पुणे :
“जागतिक डॉक्टर्स डे’ निमित्त “महाराष्ट्र मेडिकल इमर्जन्सी सर्व्हिसेस’, “बीव्हीजी इंडिया लिमिटेड’ आणि “रोटरी क्लब पुणे स्पोटर्स सिटी’ यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजित करण्यात आले होते. या रक्तदान शिबिरामध्ये डॉक्टर्स आणि “बीव्हीजी इंडिया लिमिटेड’ मधील कर्मचारी मिळून एकूण 143 जणांनी रक्तदान केले.
“बीव्हीजी हाऊस’ च्या मुख्य कार्यालयातील 61 कर्मचारी, “सागर कॉम्प्लेक्स’ येथील बीव्हीजी कार्यालयातील 45 कर्मचारी तसेच “महाराष्ट्र मेडिकल इमर्जन्सी सर्व्हिसेस’ (औंध) येथील 37 डॉक्टर्स मिळून या रक्तदान शिबीरात सहभागी झाले होते.
जिल्हा रूग्णालय रक्तपेढी (औंध), ससून रूग्णालय रक्तपेढी (पुणे) आणि आचार्य आनंद ऋषीजी रक्तपेढी (पुणे) या रक्तपेढ्यांचा समावेश होता.