Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

‘टाइम बरा-वाईट’ १९ जूनपासून चित्रपटगृहात

Date:

1

 

‘वेळ कोणासाठी थांबत नाही’ तसेच ‘गेलेली वेळ परत कधीच येत नाही’ म्हणूनचप्रत्येकाच्या आयुष्यात वेळेला अनन्यसाधारण महत्त्व आहे.घड्याळ्याच्या काट्यावर चालणाऱ्या आपल्या सगळ्यांनाच कधी चांगल्या तर कधी वाईट वेळेशी सामना करावा लागला आहे. वेळ चुकली की पुढच्या सगळ्या गोष्टी विस्कळीत होतात हा आत्तापर्यंतचा बहुदा सगळ्यांनीच घेतलेला अनुभव… हाच विषय थोड्या हटक्या पद्धतीने प्रेक्षकांसमोर मांडण्याचा प्रयत्न दिग्दर्शक राहुल भातणकर यांनी केला आहे.वी. आर. जी. मोशन पिक्चर्स’ प्रस्तुत’टाईम बरा वाईट’ हा नवा थ्रिलर अॅक्शनपट येत्या १९ जूनला प्रदर्शित होत आहे.

भन्नाट व्यक्तिरेखा, रोमांचकारी स्टंटस, प्रेमकहाणी आणि विनोदाचा मनोरंजक तडका असा सगळा मसाला असणारा ‘टाईम बरा वाईट’ हा मल्टीस्टारर चित्रपट आहे. चित्रपटातील नायक राहुल आणि नायिका प्रिया यांच्याभोवती गुंफण्यात आलेली ही कथा एका वेळेवर येऊन थांबते. संध्याकाळी पाच वाजता नक्की काय होणार आहे…? नेमकं कोणतं रहस्य या वेळेत दडलंय…? आणि मुख्य म्हणजे ही वेळ कोणासाठी चांगली व कोणासाठी वाईट असणार…? हे पाहणं उत्कंठावर्धक ठरणार आहे. संकलक म्हणून नावलौकिक मिळवणाऱ्या राहुल भातणकर यांचा हा दिग्दर्शक म्हणून पहिलाच सिनेमा असून त्यांनी या चित्रपटाचे वेगवान संकलनही केले आहे.

विजय गुट्टे निर्मित आणि बाहुल चौधरी, अनुराग श्रीवास्तव सहनिर्मित ‘टाईम बरा वाईट’द्वारा नेहमीच्या परिघाबाहेरील वेगळा कथाविषय हाताळण्यात आला आहे. या चित्रपटात भूषण प्रधान, संजय मोने, आनंद इंगळे, सतीश राजवाडे, ऋषिकेश जोशी, भाऊ कदम, सिद्धार्थ बोडके, विश्वजीत प्रधान, सुनील पेंडुरकर, नुपूर दुधवडकर, राजेश भोसलेआदी कलाकारांसोबतच दाक्षिणात्य चित्रपटातील प्रसिध्द अभिनेत्री निधी ओझा यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. ‘टाईम बरा वाईट’ची वेगवान कथा-पटकथा लिहिली आहे.अल्फान्सो पुत्रण आणि राहुल भातणकर यांनी तर संवाद राजेश कोळंबकर, राहुल भातणकर या द्वयींनी लिहिलेत.

 

‘टाईम बरा वाईट’मध्ये एकूण चार गाणी असून साऊथच्या तडक-भडक बिट्सचा आनंद मराठी रसिकांना याद्वारे घेता येईल.चित्रपटात ‘कादल स्नेहम मोहोब्बत’, ‘दौडा दौडा’, ‘तूतिया’ आणि ‘वाऱ्याचे गुणगुणतो गाणे’ यांसारखीविविध धाटणींची गाणी असून मंदार चोळकर आणि अभिषेक खानकर लिखित या गीतांना हृषीकेश रानडे, अजित परब आणि आदर्श शिंदे यांचा स्वर लाभला आहे. फाईटमास्टर प्रद्युम्न कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली वेगवान कथानकाला साजेशी साह्स्दृश्ये चित्रित करण्यात आली आहेत.

 

वेळचे महत्त्व मनोरंजक पद्धतीने अधोरेखित करणारा ‘टाईम बरा वाईट’ १९ जूनपासून चित्रपटगृहात दाखल होतोय.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानातर्गंत अर्ज करण्याचे आवाहन

पुणे, : एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत सन 2025-26 अंतर्गत...

रस्ते अपघातातील मृत्यूंचे प्रमाण कमी करण्याकरीता उपाययोजना करा-जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी

पुणे: रस्ते अपघातातील मृत्यूंचे प्रमाण लक्षात घेता अपघाताचे प्रमाण...

विठ्ठल मंदिरात प्रवेशासाठी बनावट ‘टोकन दर्शन’ पास विक्री

आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपूरच्या दिशेने जाणाऱ्या पायी जाणाऱ्या वारकऱ्यांच्या...

1200 फूट खोल दरीत आढळले तलाठी अन् तरुणीचा मृतदेह

पुण्याच्या जुन्नरमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. 1200...