यक्ष दिलीप गिरमकर, गणेश भोज, दिपक कुऱ्हाडे, विशाल ओहाळ उपस्थित होते.दरम्यान पुण्यात सर्वत्रच स्वच्छता गृहांचा अभाव आहे यामुळे पुरुष महिला मुले सारेच वर्षानुवर्षे कुचंबना सहन करीत आहेत . पण हि समस्या सोडविण्यासाठी अद्याप पुण्यातली कोणतीही सरकारी-निमसरकारी व स्वयं सेवी संस्था किंवा कोणतेही मंडळ पुढे आलेले नाही… येईल असे चित्रही नाही
मंदिरानजीकच्या घाणेरड्या स्वच्छतागृहाची समस्या सोडविणार कोण ?
Date: