Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

खडकीमधील नवा बझारमध्ये अडीच लाखांची वीजचोरी उघड

Date:

पुणे, दि. 28 : खडकी येथील नवा बझारमधील तीन दुकानांत सुरु असलेली 2 लाख 50 हजार 284 रुपयांची वीजचोरी महावितरणच्या तपासणी मोहिमेत उघडकीस आली आहे. याप्रकरणी तीन दुकानदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

याबाबत माहिती अशी, की शिवाजीनगर विभाग अंतर्गत खडकी येथील नवा बझार येथे रमेश देवराज पारेख यांचे प्रकाश ज्वेलर्स नावाचे दुकान आहे. या दुकानासाठी असलेल्या वाणिज्यिक वीजजोडणीच्या मीटरचे सील तोडलेले आढळले. यात वीजमीटरमध्ये फेरफार करून 5860 युनिटची म्हणजे 83 हजार 187 रुपयांची वीजचोरी झाल्याचे निदर्शनात आले. तर  वाणिज्यिक वीजजोडणीच्या मीटरमध्ये फेरफार करून निर्मला मन्साराम मुलचंदाणी यांच्या संस्कार नावाच्या कपड्यांच्या दुकानात 5127 युनिटची म्हणजे 79 हजार 492 रुपयांची तसेच प्रवीण विजय गर्ग यांच्या मिठाईच्या दुकानात 7570 युनिटची म्हणजे 87 हजार 605 रुपयांची वीजचोरी झाल्याचे निदर्शनात आले.

पुणे परिमंडलाचे मुख्य अभियंता श्री. रामराव मुंडे यांच्या मार्गदर्शनात अधीक्षक अभियंता श्री. महेंद्ग दिवाकर, कार्यकारी अभियंता श्री. आनंद रायदुर्ग, अतिरिक्त कार्यकारी अभियंता श्री. मनीष सूर्यवंशी, श्री. गणेश शामसे, सहाय्यक अभियंता मनोज पाटील, श्री. अभय शामराज, सौ. सोनाली मोदीराज, जनमित्र सुरेश खरात, अशोक घिरे आदींनी ही वीजचोरी उघड करण्याची कामगिरी केली.

या तिनही वेगवेगळ्या वीजचोरीप्रकरणी रमेश देवराज पारेख, प्रवीण विजय गर्ग व निर्मला मन्साराम मुलचंदाणी यांच्याविरुद्ध गुरुवारी (दि. 24) रास्तापेठ (पुणे) येथील महावितरण पोलीस ठाण्यात भारतीय विद्युत कायदा 2003 नुसार कलम 135 अन्वये गुन्हा दाखल झाला आहे

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

महापालिकेतील कनिष्ठ अभियंत्याला 1 लाखाची लाच घेताना अटक

पुणे:पिंपरी महापालिकेत कनिष्ठ अभियंता म्हणून नोकरी करीत असलेल्यास...

“भारत गौरव ट्रेन – छत्रपती शिवाजी महाराज सर्किट” ९ जून पासून

पर्यटकांनी ऐतिहासिक़ पर्यटनाचा लाभ घ्यावा- पर्यटनमंत्री शंभूराज देसाईमुंबई, दि....

लोकशाही, संविधान व महाराष्ट्र धर्म वाचवण्याच्या लढाईत काँग्रेस शिवसेनेबरोबर: हर्षवर्धन सपकाळ.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मातोश्रीवर घेतली शिवसेना पक्ष...