हैदराबाद -आंध्र प्रदेशातील गोदावरी नदीकाठावरील ऐतिहासिक ‘पुष्कर’ मेळ्यात आज चेंगराचेंगरी झाली. यात २५ महिलांसह २७ जण ठार झाले. २५ जण जखमी झाल्याचे समजते. त्यांना जवळच्या रुग्णालयांत दाखल करण्यात आले आहे.
आंध्र प्रदेशातील गोदावरी नदीकाठावर पुष्कर मेळा भरला आहे. गोदावरीत स्नानासाठी लाखोंच्या संख्येने भाविक आले आहेत. अलोट गर्दीमुळे तेथे चेंगराचेंगरी झाली. त्यात २५ महिलांसह २७ जण ठार झाले. २५ जण जखमी झाले असून, त्यांच्यावर रुग्णालयांत उपचार सुरू आहेत, अशी माहिती प्रशासनाने दिली.
या घटनेची माहिती मिळताच मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू घटनास्थळी पोहोचले. त्यांनी जखमींची भेट घेऊन विचारपूस केली. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली असून, लोकांनी अफवा पसरवू नयेत, असे आवाहन नायडू यांनी केले आहे. गोदावरीच्या काठावर झालेल्या भाविकांच्या अलोट गर्दीमुळे सतर्क राहा, असे आदेश प्रशासनाने अधिकाऱ्यांना दिले आहेत. मृतांच्या नातेवाइकांना १० लाख रुपयांची मदत देण्याची घोषणा आंध्र प्रदेश सरकारने केली आहे. जखमींनाही आर्थिक मदत करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
कुंभमेळ्याप्रमाणेच आंध्रप्रदेशामध्ये दर 12 वर्षांनी गोदावरी नदीच्या काठी पुष्करम या उत्सवाचे आयोजन केले जाते. पवित्र गोदावरी नदीमध्ये स्नान करणे हे या उत्सवातील मुख्य वैशिष्ट्य असते. यंदाचा उत्सव हा 144 वर्षांतून एकदा येणारा असल्याने त्याला महापुष्करम असे म्हटले जात आहे. त्यामुळे यंदा येणाऱ्या भाविकांची संख्याही जास्त असेल असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.12 दिवस चालणाऱ्या या महोत्सवात कोट्यवधी भावीक याठिकाणी भेट देणार असल्याची शक्यता आहे. या ठिकाणी आंघोळीसाठी जवळपास 263 घाट आहेत. तर तेलंगणामध्ये अशा प्रकारचे 106 घाट आहेत. या घाटांवर पवित्र स्नान करण्यासाठी भावीक मोठ्या प्रमाणावर गर्दी करणार आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर तयारी करण्यात आलेली आहे.