प्रामाणिक कार्यकर्त्याची वास्तववादी कहानी

Date:

(‘ढोल-ताशे’ समीक्षण )

निर्माते – राजकुमार अंजुटे आणि अतुल तापकीर
दिग्दर्शक –अंकुर अ. काकतकर
कलावंत
-, अभिजित खांडकेकर, हृषिता भट, विनय आपटे, प्रदीप वेलणकर, इला भाटे आणि
जितेंद्र जोशी
दर्जा -४/५


गणपती मंडळांनंतर आता वाढत चाललेलं ढोल-ताशे पथकांचं प्रस्थ आणि राजकारणासाठी पथकांचा होणारा वापर हा विषय तसा वास्तववादी ! हा  वास्तववाद  मांडणारी अनिल सपकाळ यांची उत्तम कथा आणि संवाद   दिग्दर्शक अंकुर काकतकर यांनी ते  चित्रपटाच्या चौकटीमध्ये मांडण्याचा चांगला प्रयत्न ‘ढोल ताशे’ या चित्रपटातून केला आहे. एक वेगळा विषय मांडण्याचा हा प्रयत्न निश्चितच सुरेख आहे पण शेवटाला थोडासा कुठेतरी लेखकच गोंधळेलेला असावा असे वाटणारा शेवट असलेला हा चित्रपट सुरेख संवादा मुळे आणि अभिजित खांडकेकर -जितु जोशी यांच्या उत्तम अभिनयामुळे चांगली रंगत भरतो .. आणि वास्तववादी आपल्या जवळपासच्या घटनांचा विचार करायला लावतो
अमेय कारखानीस (अभिजित खांडकेकर) हा आयटी क्षेत्रातील युवक चित्रपटाच्या केंद्रस्थानी आहे. आई-वडिलांच्या इच्छेखातर ‘आयटी’ क्षेत्राकडे वळलेल्या अमेयला समाजासाठी वेगळं काही तरी करायचं आहे. अमेरिकेतील मंदीचा फटका अमेयला बसतो आणि अचानक त्याची नोकरी जाते. अगदी याच काळामध्ये तो मित्राच्या ढोलताशा पथकाकडे आकर्षित होतो. ढोलताशा पथकामध्ये असणाऱ्या युवकांच्या ऊर्जेचा सकारात्मक वापर करण्याची कल्पना अमेयला सुचते. दुसरीकडे महाराष्ट्राच्या नवनिर्माणाचे स्वप्न पाहिलेला नेता (जितेंद्र जोशी) मुंबईमध्ये ढोलताशा पथकांच्या स्पर्धाचे आयोजन करतो. या स्पर्धेत अमेयचं पथकही सहभागी होतं. मुंबईत झालेल्या या स्पर्धेमध्ये आवाजाच्या मर्यादेचं उल्लंघन झाल्यामुळं जितेंद्र जोशीच्या विरोधकांकडून कोर्टात गुन्हे दाखल होतात. राजकीय स्वार्थापोटी ढोलताशा प‌थकांची नाहक बदनामी होते आहे, या भूमिकेतून अमेय कोर्टात ‘पीआयएल’ दाखल करतो. कोर्टातही अमेयच्याच बाजूने निकाल लागतो आणि युवा आघाडी पक्षाचा प्रमुख जितेंद्र जोशी (आदित्य देशमुख )अमेयला पक्षात येण्याची ऑफर देतो. अमेयची प्रेयसी आणि पत्रकार गोजिरी (हृषिता भट) आणि आई-वडिलांचा विरोध असतानाही जितेंद्र जोशीच्या युवा आघाडीच्या माध्यमांतून अमेय ढोलताशा पथकांच्या राज्यस्तरीय संघटनेचा प्रमुख होतो. त्यानंतर सुरू होतो राजकारणातील खेळ ! पक्षातील प्रवेशानंतर जितेंद्र जोशीला डोईजड होणाऱ्या अमेयला घोटाळ्यात गुंतवण्याचा डाव आखला जातो. नंतरच्या काळात हा संघर्ष आणखी तीव्र होतो. हा सारा संघर्ष ‘ढोल ताशे’ या चित्रपटात दिसतो.
पुण्यातील गणपतीची लक्ष्मी रस्त्यावरील मिरवणूक ,पुण्याचे ढोल ताशा चे शौर्य पथक हे हि पुणेकरांसाठी यात आकर्षण आहेच
प्रदीप वेलणकर, ईला भाटे . हृषिता भट यांचा  अभिनयही चांगलाच आहे  पुण्यातील सुदर्शन च्या शुभांगी दामलेही यात आहेत मोहन दामलेंनी हि न्यायाधीशाची छोटी भूमिका केली आहे पण न्यायाधीशाच्या निर्णयानेच चित्रपट घडतो .  एक लव्ह सॉंग सोडले तर अन्य 2 गाणी उत्तम आहेत काही अर्थ आणि भावना मांडणारी त्यांची चल हि सुरेख आहे   अमेयचा सहकारी ‘ संग्राम ‘हि चांगला रंगविला आहे विद्याधर जोशी तर ग्रेट असतातच बाबुभाई या त्यांच्या भूमिकेला फारसा वाव नसतानाही ते लक्षात राहतात . किरकोळ 3/४ चुका सिनेमात आहेत ज्या काढता आल्या असत्या पण त्यावर उहापोह करण्यासारखे एवढे काही नाही , सिनेमा ग्रेटच आहे

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पाश्चात्य संगीतापेक्षा शास्त्रीय संगीत आणि नृत्यातून वेगळा आनंद मिळतो

नामदार चंद्रकांतदादा पाटील यांची भावना पंडिता रोहिणी भाटे नृत्य महोत्सवाचे...

सोशल मीडियावर औरंगजेबाचं समर्थन: पुण्यात दोघांवर कारवाई

पुणे-राज्यभरात औरंगजेबच्या कबरवरुन राजकीय वाद सुरु असतानाच त्याचे गंभीर...